डान्स दिवाचा संघर्ष! कधीकाळी लॉटरी विकायची नोरा फतेही

डान्स दिवाचा संघर्ष! कधीकाळी लॉटरी विकायची नोरा फतेही

बिग बॉसमध्ये एंट्री केल्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री नोरा फतेहीचा (Nora Fatehi) आज 28वा वाढदिवस आहे. 'दिलबर-दिलबर' आणि 'साकी'सारख्या गाण्यांच्या रीमेकमध्ये नोरानं आपलं उत्कृष्ट नृत्यकौशल्य दाखवत बॉलिवूड (Bollywood)मध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हार्डी संधू यांच्या 'क्या बात है' या म्युझिक अ‍ॅल्बमद्वारे तिला विशेष ओळख मिळली आहे. ज्यानंतर नोराकडे कित्येक आयटम नंबर्सच्या ऑफर येऊ लागल्या. लाखो सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये येणाऱ्यापूर्वी प्रचंड संघर्ष केला आहे, याची माहिती खूपच कमी लोकांना आहे. नोरानं कधी वेटर तर कधी लॉटरी विकण्याचंही काम केलं आहे. स्ट्रगलच्या काळात अभिनेत्री नोरा फतेही मुंबईमध्ये एका भाड्याच्या घरात जवळपास आठ मुलींसोबत एकत्र राहत होती. मुंबई राहायचं म्हणजे हिंदी भाषा समजणं आणि बोलता येणं मस्ट आहे, पण नोराला सुरुवातीच्या काळात हिंदी भाषा बोलता येत नव्हती आणि समजतही नव्हती, त्यामुळे तिला कित्येक समस्यांचा सामना करावा लागला होता. कित्येकदा लोकांनी तिच्यावर आक्षेपार्ह शब्दांत शेरेबाजीही केली होती.  

(वाचा : पद्मा लक्ष्मीनं सांगितलं फिटनेसचं रहस्य, 49व्या वर्षातही असं ठेवा स्वतःला हॉट)

लोक खूप खिल्ली उडवायचे - नोरा

नोरानं एका मुलाखतीत सांगितले होतं की, 'स्ट्रगलच्या काळात एका कास्टिंग एजेंटसोबत भेट झाली होती, संबंधित व्यक्तीनं  केवळ अपमानच केला नाही तर माझा चेहरा आणि शरीराबाबत घाणेरडे शब्द वापरले आणि माझी खिल्ली देखील उडवली होती. नोरानं पुढे असंही सांगितलं की, ‘हिंदी भाषा येत नसल्यानं सुरुवातीला ऑडिशन देणे अतिशय कठीण जायचं. लोक मस्करी करायचे, लोक काय म्हणत आहेत हे देखील मला समजायचं नाही. त्यावेळेस मानसिक त्रास व्हायचा. लोक खूप वाईट पद्धतीनं खिल्ली उडवायचे. ज्यामुळे अनेकदा दुखावलेही गेले आहे. ऑडिशन दिल्यानंतर घरी जाताना मी कित्येक रडलेही आहे’. 

'कुटुंबीयांपासून लपून करायचे डान्स प्रॅक्टिस'

बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतर नोराला केवळ इंडस्ट्रीमधूनच नाही तर कुटुंबीयांच्याही विरोधाचा सामना करावा लागला होता. नोराला तिच्या डान्स स्टाईलमुळे बॉलिवूडमध्ये ओळखलं जातं. पण घरामध्ये डान्सची प्रॅक्टिस उघडपणे करण्याची मुभा तिला नव्हती. ती आपल्या रूममध्ये डान्सचा सराव करायची, जेणेकरून कुटुंबीयांना याची माहिती होऊ नये.   

(वाचा : समंदर में नहाकर..., दिशा पटानीचा बिकिनीतील मादक फोटो व्हायरल)

नोराच्या घायाळ करणाऱ्या अदा

नोराने बॉलिवूडमध्ये ‘दिलबर गर्ल’ म्हणून ओळख मिळवली आहे. तिच्या नृत्य कौशल्य इन्स्टाग्रामवर या आधीही प्रसिद्ध होत्याच. 'सत्यमेव जयते' सिनेमाद्वारे तिने बॉलिवूड पदार्पण केलं. यानंतर तिने स्त्री चित्रपटात ‘कमरिया’ या गाण्यावर जो डान्स केला तो देखील खूप प्रसिद्ध झाला. नोराचा डान्स तुम्ही या आधीही सोशल मीडियावर पाहिला असेल. ती उत्तम बेली डान्सर आहे.

(वाचा : शुभमंगल सावधान! वरूण धवन-नताशाचं मे महिन्यात होणार धुमधडाक्यात लग्न)

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.