2020 मध्ये यांचे उजळून निघाले भाग्य, मिळाली अमाप प्रसिद्धी

2020 मध्ये यांचे उजळून निघाले भाग्य, मिळाली अमाप प्रसिद्धी

प्रसिद्धी मिळवणे हे काही सोपे नाही. या साठी फार मेहनत घ्यावी लागते. लोकांपर्यंत पोहोचण्यसाठी संयम लागतो. काहींना अगदी सहज आणि अचानक अशी काही प्रसिद्धी मिळते की एका रात्रीत या व्यक्ती स्टार या पदाला पोहोचतात. 2020 चा काळ हा फार फार काही चांगला नसला तरी देखील काहींना या वर्षाने भरपूर दिले आहे. त्यामुळेच त्यांना हे वर्ष चांगलेच लक्षात राहणार आहे. जाणून घेऊया अशा काही व्यक्ती ज्या 2019 मध्ये जगत होत्या सर्वसामान्य आयुष्य पण 2020 ने बदलले त्यांचे भविष्य आणि मिळवून दिली अमाच अशी प्रसिद्धी

यशराज मुखाते ( Yashraj Mukhate)

एखाद्या गोष्टीची पॅरडी किंवा मनोरंजनात्मक गाणी तयार करणे अनेकांना आवडते. पण यशराज मुखाते याला याच मनोरंजनात्मक गाण्यातून प्रसिद्धी मिळाली. आता ‘रसोडे मे कौन था?’ याचे उत्तर आता सगळ्यांनाच माहीत झाले आहे. यशराज मुखातेने साथ निभाना साथिया या प्रसिद्ध मालिकेचा एक डायलॉग घेऊन त्याने हे छोटसं गाणं तयार केलं आणि ते अगदी तासाभरात इतकं प्रसिद्ध झालं की, रातोरात त्याचा एक फॅनक्लब तयार झाला. अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडिओचा फनी रिमेकही केला.जे व्हिडिओ आजही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर गाजत आहेत. यशराजने या आधीही काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये राखी सावंत आणि सोशल माडियावरील प्रसिद्ध डायलॉगमधूनही गाणी केली आहे. आता त्याचे चाहते जगभरात आहेत. तो एक प्रसिद्ध कलाकार झाला असून त्याला ही अमाप प्रसिद्धी एका रसोडा व्हिडिओमधून मिळेल असे कधी वाटलेही नव्हते.

राणू मंडल ( Ranu Mondal)

रेल्वेस्टेशनवर गाणे ते प्ले बॅक सिंगर असा राणू मंडलचा प्रवास अनेकांना माहीत आहे. अत्यंत गरीब अवस्थेत असलेल्या राणू मंडलला कधीही अशी प्रसिद्धी मिळेल असे वाटले नव्हते. 2019 च्या शेवटाला तिला हिमेश रेशमियाने त्याच्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. एका रात्रीत ती इतकी मोठी स्टार झाली की, तिला भेटण्यासाठी तिची मुलाखत घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागू लागल्या. तिचे आयुष्य संपूर्ण पालटून गेले. पण ही प्रसिद्धी फार काळासाठी टिकून राहिली नाही. 2020 या वर्षात राणू मंडलचा एक वेगळा चेहरा सगळ्यांच्या समोर आला. प्रसिद्धीमुळे बदलेले वागणे आणि आलेला उद्धटपणा यावर सोशल मीडियाच्य माध्यमातून कडाडून टीका होऊ लागली. ज्या राणू मंडलला लोकांनी उचलून धरले तिलाच 2020 मध्ये जमिनीवरही आपटवले. त्यामुळे राणू मंडलची प्रसिद्धी अगदी 6 महिन्यातच धुळीला मिळाली. तरीही चुकीच्या वागण्यामुळे ती काही काळ लोकांच्या नजरेत वाईट का असेना पण प्रसिद्धीत राहिली.

‘या’ व्यक्तीमुळे स्टेशनवर गाणारी राणू मंडल बनली बॉलीवूड गायिका

स्मिता सातपुते

सोशल मीडियावर अनेकांना एडिट न केलेले खरेखुरे व्हिडिओ पाहायला आवडतात. स्मिता सातपुतेचं युट्युब चॅनल हे त्याचेचच एक उदाहरण आहे. ती आधी टिकटॉकवर असतानाही प्रसिद्ध होती आणि आता युट्युबर झाल्यावरही प्रसिद्ध आहे. तिचे व्हिडिओ इंटरटेनिंग असले तरीही लोकांना आवडतात. अंधेरीतील लोखंडवाला परिसरात ज्यांच्या घरी ती जेवणाचे काम करते तेथे तिच्या झट की पट यमी यमी रेसिपी कशा बनवते ते सगळ्यांना अन एडिटेट व्हिडिओजच्या माध्यमातून दाखवते. त्यामुळेच तिच्या व्हिडिओला पसंती मिळते. ;यमी यमी’ हा तिच्या तोंडून येणारा शब्दही अनेकांना माहीत झाला आहे. तिची ओळखच हा शब्द झाली आहे. अगदी कमीत कमी साहित्यात रोजचं जेवण कसं बनवायचं ते शिकावं तर स्मिता सातपुतेकडून. कमीत कमी शिक्षण आणि एकट्या मुलाला सांभाळण्यासाठी करणारी मेहनत अनेकांना आवडली आहे. त्यामुळेच ती आता जवळजवळ लाखांच्या घरात पोहोचली आहे. तिचे फॉलोअर्स झपाट्याने वाढत असून तिने या लॉकडाऊनच्या काळातच आपले चॅनल सुरु केले आहे. कोरोना काळात सुरु केलेल्या तिच्या चॅनलला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी तिचे व्हिडिओ पाहिले आहेत. 

एका रात्री प्रसिद्धीच्या शिखरावर चढल्या या व्यक्ती

अक्षय पारकर

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना बिझनेसची संधी मिळवून दिली.ज्यांना कधीही वाटले नव्हते की, ते कधी बिझनेस करु शकतील अशांनाही बिझनेसची संधी उपलब्ध करुन दिली. अक्षय पारकर नावाचा एक क्रुझ शेफ. कोरोनाच्या काळात जो घरी आला तो पुन्हा त्याच्या नोकरीवर जाऊच शकला नाही. बेताची परिस्थिती असल्यामुळे काहीतरी हालचाल करणे गरजेचे होते. नोकरी मिळणे शक्य नव्हते. म्हणूनच असलेल्या कलेचा उपयोग करत त्याने बिर्याणी स्टॉल सुरु केला. त्याच्या बिर्याणीच्या चवीमुळे त्याला अगदी रातोरात प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळवून दिल्यामुळेच त्याच्याकडे लोकांच्या रांगा लागू लागल्या. अक्षय पारकरची पारकर्स बिर्याणी सध्या अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबईत सध्या चर्चा आहे ती पारकर बिर्याणीची. काय आहे या मागची कहाणी

रंजना यशवंत चव्हाण

 खाण्याचे अनेक व्हिडिओ युट्युबर चांगलेच चालतात. असे बरेच युट्युब चॅनेल असतात जे येतात  पण ते फारसे चालत नाही. पण काही चॅनल मात्र चांगलेच चालतात. असेच एक चालणारे चॅनेल आहे ते म्हणजे टेस्टी खाना. रंजना यशवंत चव्हाण असे या युट्यबरचे नाव असून सध्या या दिल्लीत राहात असून त्यांच्या मुलांच्या अनेक व्हिडिओमध्ये त्या आतापर्यंत दिसल्या आहेत. पण त्यांच्याकडे असलेले उत्तम स्वयंपाक कौशल्य सोशल मीडियावर चांगले हिट झाले. लॉकडाऊनच्या काळात मुलासोबत परदेशात अडकलेल्या या जोडप्याने देसी जेवणापासून परदेशी जेवणाचा आनंद लुटला. त्यामुळे त्यांचे व्हिडिओ अधिक पाहिले गेले.साधारण एप्रिल महिन्यात हे चॅनेल सुरु करण्यात आले. आता या चॅनेलचे तब्बल 1 लाख 52  हजार फॉलोअर्स असून त्यांचे फॉलोवर्स दिवसेंदिवस वाढत आहेत 


तर हे काही युट्युब आणि सोशल मीडियावरील अशा व्यक्ती आहेत ज्यांना एका रात्रीत मिळाली आहे अमाप प्रसिद्धी