Corona : पद्मिनी कोल्हापुरेने केली प्रिन्स चार्ल्स बरे होण्यासाठी प्रार्थना

Corona : पद्मिनी कोल्हापुरेने केली प्रिन्स चार्ल्स बरे होण्यासाठी प्रार्थना

जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. आत्तापर्यंत अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला असून रोज या रोगाने ग्रस्त होणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. याला अपवाद इंग्लंडची रॉयल फॅमिलीही नाही. कारण 25 मार्चलाच बातमी आली होती की, प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना संसर्ग झाला. ही बातमी व्हायरल होताच अनेकांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत ट्वीट केलं. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी प्रिन्स चार्ल्स लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली. स्पॉटबॉयशी केलेल्या संवादात त्यांनी सांगितलं की, माझ्या प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत. ते लवकर बरे व्हावेत म्हणून मी प्रार्थना करते. आता तुम्ही म्हणाल की, अशा परिस्थितीत कोणीही त्यांनी सुखरूप यातून बाहेर पडावं यासाठी प्रार्थना करेलच. पण यामुळे एक जुना किस्सा पुन्हा समोर आला.

View this post on Instagram

#zen mode

A post shared by padminikolhapure (@padminikolhapure) on

पद्मिनीने केलं होतं प्रिन्स चार्ल्सना किस

एक काळ होता जेव्हा पद्मिनी यांचं नाव प्रिन्स चार्ल्सशी जोडण्यात आलं होतं. जर तुम्हाला लक्षात असेल तर 1980 साली पद्मिनी आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या किसचा किस्सा खूप रंगला होता. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा प्रिन्स चार्ल्स भारत दौऱ्यावर आले होते आणि पद्मिनीने त्यांचं फुलांचा हार घालून स्वागत केलं होतं. नंतर गालावर किस केलं होतं. त्याकाळी पद्मिनी 15 वर्षांच्या होत्या. असं म्हणतात की, प्रिन्स चार्ल्सनाही या किसच आश्चर्य वाटलं होतं. नंतर हा किसचा किस्सा सिनेमाच्या इतिहासातील सर्वात विवादीत गोष्टींमध्ये गणला जाऊ लागला.

असो कोरोना पॉझिटिव्ह प्रिन्स चार्ल्स सध्या स्कॉटलंडमध्ये आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांची बायको कॅमेलाही त्यांच्यासोबत आहे. पण त्यांच्या बायकोची टेस्ट मात्र निगेटीव्ह आली आहे.

पद्मिनी यांचं कमबॅक

बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर पद्मिनी कोल्हापुरे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. नुकताच त्यांचा ऐतिहासिक हिंदी चित्रपट पानिपत येऊन गेला. तसंच मराठीतही ही अशोक सराफ यांच्यासोबतचा प्रवास हा सिनेमा आला होता. पद्मिनी यांनी आपल्या चित्रपट करियरमध्ये नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. बालकलाकारापासून ते अभिनेत्रीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास समृद्ध करणारा होता.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.