आणखी एका रेट्रो गाण्यावर थिरकतेय नोरा फतेही, टीझर आऊट

 आणखी एका रेट्रो गाण्यावर थिरकतेय नोरा फतेही, टीझर आऊट

आताच्या पिढीला जुनी गाणी अजिबात लक्षात नाही. रिमिक्सच्या माध्यमातून हीच गाणी अनेकदा पुन्हा एकदा आपल्यासमोर येतात. आता आणखी एक रेट्रो गाण नव्या अवतारात पाहायला मिळणार आहे. नुकत्याच या गाण्याचा टीझर आला असून या व्हिडिओमध्ये नोरा फतेह थिरकताना दिसत आहे. या आधी ‘साकी साकी’ या गाण्यावर थिरकताना ती दिसली होती. आता या व्हिडिओतील तिच्या अदा सगळ्यांना घायाळ करत आहेत. 10 ऑक्टोबर रोजी हे संपूर्ण गाणे रिलीज करण्यात येणार आहे.

सानिया मिर्झाच्या बहिणीचा दुसरा निकाह लवकरच....

हे रेट्रो गाणे कोणते?

 ‘एक तो कम जिंदगानी’ असे या गाण्याचे बोल असून या गाण्याचा व्हिडिओ नुकताच पोस्ट करण्यात आला आहे. या गाण्यामध्ये नोरा एका शॉर्ट पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या या हॉट ड्रेससोबतच तिच्या अदाही अगदी खास आहे. आता हे गाणे ऐकल्यानंतर तुम्हाला तुम्हाला या गाण्याचे बोल कुठेतरी ऐकल्यासारखे वाटत असेल तर हो हे एक रेट्रो गाणे आहे.  त्यामुळेच पुन्हा एकदा जुन्या गाण्याचे रिमिक्स करण्याचा प्रयत्न असे आम्ही म्हटले. या गाण्याचे नवे व्हर्जन नेहा कक्कर हिने गायले आहे. 

पाहा व्हिडिओ

रेखा दिसल्या होत्या गाण्यात

आता रेट्रो गाणे म्हटल्यावर तुम्ही लगेचच गुगल करुन पाहिले असेलच की, हे नेमकं गाणं कोणतं? जुनं गाणं हे 1986 साली आलेल्या जहाबांज या चित्रपटातील असून हे गाणं ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्यावर चित्रीत करण्यात. आले आहे. हे एक डिस्को गाणे असून या गाण्याचे बोल ‘प्यार दो प्यार लो’ असे सुरु होतात. 1986चा काळ पाहता या चित्रपटात रेखा यांचा अंदाज फारच बोल्ड आहे. त्याने राणी कलरचा सिक्वेन्स ब्लाऊज आणि लाँग फिशकट स्कर्ट यात परिधान केला आहे. तुम्हाला या गाण्याची आठवण ताजी करायची असेल हा व्हिडिओ नक्की पाहा.

नवीन रुपात येणार रंगीला… पोस्टरने आताच घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

'मरजावा'चित्रपटाची जोरदार तयारी

Instagram

सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारीया यांचा ‘मरजावा’ चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आला असून या चित्रपटात सिद्धार्थ आणि ताराची महत्वाची भूमिका असली तरी रितेश देशमुख या चित्रपटात नक्कीच भाव खाऊन जाणार आहे. कारण या चित्रपटात तो एका बुटक्या व्हिलनची भूमिका साकारत आहे. सिद्धार्थसाठी हा व्हिलन काही नवीन नाही. पण त्याचा अंदाज या चित्रपटात फारच वेगळा असणार आहे. या शिवाय या चित्रपटात राकुल प्रीतही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रितेशची होईल चर्चा

Instagram

रितेश नेहमीच वेगळ्या भूमिकांना प्राधान्य देतो. कॉमेडीपासून ते अगदी व्हिलनपर्यंत त्याने आतापर्यंत भूमिका साकारल्या आहेत. पण या चित्रपटात तो चक्क बुटका दाखवण्यात येणार आहे. एका गँगचा तो लीडर असल्याचे सध्या आलेल्या ट्रेलरमधून तरी दिसत आहे. 

आता हे गाणं पाहिल्यानंतर याचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्याची इच्छा तुम्हाला नक्कीच झाली असेल. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.