नोराचा हॉट आणि सिझलींग अंदाज करेल तुम्हाला घायाळ

नोराचा हॉट आणि सिझलींग अंदाज करेल तुम्हाला घायाळ

नोराचा डान्स म्हणजे कमालच असतो. तिचे डान्समधील लटके-झटके कित्येकांना घायाळ करतात.आता तुम्हाला आणखी एकदा घायाळ करायला नोराचा एक नवा व्हिडिओ आला आहे. या व्हिडिओमधील नोराची अदा पाहाल तर तुम्ही देखील फिदा होऊन जाल. नोराने स्वत:च हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. आणि अगदी काही कालावधीत तो वायरल झाला आहे. व्हाईट कलरचा हॉट ड्रेस यात नोराने घातला असून ती बेली डान्स करताना यामध्ये दिसत आहे.त्यामुळे हा व्हिडिओ पाहायलाच हवा.

नोराचा हा हॉट अंदाज साऊथ सिनेमातील


नोराने बॉलीवूडमध्ये ‘दिलबर गर्ल’ म्हणून ओळख मिळवली. तिच्या डान्सिंग मुव्हज या इन्स्टाग्रामवर या आधीही प्रसिद्ध होत्या.'सत्यमेव जयते'मधून तिने बॉलीवूड पदार्पण केलं असं म्हणायला हवं. कारण त्यानंतरच तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने स्त्री चित्रपटात ‘कमरिया’ या गाण्यावर जो डान्स केला तो देखील खूप प्रसिद्ध झाला आणि आता ती एका साऊथच्या सिनेमात दिसणार आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमधील गाणे हे त्याच चित्रपटातील असून ‘कयामकुलम कोचुनी’ असे या मल्ल्याळम चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट ऑक्टोबर २०१८ रोजी रिलीज झाला. इतिहासातील घटनेवर आधारीत असा हा चित्रपट असून हा चित्रपट २०१८मधील सुपरडुपर हिट चित्रपट ठरला होता. तिने आता या तिच्या फॅन्ससाठी हा व्हिडिओ अपलोड केल्याचे सांगितले जात आहे.


norah fatehi


नोरा उत्तम डान्सर


नोराचा डान्स तुम्ही या आधीही सोशल मीडियावर पाहिला असेल. ती उत्तम बेली डान्सर आहे. शिवाय ती इतर फॉर्ममधील डान्सही चांगला करते. बॉलीवूडमध्ये संधी मिळण्याआधी तिने टॉलीवूडमधील कितीतरी गाणी केली आहेत. तिच्या याच अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर 'बाहुबली २'मधील  एका गाण्यातही नोराचा एक वेगळा अंदाज तुम्ही पाहिला असेलच. या शिवाय अनेक गाण्यांवर तिने उत्तम डान्स केला आहे. आता नोराच्या डान्सबद्दल काहीच सांगायला नको. 


सारा आणि कार्तिक करणार रोमान्स

अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभाग


नोरा देखील अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. डान्स रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती. तर एमटीव्हीच्या एक रिअॅलिटी शोमध्ये तिने होस्ट म्हणून काम केले आहे. त्यामुळे ती आता अभिनयाकडे वळेल का? असे प्रश्न तिचे फॅन्सदेखील करत आहेत. पण सध्या तर अभिनयाकडे वळण्याचे नोराचे कोणतेच चान्स नसून ती चित्रपटातील वेगवेगळ्या गाण्यांवर हॉट आणि सिझलींग नाचणेच पसंत करत आहे. आता २०१९ या वर्षात नोराचा काय वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार यासाठी आपल्या थोडी वाट पाहावी लागेल.


भोजपुरी स्टारची मुलगी करतेय बॉलीवूडमध्ये डेब्यु


नोराचा फिटनेस फंडा


नोरा तिच्या डान्स मुव्हजसोबतच तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. तिची सेक्सी फिगर पाहिली की, याचा चांगलाच अंदाज येतो. तिचे अॅब्स आणि तिची एकूणच फिगर चर्चेचा विषय असते. पण त्यासाठी ती मेहनतही तितकीच घेते .तिने तिच्या फिटनेसचेही अनेक व्हिडिओ आतापर्यंत शेअर केले आहेत. या व्हिडिओजना देखील तितकेच व्हयुज आहेत. पण तिच्या या सेक्सी फिगर मागे तिची प्रचंड मेहनत आहे हे मात्र नक्की!


एम टाऊनच्या कपलचे सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशन


(फोटो आणि व्हिडिओ सौजन्य- Instagram)