दिवाळीची धूम पूर्ण देशभरात सुरू होती. सामान्य लोकांसह बॉलीवूडमधील सेलिब्रिटीदेखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी अनेक ठिकाणी दिवाळी सेलिब्रेशन करण्यात आलं आणि यामध्ये बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलंही दिसली. नुकतीच अजय देवगण आणि काजोलची मुलगी निसा देवगणसुद्धा एका दिवाळी पार्टीमध्ये दिसली होती. नेहमी वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसणारी निसा दिवाळी दरम्यान मात्र पारंपरिक वेषामध्ये दिसली. निसा यावेळी काही जणांना खूपच सुंदर वाटली तर काही जणांनी पुन्हा एकदा निसाला ट्रोल केलं आहे. निसाने क्रिम कलरचा लेहंगा घातला होता. मात्र तिने केलेला मेकअप इतका जास्त होता की, लोकांनी तिला यावर भरपूर ट्रोल केलं आहे.
निसाला याआधी देखील बऱ्याच गोष्टींवरून ट्रोल करण्यात आलं आहे. त्यावर अजय देवगणदेखील बऱ्याचवेळा सोशल मीडिया आणि फोटोग्राफर्सवर रिअॅक्ट झाला आहे. मात्र कितीही काही झालं तरी निसाला बऱ्याचदा ट्रोल करण्यात येतं. निसा नेहमीच वेस्टर्न कपड्यात दिसते. मात्र यावेळी दिवाळी पार्टीला ती छान पारंपरिक वेषात आपल्या मैत्रिणीसह दिसली. मीडिया फोटोग्राफर्सने तिला जेव्हा फोटोसाठी विचारलं तेव्हा तिने खूपच प्रेमाने स्माईल करत म्हटलं जायचं आहे. तिने अतिशय सकारात्मक रितीने हे मीडियाला सांगितलं. तिचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. तिची वागण्याची पद्धत जरी सगळ्यांना आवडली असली तरीही तिचा मेकअप मात्र चर्चेचा विषय ठरला. निसाने केलेला मेकअप हा खूपच जास्त प्रमाणात होता अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तिचा हा मेकअप अतिशय वाईट असून तिने 150 किलोचा मेकअप चेहऱ्यावर थोपला आहे का अशाही काही प्रतिक्रिया या व्हिडिओवर आलेल्या पाहायला मिळाल्या.
काही दिवसांपूर्वीदेखील निसाला ट्रोल करण्यात आलं होतं. तेव्हा अजयने या सर्वावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. निसाला मिळणाऱ्या अटेन्शनबद्दल अजय अजिबात आनंदी नाही. अजयने सांगितलं की, निसाला हे आवडत नाही आणि आम्हालाही आवडत नाही. मुलांना एकटं सोडायला हवं. ते कुठेही जातात तेव्हा त्यांचा फोटो काढला जातो. त्यांना त्यांचं आयुष्य जगता येत नाही. त्यांना त्यांचं खासगी आयुष्य असतं हे मीडियानेदेखील लक्षात ठेवायला हवं. मुलांनादेखील या सगळ्या गोष्टींचं टेन्शन येतं. त्यांना कुठेही जायचं असलं की, उगाचच स्वतःकडे विनाकारण जास्त लक्ष द्यावं लागतं अन्यथा त्यांना ट्रोल करण्यात येतं. पण याची खरंच गरज नाही. त्यांना त्यांचं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांना तसं जगू द्या असंही अजयने सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा निसा ट्रोल झाली आहे त्यामुळे पुन्हा अजय देवगण यावर काही प्रतिक्रिया देणार का याची सर्वांना उत्सुकता आहे. काही जणांना निसाचा हा लुक आवडला तर काही जणांनी तिच्या मेकअपवर तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजयची रागीट बाजू मीडियाला पाहावी लागणार का? असाही प्रश्न सध्या येतो आहे. निसा सध्या बऱ्याचदा तिच्या आईवडिलांबरोबर अथवा तिच्या मित्रमैत्रिणींंबरोबर दिसते. तिचे खूप व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. पण ती जास्त थांबत नाही अथवा पोझही देत नाही. तिला या सगळ्याची आवड नाही. पण तरीही तिला बऱ्याचदा केवळ अजय आणि काजोलची मुलगी असल्यामुळे या सगळ्याला सामोरं जावं लागत आहे.
अजय- काजोलच्या निसावर पापाराझींचे बारीक लक्ष
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.