अजय- काजोलच्या निसावर पापाराझींचे बारीक लक्ष

अजय- काजोलच्या निसावर पापाराझींचे बारीक लक्ष

स्टार किडवर नेहमीच पापाराझींचे बारीक लक्ष असते. ते कसे दिसतात? त्यांनी काय घातले आहे? कसे वागतात? त्यांच्यात त्याच्या आई- वडिलांसारखे काही टॅलेंट आहे का?असे सगळे काही त्यांच्या पब्लिक अपिअरंसमधून टिपले जाते. जान्हवी कपूर, खुशी कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान आरव भाटिया, करण दिओल, आर्यमान दिओल यांचे फोटोज आपण पाहिले आहेत. त्यातील काहींनी डेब्यू केले आहेत. तर काही डेब्यू करण्याच्या तयारीत आहेत. पण एक अशी स्टार किड आहे जी कधीच चित्रपटात येणार नाही असे सतत म्हटले जात आहे ती म्हणजे अजय आणि काजोलची मुलगी निसा. पण तिला कॅमेऱ्यात टिपण्याची एकही संधी पापाराझी सोडत नाही. न्यासा देवगणच्या सौंदर्यावरुन सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी गेल्या वर्षांत न्यायामध्ये बराच फरक पडला आहे.


कॉफी विथ करणमध्ये येणार नवे स्टुडंटस ऑफ द इयर


nyasa 1


निसा स्पॉटेट


नुकताच निसाचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. यात ती काजोलची बहीण तनिषा मुखर्जीसोबत दिसत आहे. आधी चबी चबी दिसणारी काजोलची ही लेक आता फिटनेसकडे जास्त लक्ष देत आहे, असेच काहिसे वाटत आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये तिच्यात बराच फरक पडला आहे. तिच्या इन्स्टा अकाऊंटचे फॉलोअर्सही दिवसेंदिवस वाढत आहे. अजय देवगण आणि काजोल हे सिनेसृष्टीतील सुपरस्टार आहेत. काजोलला अभिनयाचा वारसा आईकडून मिळाला आहे. तिच्या अभिनयाचे करोडो फॅन्स आहेत. तर अजय देवगणने इंडस्ट्रीत त्याचे वेगळे स्थान निर्माण करत एका पाठोपाठ एक असे सुपर हिट सिनेमे दिले आहेत आणि अजूनही त्याचे सिनेमे हिट ठरत आहेत. त्यामुळे साहजिकच निसादेखील अभिनय क्षेत्रात येईल अशी चर्चा होती. पण काही दिवसांपूर्वी अजय देवगणने या चर्चांना फूलस्टॉप दिला आहे.  निसाला अभिनयापेक्षा अभ्यासाची आवड आहे असे त्याने म्हटले होते. पण आता तिचा ग्लॅम अवतार पाहता आता न्यासाही इंडस्ट्रीत पाऊल ठेवते की काय? असा प्रश्न पडू लागला आहे.


आता कळलं नेहा कक्करच्या ब्रेकअपचे कारण


50668300 634781093647911 5601218623860627527 n


निसा म्हणजे अजयचा जीव की प्राण


स्टार किड हे लेबल लागण्याआधी ती देखील कोणाची तरी मुले असतात.  त्यामुळे साहजिकच इतर कोणत्याही आई वडिलांप्रमाणे त्यांचे आपल्या मुलावर प्रेम असते. सारा अली खान संदर्भात सैफ अली खान किती पझेसिव्ह आहे ते आपण पाहिले आहे.अजयसाठी तर निसा जीव की प्राण आहे. त्याने निसाचे अनेक फोटो या आधी देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिला नेहमीच तो हिरा म्हणून संबोधतो.


nyasa 2आलिया भट करण जोहरच्या हातातली बाहुली


निसा करेल का डेब्यू?


निसामधील हे बदल पाहता न्यासा कसल्या तयारीला लागली आहे हे नक्की! शिवाय तिचा  पब्लिक अपिरिअंसही गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळेच ती अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होताना दिसत आहे. आणि उत्तरोत्तर तिचे सौंदर्यही खुलत चालले आहे. काजोलच्या सौंदर्यामपुढे न्यासा काहीच नाही अशी टीका होत होती. तिच्या रंगावरुनही तिला हिणवले जात होते. पण आता तिच्या सौंदर्यात दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. या सौंदर्यात भर पाडण्यासाठी तिने कोणतीही प्लास्टिक सर्जरी केलेली नाही. तर कदाचित तिने चांगल्या शरीरासाठी जीम करायला सुरुवात केली आहे. आता तिची मेहनत तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ती  सिनेमांमध्ये येण्याची तयारी करत आहे का? असा प्रश्न आम्हालाही पडला आहे.


nyasa ajay


(फोटो सौजन्य- Instagram)