पलक तिवारी करणार टीव्हीवर पदार्पण

पलक तिवारी करणार टीव्हीवर पदार्पण

लहान पडद्यावरील बरेच कलाकार अजूनही तरूण दिसतात. त्यांच्याकडे पाहून आपल्याला कधीही त्यांच्या वयाचा अंदाज येत नाही. त्यामुळे त्यांची मुलंही मोठी असतील याचा अंदाज लावला जात नाही. सध्या पुन्हा एकदा ‘कसौटी जिंंदगी के’ (Kasautii Zindagii Kay) ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे. पण 2001 मध्ये आलेल्या या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी आजही प्रेक्षकांना चांगलीच आठवते. याच श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आता टीव्हीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. पलक अतिशय सुंदर असून नुकतीच इंडस्ट्रीमध्ये येण्यास तयार झाली आहे. नेहमीच पलक आपले सिझलिंग फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असून तिचे अनेक चाहते आहेत.


palak


पदार्पणासाठी सज्ज पलक तिवारी
टीव्ही मालिका ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये प्रेरणा शर्माची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही नेहमीच तिचं सौंदर्य आणि हॉट फोटोशूट यासाठी चर्चेत राहिली. नुकताच नवा हेअरकट करूनदेखील श्वेता चर्चेत आली होती. पण तिची मुलगी पलक तिवारीदेखील काही कमी नाही. हल्ली पलक तिवारीदेखील लाईमलाईटमध्ये आहे. 18 वर्षांची पलक टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पलक लवकरच एका टीव्ही मालिकेच्या स्पिनऑफमधून पदार्पण करणार आहे. ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेचा स्पिन ऑफ असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवाय या मालिकेचं नाव ‘ये रिश्ते है प्यार के’ असं असल्याचंही सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर या मालिकेमध्ये अभिनेता ऋत्विक अरोराबरोबर पलक तिवारी रोमान्स करणार असल्याच्या चर्चांनाही सध्या उधाण आलं आहे. पलक तिवारी सध्या आपल्या या मालिकेच्या तयारीमध्येच व्यग्र असल्याचं सांगण्यात येत असून श्वेताच्या पावलावर पाऊल ठेवत आता पलक काय टीव्ही प्रेक्षकांवर जादू चालवणार आहे हे लवकरच बघायला मिळेल.


palak1


पलक नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह
पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच आपले हॉट फोटो पोस्ट करत असते. पलकच्या फॉलोअर्सची संख्यादेखील अफाट आहे. ‘कसौटी जिंदगी की 2’ च्या चित्रीकरणाच्या वेळी पलक या मालिकेत असणार अशी चर्चा होती. मात्र श्वेता तिवारीने या चर्चांना लगाम दिला होता. पण आता पलक ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेतून येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. चाहत्यांनाही पलकला टीव्हीवर पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. अशी माहिती मिळत असली तरीही श्वेता तिवारीकडून हीदेखील अफवा असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण आता येणारा काळच ठरवेल की, पलक या मालिकेतून पदार्पण करत आहे की नाही. याआधीदेखील सनी देओलचा मुलगा करण देओलबरोबर चित्रपटातून पदार्पण करण्यासाठी पलक तिवारीला विचारणा झाली असल्याची बातमी आली होती. पण त्यामागील तथ्य कधीही नंतर समोर आलं नाही. 


फोटो सौजन्य - Instagram  


हेदेखील वाचा 


MeToo चळवळीवरच थांबली नाही तनुश्री दत्ता, आता दाखवणार शॉर्टफिल्म


सुरज बडजात्या अजूनही सलमानच्या प्रतिक्षेत


राजकुमार रावचा ‘रुहअफ्जा’ हॉरर कॉमेडी चित्रपट