पल्लवी आणि आरोह विचारत आहेत 'WHY so गंभीर'

पल्लवी आणि आरोह विचारत  आहेत 'WHY so गंभीर'

‘बापमाणूस’ ही मालिका समाप्त होऊन तसे काहीच दिवस झाले आहेत.बापमाणूस मधल्या जवळजवळ सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं. पण या मालिकेतील ‘निशा’ म्हणजेच पल्लवी प्रधान मात्र सर्वांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. बापमाणूस मधली पल्लवीची कोल्हापुरी भाषाशैली, लुक जरा हटकेच होता. त्यामुळे नकारात्मक असूनही निशाची भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली.


46247688 1112972412194137 1993501657703784490 n


पल्लवीच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी


‘बापमाणूस’ नंतर आता पुढे काय? हा प्रश्न पल्लवीच्या चाहत्यांना नक्कीच पडला होता. त्याचं उत्तर मिळालं आहे.कारण पल्लवी लवकरच एका नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या या नव्या नाटकाचे नाव ‘WHY so गंभीर’ आहे. या नाटकामध्ये पल्लवीसोबत आरोह वेलणकर मुख्य भूमिकेत असणार आहे.


46788073 195952301358950 8212715667081792714 n


‘WHY so गंभीर’ चा शुभारंभ


‘WHY so गंभीर’  या नाटकाची निर्मिती अथर्व थिएटर करीत असून त्याचे निर्माते संतोष भरत काणेकर आहेत. या नाटकाचं दिग्दर्शन अमोल भोर आणि गिरीष दातार यांनी केलं आहे. तसंच या नाटकाचे लेखकदेखील गिरीष दातारच आहेत. ‘WHY so गंभीर’ या नाटकाचं पोस्टर नुकतंच पल्लवीने तिच्या इन्स्टावर शेअर केलं आहे. सोबत "गंभीर" व्हायचं कारणच नाही, शुभारंभाला या कळेल! "WHY SO गंभीर?" शुभारंभाचे प्रयोग…  असंदेखील तिनं शेअर केलं आहे.त्यामुळे नाटकाचं नाव जरी गंभीर असलं तरी त्याचा विषय हलका-फुलका आणि हसवणारा असण्याची शक्यता आहे.या नाटकाचा शुभारंभ रविवार २३ डिसेंबर दु. ४ वा. माटुंग्यामधील यशवंत नाट्य मंदिरात होणार आहे.


46466293 208010946793889 5652657344791733283 n
पल्लवी पाटीलचा हटके लुक


पल्लवी पाटीलचा या नाटकामध्ये ‘हटके लुक’ दिसत आहे. पल्लवी मालिका आणि नाटकांमध्ये नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या भूमिका करते. ‘रुंजी’ या मालिकेमधून पल्लवी पाटील घराघरात पोहचली. ‘पार्टनर’ या एकांकिकेतून तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तिनं ‘धनगरवाडा’ या चित्रपटामध्ये देखील वेगळी भूमिका केली होती. ‘बापमाणूस’ मधल्या निशाला तर लोकांनी डोक्यावरचं घेतलं.आता ‘WHY so गंभीर’  नाटकामधली पल्लवीची भूमिका नेमकी कशी असेल याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


45858381 284860152378953 7527993933458950777 n %281%29


फोटोसौजन्य-इन्स्टाग्राम