सध्या असा वेळ घालवत आहे दीपिका- रणवीर

सध्या असा वेळ घालवत आहे दीपिका- रणवीर

जगभरात  Pandemic परिस्थिती असल्यामुळे काही करता येत नाही. सगळेच घरात Lockdown आहेत. पण या अशा परिस्थितीत राहणे फार धैर्याचे काम आहे. ज्यांच्याकडे काम आहे ते घरातून काम करत आहेत. पण ज्यांना काहीच काम करता येत नाही त्यांच्यासाठी हा अत्यंत कठीण असा काळ आहे. आपले सेलिब्रिटीजही सध्या चित्रीकरण करु शकत नसल्यामुळे घरीच आहेत. घरी राहून तुमच्यासाठी ते खास व्हिडिओज तर बनवत आहेत. काहींनी त्यांचे छंदसुद्धा जोपासायला घेतले आहेत. पण तुमचे लाडके दीपिका- रणवीर सध्या घरी राहून काय करत आहेत जाणून घ्यायचं आहे का? मग वाचा

सेलिब्रिटीजवर आली आहे भांडी घासायची वेळ, लॉकडाऊनचा परिणाम

फिटनेस करत करतायत मजा

सेलिब्रिटींसाठी फिटनेस फारच महत्वाचा आहे. हे आपल्याला माहीत आहे. सध्या जीम किंवा घराबाहेर पडून कुठल्याही अॅक्टिव्हिटी करणं शक्य नाही. त्यामुळे घरीच राहून अनेक जण फिट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. दीपिका आणि रणवीरसुद्धा घरीच वर्कआऊट करत आहे.आता सोबत वेळ घालवायला मिळाल्यावर थोडी मस्ती तर होणारच रणवीरने दीपिकासोबत एक असाच फोटो शेअर केला आहे.ज्यामध्ये दीपिका पाठमोरी आहे आणि रणवीरने तिला पकडले आहे. तिने टी वॅक टीशर्ट घातला असून रणवीर हुडमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहून खूप जणांनी त्यांना कमेंट्स ही दिल्या आहेत. मुळात त्यांचे फॅन फारच खूश झाले आहेत. 

Flashback : धर्मेंद्र यांनी उगारला होता शोमॅन सुभाष घईंवर हात, जाणून घ्या किस्सा

पंतप्रधानांना दिला प्रतिसाद

Instagram

रविवारी रणवीर- दीपिकाने आणि सगळ्याच सेलिब्रिटींनी  खिडकी, गॅलरीमध्ये येऊन या परिस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलीसांचे थाळी वाजवून, घंटी वाजवून,टाळ्या वाजवून आभार मानले होते. दीपिका- रणवीरने ही अगदी जोरदार टाळ्या वाजवत त्या सगळ्यांचे आभार मानले. त्यामुळे रणवीर-दीपिकाने पुन्हा एकदा ते सर्वसामान्यांपैकीच. एक आहेत हे दाखवून दिले. 

83 च्या प्रतिक्षेत

Instagram

देशभरातील सगळी सिनेमागृह बंद केल्यामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक चांगले चित्रपट मार्चमध्ये रिलीज होणार होते पण त्यांच्या तारखा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 1983 च्या वर्ल्डकपवर आधारीत हा चित्रपट या आठवड्यात रिलीज होणार होता. पण आता रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका साकारत आहे. तर त्याच्या बायकोचे काम दीपिकाने केले आहे. दीपिका या आधी ‘छपाक’ या चित्रपटात दिसली होती. पण या चित्रपटाने फार काही कमाई केली नाही. शिवाय या दिवसात झालेल्या अनेक गोष्टींचा परिणाम चित्रपटाच्या गल्ल्यावर झाला. त्यामुळे इतकी चर्चा असूनही हा चित्रपट चालला नाही. 

घरीच घालवा वेळ

आता तुमचे लाडके सेलिब्रिटी घरात छान काम करुन आपला वेळ घालवत आहे. मग तुम्हाला तर तुमचा एखादा छंद जोपासायला काहीच हरकत नाही. तुमच्या सुरक्षेसाठी घराबाहेर पडू नका. जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवा. जो मोकळा वेळ तुम्हाला हवा होता तो तुम्हाला आता मिळाला आहे. त्यावेळेचा सदुपयोग करा. कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. 


आता फिट कसे राहायचे हे कारण देण्यापेक्षा मस्त दीपिका- रणवीरसारखा घरीच फिट राहण्याचा प्रयत्न करा. मुळात आनंदी राहा.

 

 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.