ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
कोरोनाच्या काळातही चित्रपट होणार रिलीज, पण या ठिकाणी

कोरोनाच्या काळातही चित्रपट होणार रिलीज, पण या ठिकाणी

मार्च महिन्यापासून चित्रपटसृष्टीला जणू कोरोनाचे ग्रहण लागले आहे. इरफान खानचा अंग्रेजी मिडियम हा चित्रपट मार्चमध्ये रिलीज झाला आणि त्यानंतर कोरोनामुळे सोशल डिस्टसिंग पाळण्यासाठी सगळी थिएटर एका मागोमाग एक बंद करण्यात आली. अनेक मोठया बॅनरचे चित्रपट या काळात प्रदर्शित होणार होते. पण दुर्देवाने लॉकडाऊनमुळे एकही चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. ज्या चित्रपटांचे काम पूर्ण झाले आहे. असे चित्रपट रिलीज होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. पण गेल्या तीन महिन्यांपासून देश लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन कधी संपेल आणि सगळं पूर्ववत कधी सुरु होईल याबद्दल अद्याप कोणालाच काही माहीत नाही. यावर तोडगा म्हणून काही चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाहीत तर त्यावर एक वेगळीच शक्कल लढवण्यात आली आहे. नेटफ्लिक्स, हॉट स्टार, अमेझॉन प्राईम यांचा आधार घेत हे चित्रपट रिलीज केले जाणार आहेत. अशी माहिती अनेक कलाकारांनी स्वत:च त्याच्या सोशल मीडियावरुन दिली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना घरबसल्या प्रेक्षकांना मोबाईलवरच हे नवे चित्रपट पाहता येणार आहेत.

या अभिनेत्रींनी प्रेग्नंट असूनही घेतला नव्हता अभिनयातून ब्रेक

हे चित्रपट होणार रिलीज

लॉकडाऊनमुळे अनेक जण घरीच बसून काम करत आहेत. त्यामुळे नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार यावर अनेक जण सीरिज पाहात काम करत आहेत. त्यामुळेच काही चित्रपटांना या ठिकाणीच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काहीच दिवसांपूर्वी अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली होती. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा त्याचा आगामी चित्रपट हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार असल्याची ही पोस्ट होती. आता अक्षय कुमारच्या या चित्रपटाची प्रतिक्षा अनेकांना होती. कारण कॉमेडी आणि हॉरर असा हा चित्रपट साऊथच्या चित्रपटाचा रिमेक आहे. पण आता घरबसल्या लोकांना फर्स्ट जे फर्स्ट शो पाहता येईल असे त्याने यामध्ये म्हटले आहे. आता हा एकमेव चित्रपट नाही तर अशाच पद्धतीने काही चित्रपट रिलीज होणार असल्याचे कळत आहे. यामध्ये ‘भूज’ (अजय देवगण, संजय दत्त), ‘सडक २’ (आलिया, आदित्य रॉय कपूर), द बिग बुल (अमिताभ बच्चन), ‘लुटकेस’ (कुणाल खेमू), खुदा हाफिज (विद्युत जामवाल), दिल बेचारा (सुशांतसिंह राजपूत) हे काही चित्रपट रिलीज होणार आहेत. यांच्या तारखाही काहींनी सांगितल्या आहेत.

अंडरवर्ल्डच्या संपर्कामुळे संपले या अभिनेत्रींचे करीअर

ADVERTISEMENT

का घेतला असेल निर्णय?

 मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे सगळे काही पालटून गेले. आता सगळ्या गोष्टी कधी पूर्ववत होतील याची निश्चित तारीख सांगता येत नाही. चित्रपटांच्या निर्मात्यांनी त्यामध्ये गुंतवलेला पैसा आणि सध्या देशाची आर्थिक परिस्थिती पाहता नुकसान होण्यापेक्षा योग्य निर्णय घेणे बरे ही भूमिका लक्षात घेतच कदाचित चित्रपट निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असावा, असे वाटत आहे. यामुळे थिएटर चालकांनाही याचे नुकसान होणार आहे. पण तरीही डिजिटल आणि थिएटर चालकांचे याबाबतीतले निर्णय सुरु आहे. 

आता कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोट होणार ते तर चित्रपट निर्मातेच जाणे पण सध्याच्या घडीला मात्र तुम्हाला घरबसल्याच चित्रपट पाहता येणार हे मात्र नक्की! त्यामुळे घरी राहा आणि आनंदी राहा.

लॉकडाऊनमध्ये टायगर आणि दिशा लिव्ह-इनमध्ये रहात असल्याची चर्चा

01 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT