‘कसौटी जिंदगी’च्या सेटवर जेव्हा प्रेरणाने लावला कोमोलिकाला रंग

‘कसौटी जिंदगी’च्या सेटवर जेव्हा प्रेरणाने लावला कोमोलिकाला रंग

सीरियल ‘कसौटी ज़िंदगी की’ ही नेहमी काही ना काही कारणानेे चर्चेत असते. जेवढी प्रसिद्ध सीरियल तितक्या कॉन्ट्रोव्हर्सीज हे ठरलेलंच. सीरिअलच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास अनुराग- प्रेरणाचं प्रेम आणि कोमोलिकाची कारस्थान प्रेक्षकांना फारच आवडत आहेत. तर रियल लाईफमध्येही या कलाकाराचं बाँडीग स्ट्राँग आहे. सेटवर नेहमीच हे कलाकार मजामस्ती करताना आढळतात. मग होळीच्या सेलिब्रेशनमध्ये कसे मागे राहतील. नुकतंच कसौटी च्या सेटवर होळीचं धम्माल सेलिब्रेशन करण्यात आलं, ज्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


निवेदिताला जमीनीवर पाडून खेळली होळी


प्रेरणा आणि निवेदिता भलेही ऑनस्क्रीन एकमेंकीशी भांडत असतील पण ऑफस्क्रीन दोघीही भरपूर मस्ती करताना दिसतात. अशीच काहीशी मस्ती पाहायला मिळाला कसौटीच्या ऑफ कॅमेरा सेटवर. जिथे सीरियलमधला अनुरागची भूमिका करणारा पार्थ आणि अनुपमच्या भूमिकेतील साहिल आनंद यांनी निवेदिता म्हणजेच पूजा बॅनर्जीला जमिनीवर पाडून मस्तपैकी होळी खेळली. होळीचा हा मस्तीपूर्ण व्हिडीओ शूट केला प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडीसने. या व्हिडीओमध्ये सर्व स्टार्स एन्जॉय करत आहेत. सगळ्यांनीच पूजा बॅनर्जी घेराव घालून तिच्या चेहऱ्यावर आणि केसांना मस्तपैकी रंग लावला आहे. तुम्हीही पाहा कसौटीच्या सेटवरचा हा मजेदार व्हिडीओ -

सवत माझी मैत्रीण


तुमच्या माहितीसाठी एरिका म्हणजेच प्रेरणाची होळीची धम्माल फक्त निवेदितावर संपला नाही. एरिकाची पुढची सावज बनली तिची सवत कोमोलिका म्हणजेच हिना खान. एरिकाने हिनाला असा काही रंग लावला की, तिला ओळखणंही कठीण झालं. खरंतर यावेळी हिना तिच्या कोमोलिका या भूमिकेच्या कॉस्च्यूम्समध्ये नव्हती, ज्याचा फायदा एरिकाने उचलला. जेव्ही हिना खानची रंग लावायची वेळ आली तेव्हा एरिकाने मी तर शूटींगच्या कॉस्च्यूम्समध्ये आहे. त्यामुळे मला रंग लावता येणार नाही आणि सफाईदारपणे पळ काढला. तुम्हीच बघा हा सवत माझी मैत्रीणीचा हा मस्तीपूर्ण व्हिडीओ...


कोमोलिकाचं स्टाईलिश होळी काॅस्च्यूम


सीरियल कसौटीमध्ये कोमोलिका नेहमीच स्टाईलिश मेकअप आणि कपड्यांमध्ये दिसते. तिच्या लुकबाबत खूपच काळजी घेतली जाते. होळीसाठीही कोमोलिकाचा लुक खूपच स्टाईलिश आणि दमदार होता.
 

 

 


View this post on Instagram


 

 

🔥🌈 #KomoliciousSwag #HoliSwag


A post shared by Hina Khan (@realhinakhan) on
ज्याचे फोटो हिनाने तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले होते. होलीच्या सीनसाठी कोमोलिकाने व्हाईट कलरची सुंदर साठी नेसली होती. जिचा लुक खूपच हटके होता.फोटो सौजन्य :Instagram


हेही वाचा - 


‘कुमकुम’ उर्फ जूही परमारने केला मुलीसोबत 'चोगाडा तारा' हा डान्स


'उतरन' सीरियलमधील इच्छा आणि तपस्या पुन्हा एकत्र


कोमोलिकाच्या अवतारात आता 'ही' अभिनेत्री देणार अनुराग- प्रेरणाला त्रास