खऱ्या आयुष्यातही पंकज त्रिपाठी यांना व्हायचे गुंजन सक्सेनाचे बाबा

खऱ्या आयुष्यातही पंकज त्रिपाठी यांना व्हायचे गुंजन सक्सेनाचे बाबा

पहिल्या महिला एअर फोर्स ऑफिसर गुंजन सक्सेना यांच्यावर आधारीत ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला अनेक चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. विशेषत: पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाबाबत अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंकज त्रिपाठी हे उत्तम अभिनेते आहेतच. त्यांच्या अभिनयाच्या अनेक वेगळ्या छटा आतापर्यंत सगळ्यांनीत पाहिल्या आहेत. पण पडद्यावर त्यांनी साकारलेला एक समंजस बाबा, एक धाडसी बाबा जो गुंजन सक्सेनाला घडवतो. असा बाप साकारल्यानंतर पंकज त्रिपाठी यांनी खऱ्या आयुष्यातही गुंजन त्रिपाठी यांचे वडील होण्याची इच्छा आहे. आपल्या मुलीसाठीही त्यांना असेच वडील व्हायचे आहे. त्यांनी अत्यंत भावूक शब्दात त्यांच्या भावना मांडल्या आहेत.

राकेश बापट घेणार ऑनलाईन क्लास स्वतःच बनवा 'बाप्पाची मुर्ती'

मुलीच्या सगळ्या इच्छा करायच्या आहेत पूर्ण

Instagram

पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटात साकारलेली भूमिका अनेकांनी आदर्श घ्यावा अशी आहे. मुलींना मोठं करणं, त्यांना शिकवणं हे इतकंच कधीकधी पुरेसे नसते. तर त्यांना योग्य मार्ग दाखवणे आणि कधी कधी समाजाच्या विरोधात जाऊन  मुलीला आधार देणे हे देखील असते. हेच काम गुंजन यांच्या वडिलांनी केले. त्यांनी कायम तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला पाठिंबा दिला. खचल्यावर आधार दिला. पंकज त्रिपाठी यांनाही खऱ्या आयुष्यात स्वत:च्या मुलीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. त्यांना अगदी तसाच आदर्श वडील व्हायचे आहे. 

सडक2 च्या ट्रेलरला प्रेक्षकांची नापसंती, लाईक्सपेक्षा जास्त डिस्लाईक्स

चित्रपटात भूमिका आली उठून

Instagram

पंकज त्रिपाठी हे अनेकांच्या आवडीचे अभिनेते आहे. हिरोंप्रमाणे त्यांनी केवळ हिरोचीच भूमिका साकारली नाही तर त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कधी गँगस्टर, कधी व्हिलन, कधी वकील आणि कित्येक वेगळ्या भूमिका.. पण गुंजन सक्सेना या चित्रपटात त्यांनी साकारलेली गुंजनच्या वडिलांची भूमिका अधिकच उठून दिसली. एक समजंस आणि मुलीला समजून घेणारा पिता त्यांनी अत्यंत चांगला साकारला. त्यामुळेच त्यांची भूमिका या चित्रपटात भाव खाऊन गेली. ‘धडक’ या चित्रपटामध्ये जान्हवी कपूरचा अभिनय कोणालाच पचनी पडला नव्हता. तिच्या सौंदर्यापुढे तिचा अभिनय काहीच नव्हता. पण या चित्रपटात तिच्यामध्ये बराच फरक पडलेला दिसला आहे. तिच्या तोंडी जास्त डायलॉग नसले तरी तिने या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. 

Instagram

कोण आहेत गुंजन सक्सेना?

गुंजन सक्सेना या पहिल्या महिला एअरफोर्स ऑफिसर आहेत. ज्यांनी कारगिल युद्धाच्यावेळी दाखवलेली अलौकिक कामगिरी अनेकांच्या लक्षात राहील अशी आहे. एकमेव महिला ऑफिसर असूनदेखील त्यांनी याचे कारण न देता आपली कामगिरी बजावली. कारगिलयुद्धाच्यावेळी कारगिल खोऱ्यात अडकलेल्या जवानांचे रेस्क्यु ऑपरेशन त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता केले होते. गुंजन सक्सेना यांची ही ओळख काही ओळींमध्ये जरी संपत असली तरी त्यांच्याबाबत जाणून घेण्यासारखे आणि त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखे बरेच काही आहे. 


तुम्ही जर हा चित्रपट पाहिला नसेल तर तो एकदा जरुर पाहा

Good News: करिना कपूर पुन्हा होणार आई, घरात येणार पाहुणा