#oopsmoment होता होता वाचली शिल्पा शेट्टी

#oopsmoment होता होता वाचली शिल्पा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या कुटुंबासोबत युरोपमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. युरोप टूरमधील तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. शिल्पा शेट्टीचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. नुकताच तिने युरोपमधील एका क्रुझवर पोझ देतानाचा व्हिडिओ तिच्या इंन्स्टा अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यात ती या क्रुझवर मस्त थंड हवेचा आस्वाद घेत फोटोची पोझ देत होती. मात्र या दरम्यान असं काही घडलं की ती तिला स्वतःलाच तिचं हसू आवरता आलं नाही. कारण शिल्पा फोटोसाठी पोझ देत असताना चुकीच्या दिशेने वारा वाहू लागला आणि शिल्पाचा ड्रेसदेखील त्या हवेसोबत उडू लागला. शिल्पाने प्रसंगावधान राहत तिचा ड्रेस लगेच सावरून घेतला. ज्यामुळे ती त्या Opps moment पासून वाचू शकली. मात्र यावर तिलाच एवढं हसू आलं की तिने एका मजेदार कॅप्शनसह हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. शिवाय तिने "ही माझी मर्लिन मुनरो मोमेंट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे मी काय म्हणतेय ते कळेल असं म्हटलं आहे."

शिल्पा युरोपमध्ये अशी करतेय मौजमस्ती

शिल्पा शेट्टी सध्या युरोपमध्ये राज कुंद्रासह वेकेशनवर आहे. काही दिवसांपासून शिल्पा युरोप ट्रिपमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिने तिच्या समर पार्टीचे  काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती सचिन तेंडूलकर, पती राज कुंद्रा आणि तिचा मुलगा वियान, बहिण शमीता शेट्टी, पार्टीचे होस्ट सीम कंवर आणि निरज कंवर यांच्यासोबत दिसत होती. शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर 3’ मध्ये परिक्षक होती. नुकताच सुपर डान्सरचा तिसरा भाग संपला आहे. सहाजिकच त्यामुळे ती पती आणि मुलासह युरोप वेकेशनवर गेली आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिचा आणखी एक मजेदार व्हिडिओ शेअर केला होता. ज्याला तिच्या चाहत्यांनी मजेशीर कंमेट्स दिल्या होत्या. शिल्पाने हा व्हिडिओ लंडनमधून हा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये शिल्पा एका तळ्याकाठी काही बदकांना ब्रेड खाण्यास देत होती. मात्र अचानक काही बदक तिच्या फारच जवळ आल्याने शिल्पाची घाबरगुंडी उडाली. ज्यामुळे तिने हातातील ब्रेड टाकून दिला आणि चक्क तिथून पळ काढला. शिवाय तिने राज, शिल्पा आणि तिचा मुलगा वियान दरवर्षी बदकांना खाऊ घालण्यासाठी लंडनमध्ये जातात असंही या दरम्यान सांगितलं होतं. बदकांनी ब्रेडसोबत मला चोच मारली असती म्हणून मी घाबरले कारण बदकांची चोच टोकदार नसली तरी मोठी आणि लांब असते असं तिने या व्हिडिओसोबत शेअर केलं होतं.

शिल्पा पुन्हा करतेय बॉलीवूडमध्ये कमबॅक

शिल्पाने पुन्हा चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिल्पाने बारा वर्षापूर्वी उद्योगपती राज कुंद्रासोबत लग्न केलं. लग्न आणि मुलाच्या जन्मानंतर शिल्पा चित्रपटसृष्टीपासून दूर गेली होती. ‘लाईफ इन मेट्रो’ नावाचा तिचा तसा शेवटचा चित्रपट त्यानंतर ती चित्रटातून दिसली नाही. मात्र शिल्पा आता पुन्हा तिच्या चाहत्यांना चित्रपटातून दिसणार आहे. शिल्पा नेमक्या कोणत्या चित्रपटात काम करण्यार आहे हे मात्र अजून जाहीर करण्यात आलेलं नाही. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने चित्रपटात कमबॅक करण्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. ती म्हणाली की, माझ्याकडे चांगली स्क्रिप्ट आली असून मी ती करण्याच्या विचारात आहे. लवकरच या संदर्भातील घोषणा मी माझ्या चाहत्यांसाठी करणार आहे. असे शिल्पाने सांगितले आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी चित्रपटात पुन्हा येत आहे हे नक्की! शिल्पा शेट्टीने सुपरहिट ठरलेल्या बाजीगर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केल होतं. तिचा या चित्रपटातील रोल हा फार मोठा नसला तरी अत्यंत महत्वाचा होता. या चित्रपटानंतर शिल्पा शेट्टी कधीच थांबली नाही. तिने एका पेक्षा एक चांगले असे चित्रपट केले. त्यामुळे तिचे बॉलीवूडमधील स्थान अढळ आहे. अभिनयाव्यतिरिक्त तिला फिटनेसची आवड असल्यामुळे ती तिचे अनेक फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे अनेक योगा व्हिडिओ परदेशातही प्रसिद्ध आहेत.

अधिक वाचा

आता या नव्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकतील का,तुम्हाला काय वाटतं

नाट्यगृहातील अपुऱ्या सुविधेच्या अभावी अभिनेत्यांनी व्यक्त केला संताप

Confirmed : करण पटेलने सोडली 'ये है मोहब्बतें' सीरियल

फोटोसौैजन्य - इन्स्टाग्राम