VERY HOT ! अभिनेत्रीचा बाथटबमधला टॉपलेस फोटो व्हायरल

 VERY HOT ! अभिनेत्रीचा बाथटबमधला टॉपलेस फोटो व्हायरल

सुंदर, मनमोहक आणि चिरतरूण राहणं हा ग्लॅमरच्या दुनियेचा अलिखित नियम आहे. झगमगत्या दुनियेत चर्चेत राहण्यासाठी सेलिब्रिट काय-काय करत असतात. काही जणांनी तर स्वतःला इतकं फिट (Fit) ठेवलंय की त्यांचा वयाचाही अंदाज लावणं देखील कठीण आहे. यापैकीच एक म्हणजे मॉडेल- अभिनेत्री पद्मा लक्ष्मी (Padma Lakshmi). पद्मा एक सुप्रसिद्ध टीव्ही होस्टदेखील आहे. पद्मा लक्ष्मीचं नाव सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. कारण सोशल मीडियावर तिनं स्वतःचा अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे. लक्ष्मीनं टॉपलेस होऊन बाथटबमध्ये हॉट पोझ दिल्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘सहा महिन्यांसाठी जेव्हा रस्त्यावर राहता आणि यानंतर अखेर तुम्हाला मिनिटभर स्वतःसाठी वेळ मिळतो’, असं कॅप्शन फोटोला देण्यात आलं आहे. तिचा हा हॉट फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पद्मा सोशल मीडिया प्रचंड सक्रिय आहे. पद्मा लक्ष्मी 49 वर्षांची आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे या वयातही एखाद्या तरुणीला लाजवेल अशा पद्धतीनं तिनं स्वतःचं सौदर्य आणि आरोग्याची काळजी घेतली आहे. 

(वाचा : नखरे नाही तर ‘या’मुळे कृतिनं सोडला अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ सिनेमा)

परदेशी नागरिकाला सुनावले खडेबोल

कोणत्या-न्-कोणत्या कारणावरून पद्मा नेहमीच चर्चेत असते. नुकतंच पद्मानं एका परदेशी नागरिकाला खडेबोल सुनावले आहेत. संबंधित व्यक्तीनं भारतीय जेवणाबाबत केलेलं भाष्य तिला पटलं नाही आणि मग काय पद्मानं जाहीररित्या त्याचा चांगलाच समाचार घेतला. भारतीय जेवण अत्यंत वाईट असतं, असं टॉम निकोलस नावाच्या व्यक्तीनं म्हटलं होतं. त्यावर,  तुमच्याकडे टेस्टबड (चव अनुभवण्याची पेशी) नाहीय का? असं विचारत तिनं आपलं देशप्रेम व्यक्त केलं.

(वाचा : ‘थलायवी’चा फर्स्ट लुक रिलीज, कंगना रणौत सोशल मीडियावर ट्रोल)

 

पद्मावर झाला होता बलात्कार

यापूर्वी लैंगिक शोषण प्रकरणावरून पद्मा लक्ष्मी चर्चेत आली होती.  किशोरवयीन असताना बॉयफ्रेंडनं बलात्कार केला होता, असा गौप्यस्फोट तिनं केला होता. त्यावेळेस अतिशय घाबरलेल्या परिस्थिती असल्यानं पोलिसात तक्रार केली नाही, असंही तिनं म्हटलं होतं. '23 वर्षीय तरुणासोबत माझे प्रेमसंबंध होते. काही महिन्यानंतर नवीन वर्षांच्या  संध्याकाळी त्याने माझ्यावर बलात्कार केला', एका वृत्तामध्ये लिहिलेल्या खुल्या पत्राद्वारे तिनं ही धक्कादायक बाब सर्वांसमोर आणली. जवळपास 32 वर्षांनंतर तिनं ही आपबीती सांगितली.

(वाचा : ‘Good Newwz’च्या टायटलमध्ये का वापरलं चुकीचं स्पेलिंग, करण जोहर म्हणाला…)

इतक्या वर्षांनंतर का सोडलं मौन?

त्यावेळेस अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठीचे उमेदवार ब्रेट केवेनॉ यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पीडित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यास सुरुवात केली. याचदरम्यान पद्मा लक्ष्मीनेही तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकार सर्वांसमोर आणला. पद्मा लक्ष्मीवर झालेल्या अत्याचाराची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दखल घेतली. ‘बलात्कारानंतर तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार नोंदवायला हवी होती’, असे ट्विट ट्रम्प यांनी केले होते.

पद्मा लक्ष्मीबाबतची माहिती

पद्मानं वयाच्या 18 व्या वर्षापासून मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. 2003मध्ये तिनं बूम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. यामध्ये तिनं अतिशय बोल्ड सीन शूट केले होते. 2004मध्ये वयाच्या 28व्या वर्षी तिनं 51 वर्षांच्या सलमान रश्दींसोबत लग्न थाटलं. यानंतर 2007मध्ये दोघांनी संमतीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.