नव्वदच्या दशकातील मालिकाच नाही जाहिरातदेखील होत्या सुपरहिट

नव्वदच्या दशकातील मालिकाच नाही जाहिरातदेखील होत्या सुपरहिट

कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. मालिकांचे शूटिंग बंद असल्यामुळे जुन्या मालिकांचा काळ पुन्हा परत आला आहे. घरात बसून सर्वजण ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पुन्हा पाहत आहेत. सहाजिकच त्यामुळे सर्वांना त्यांचे बालपण पुन्हा एकदा अनुभवता येत आहे. मात्र नव्वदच्या काळातील मालिकाच नाही तर काही जाहिरात देखील सुपरहिट झाल्या होत्या. ज्या आजही लोकांच्या स्मरणात कायम आहेत. म्हणून आज आपण अशाच काही जुन्या जाहिराती पुन्हा नव्याने आठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

निरमा वॉशिंग पावडर -

नव्वदच्या काळातील लोकांनी ही जाहिरात पाहिली नसेल असं मुळीच होणार नाही. कारण ही जाहिरात त्या काळात फारच लोकप्रिय होती. त्यामुळे निरमा म्हटलं की, " हेमा, रेखा, जया और सुषमा... सबकी पसंद निरमा" या ओळी आणि चित्र समोर येतं. वॉशिंग पावडरची जाहिरात असूनही आकर्षक टॅगलाईनमुळे ती नक्कीच सर्वांच्या लक्षात राहिली. 

नेरोलॅक पेंट -

गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आली की घराची सजावट करणं हे मुख्य काम असतं. घराची सजावट अथवा घराला रंगकाम करायचं असेल तर आजही लोकांच्या डोळ्यासमोर नेरोलॅक पेंटच येतो. कारण हा प्रभाव आहे नव्वदीच्या काळातील या जाहिरातीचा. " जब घर की रौनक बढानी हो या दिवारों को जब सजाना हो... नेरोलॅक...नेरोलॅक. हे जणू त्या काळी लोकांच्या मनावर बिंबवण्यातच आलं होतं. ज्यामुळे आजही लोकांना या जाहिरातीबाबत नक्कीच आकर्षण आहे. 

हमारा बजाज -

त्या काळी हमारा बजाज ही जाहिराच जणू एखाद्या स्फुर्तीगीतप्रमाणे वाटायची. ज्यामुळे बजाज स्कुटरचा भाव तर वधारला होताच पण या जाहिरातीलाही प्रसिद्धी मिळाली.  बजाज स्कुटर प्रत्येकाला आपली वाटण्यामागे या जाहिरातीचा खूप मोठा वाटा आहे. 

बादशाह मसाला -

नव्वदच्या दशकात प्रत्येत गृहिणीला स्वयंपाक घरात फक्त बादशाह मसालाच हवा असायचा. याचं कारण होतं बादशाह मसाल्याची ही अप्रतिम जाहिरात. "स्वाद सुंगध का राजा बादशाह मसाला" गुणगुणत जणू काही घरातच स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा घमघमाट सुटला आहे असं वाटायचं. विशेष म्हणजे जवळजवळ नव्वदीचं संपूर्ण दशक म्हणजे दहा वर्षांहून जास्त काळ ही जाहिरात लोकांना आवडत होती. 

विको टर्मरिक -

आज बाजारात अनेक सौंदर्योत्पादने आहेत. मात्र नव्वदीच्या काळात विको टर्मरिक हीच सर्वांसाठी एकमेक कॉस्टमेटिक क्रीम होती. ज्यामुळे 'विको टर्मरिक नही कॉस्टमेटिक'... त्वचा की सुरक्षा करे आयुर्वेदिक क्रीम"  कडव्यामुळे घरातील प्रत्येकाला ही क्रीम हवी असायची. अर्थात याचं कारण या जाहिरातीचा प्रभाव हेच होतं.  

लिरिल साबण -

तुम्हाला प्रिती झिंटाची लिरील सोपची जाहिरात तर माहीत असेलच ना…. ला...ला… करत पाण्यात उड्या मारणाऱ्या ‘प्रितीने लिरिल’ गर्ल असं स्वतःचं वेगळं स्थानच त्या काळी निर्माण केलं होतं. ज्यानंतर प्रिती कायम एक बबली गर्लच्या भूमिकेत राहिली. आजही अनेक जण तिच्या गालावरील खळ्यांवर फिदा होतात. 

अर्थात त्या आधी आणि त्या नंतर अनेक जाहिराती झाल्या असतील पण या जाहिराती आठवताना काहींना त्यांचं बालपण समोर दिसलं असेल यात नक्कीच शंका नाही. त्या काळात या जाहिराती लोकांच्या मनोरंजनाचं केंद्रबिंदू होत्या. म्हणूनच कलात्मक पद्धतीने तयार केलेल्या आणि लोकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या जाहिराती आजही अजरामर आहेत. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम 

हे ही वाचा -

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा

अधिक वाचा -

लॉकडाऊनमुळे जुन्या मालिका आल्या पुन्हा ट्रेंडमध्ये

या जुन्या मालिकांचे टायटल ट्रॅक तुम्हाला आजही आवडतात का?

वेबसिरीज आल्या तरी या 5 जुन्या मालिका अजूनही हव्याहव्याशा