पद्मा लक्ष्मीनं सांगितलं फिटनेसचं रहस्य, 49व्या वर्षातही असं ठेवा स्वतःला हॉट

पद्मा लक्ष्मीनं सांगितलं फिटनेसचं रहस्य, 49व्या वर्षातही असं ठेवा स्वतःला हॉट

मॉडल, अभिनेत्री आणि अमेरिकन टेलिव्हिजन शो 'टॉप शेफ'ची होस्ट पद्मा लक्ष्मी आपल्या लुक्ससह आपल्या हॉट फिगरसाठीही प्रसिद्ध आहे. वयाच्या 49व्या वर्षातही तिनं स्वतःचा फिटनेस उत्तमरित्या राखला आहे. नुकतंच सोशल मीडियावर एका चाहतीनं तिच्या शानदार फिटनेसचं रहस्य विचारलं. ज्याचं उत्तरही पद्मा लक्ष्मीनं दिलं.

चाहतीचा पद्मा लक्ष्मीला प्रश्न

‘तुम्ही आठवड्यातून किती तास वर्कआउट करता आणि कोणत्या अन्नपदार्थांचा तुमच्या आहारात समावेश नसतो? कृपा करून खरं सांगा’, असा प्रश्न चाहतीनं पद्मा लक्ष्मीला ट्विटरवर विचारला होता. यावर पद्मा लक्ष्मीनं सांगितलं की, ‘मी प्रचंड वर्कआउट करते. आठवड्यात सहा वेळा जिममध्ये जाते. नियमित तीन लीटर पाणी पिते आणि माझ्या आहारात 50 टक्के फळे किंवा भाज्यांचा समावेश असतो. रात्री मी लाल मांस किंवा गोड अन्नपदार्थांचं सेवन करत नाही’. 

(वाचा : VERY HOT ! अभिनेत्रीचा बाथटबमधला टॉपलेस फोटो व्हायरल)

पद्मालक्ष्मीच्या खासगी आयुष्याबाबत सांगायचं झालं तर तीन वर्ष डेटिंग आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2004 मध्ये पद्मा लक्ष्मीनं लेखक सलमान रश्दींसोबत लग्न केलं होतं. पण हे नातं दीर्घ काळ टिकू शकलं नाही. तीन वर्षांनंतर दोघांनीही घटस्फोट घेतला. पद्मा लक्ष्मीनं आपल्या पुस्तकात खासगी आणि लैंगिक आयुष्याबाबत धक्कादायक माहिती लिहिली होती. त्यांनी सलमान यांचा निर्दयी पती म्हणून उल्लेख केला होता. 

(वाचा : अक्षय कुमार 25 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स)

पद्मा लक्ष्मीचा बाथटबमधला टॉपलेस फोटो व्हायरल

काही महिन्यापूर्वी पद्मा लक्ष्मीनं टॉपलेस होऊन बाथटबमध्ये हॉट पोझ दिल्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘सहा महिन्यांसाठी जेव्हा रस्त्यावर राहता आणि यानंतर अखेर तुम्हाला मिनिटभर स्वतःसाठी वेळ मिळतो’, असं कॅप्शन फोटोला देण्यात आलं आहे. तिचा हा हॉट फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पद्मा सोशल मीडिया प्रचंड सक्रिय आहे. पद्मा लक्ष्मी 49 वर्षांची आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे या वयातही एखाद्या तरुणीला लाजवेल अशा पद्धतीनं तिनं स्वतःचं सौदर्य आणि आरोग्याची काळजी घेतली आहे. 

(वाचा : समंदर में नहाकर..., दिशा पटानीचा बिकिनीतील मादक फोटो व्हायरल)

View this post on Instagram

🤍 (📷: @priscillabenedetti) #bw

A post shared by Padma Lakshmi (@padmalakshmi) on

परदेशी नागरिकाला सुनावले खडेबोल

कोणत्या-न्-कोणत्या कारणावरून पद्मा नेहमीच चर्चेत असते. नुकतंच पद्मानं एका परदेशी नागरिकाला खडेबोल सुनावले. संबंधित व्यक्तीनं भारतीय जेवणाबाबत केलेलं भाष्य तिला पटलं नाही आणि मग काय पद्मानं जाहीररित्या त्याचा चांगलाच समाचार घेतला. भारतीय जेवण अत्यंत वाईट असतं, असं टॉम निकोलस नावाच्या व्यक्तीनं म्हटलं होतं. त्यावर, तुमच्याकडे टेस्टबड (चव अनुभवण्याची पेशी) नाहीय का? असं विचारत तिनं आपलं देशप्रेम व्यक्त केलं.

(वाचा : मलायकासारखी फिगर हवीय, पाहा तिच्या फिटनेसचं रहस्य सांगणारा VIDEO)

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.