अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला अटक

अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला अटक

MeToo चे वारे वाहू लागल्यानंतर देशात आरोप-प्रत्यारोपाची एक मालिकाच सुरु झाली. आता एका प्रसिद्ध अभिनेत्याचे नाव अशाच एका प्रकरणामध्ये आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. हा अभिनेता अन्य कोणी नसून मेरे ब्रदर की, दुल्हन या चित्रपटातील कलाकार अली जाफर आहे. पाकिस्तानी अभिनेत्यावर त्यांच्याच देशातील एका सुप्रसिद्ध गायिकेने लैंगिक शोषणाचे आरोप केले. पण या आरोपांना न घाबरता त्याने या परिस्थितीत स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यात यश मिळवले आहे. तर अली जाफरवर हे गंभीर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला मात्र यासाठी कठोर अशी शिक्षा मिळाली आहे. जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण

अभिनेत्रीने केले आरोप

Instagram

अली जाफर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी अभिनेत्री अन्य कोणी नाही तर पाकिस्तानी गायिका मीशा शफी आहे. तिने  MeToo अंतर्गत अली जाफर याच्यावर केला. तिने आरोपात असे म्हटले की, अलीने तिला कामासाठी त्याच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बोलावले. त्यावेळी कोणी नसल्याचे पाहात त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने केलेले आरोप इतके गंभीर होते की, अली जाफरकडे पाहणाऱ्यांच्या नजरा एकाएकी बदलून गेल्या. या आरोपानंतर अली जाफरचे नाव फारच चर्चेत आले

मानसी नाईकचा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ, वैशाली आणि स्वप्नीलचा स्वरसाज

अलीने दिला लढा

Instagram

अलीवर हे आरोप झाले तरी देखील अलीने हार मानली नाही. त्याने निर्दोष आहे सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आपण यात दोषी नाही याची खात्री असल्यामुळे त्याने हे आरोप खोटे आहेत हे सिद्ध झाल्यानंतर अभिनेत्रीविरोधात अब्रनुकसानीचा दावा ठोकला. लैगिंक अत्याचाराचे केवळ आरोप करणाऱ्या या अभिनेत्रीला तिने केलेले आरोप कोर्टात सिद्ध करण्यास असमर्थ ठरली त्यामुळे तिला पाकिस्तानी न्यायव्यवस्थेने दोषी ठरवत तब्बल 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मीशाच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे अली जाफरला मात्र मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणातून जरी तो निर्दोष सुटला असला तरी समाजातील प्रतिमा काही अंशी मलीन झाली आहे असे त्याचे म्हणणे आहे. 

नागिननंतर आता राखीला लागलं आहे नवं वेड, व्हिडिओ व्हायरल

अली जाफरने मांडली आपली बाजू

अली जाफर या प्रकरणानंतर संपूर्ण बिथरुन गेला. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांची यामुळे खूपच नाचक्की झाली. त्याने या संदर्भात एका मुलाखतीत सांगितले. अशा प्रकारचे आरोप खोटे असले तरी देखील हे आरोप लावल्यानंतर तुमची समाजातील एक चांगली प्रतिमा मलीन होऊन जाते. दोषी आहे की नाही हे सिद्ध व्हायच्या आधीच लोकं निकाल देऊन मोकळे होतात. माझ्यावर लावलेले आरोप खोटे होते हे सिद्ध झाले तरी देखील तो काळ आमच्यासाठी कठीण होता. या प्रकरणातून सुटका झाली तरी देखील समाजातील माझी प्रतिमा मलीन झाली आहे हे सांगायला तो अजिबात विसरला नाही. 

हिंदी चित्रपटात केले पदार्पण

पाकिस्तानी अनेक चेहरे हिंदी सिनेसृष्टीत आपले नाव कमावून आहे. अली जाफर याने देखील हिंदी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. मेरे ब्रदर की दुल्हन ( 2011) या चित्रपटातून त्याने पदार्पण केले. त्यानंतर किल दिल, डिअर जिंदगी या चित्रपटातही त्याने काम केले. जे लक्षात राहण्यासारखे होते. 


सध्या या नव्या वादातून त्याची सुटका झाल्यामुळे त्याच्या नावाची आणि कामाची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. 

 

तो माझा अॅटिट्युट नव्हता, रुबिनाने केला एअरपोर्टवरील वागण्याचा खुलासा