ADVERTISEMENT
home / बिग बॉस
Bigg Boss 14 च्या या स्पर्धकाविषयी काय म्हणाला पारस छाबडा

Bigg Boss 14 च्या या स्पर्धकाविषयी काय म्हणाला पारस छाबडा

टीव्हीवरील सगळ्यात मोठा रिअॅलिटी शो अर्थात Bigg Boss 14 शनिवारपासून सुरु झाला आहे. टीव्हीवरील अनेक नावाजलेले चेहरे या शोचा भाग आहेत. अनेक सेलिब्रिटी असे आहेत ज्यांच्या नावावर नुसत्या कॉन्स्ट्राव्हर्सीज जोडलेल्या आहेत. तर काही सेलिब्रिटी घरात कसे वागतात याची उत्सुकता अनेकांना आहे. काही सेलिब्रिटी घराच्या आत गेले नाही तोच गॉसिपचा विषय बनू लागले आहेत. त्यांच्या विषयी Bigg Boss च्या घरात राहून गेलेल्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. पण Bigg Boss च्या ex स्पर्धक पारस छाबडा आताची स्पर्धक पवित्रा पुनिया हिच्याविषयी असे काही म्हणाला आहे की, ती पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. पारस आणि पवित्रामध्ये नेमकं काय सुरु आहे ते जाणून घेऊया.

कॅन्सरमुळे घटलं संजय दत्तचं वजन, चाहत्यांना वाटतेय काळजी

पवित्रा पुनियासोबत होते रिलेशनशीप

पवित्रा पुनिया

Instagram

ADVERTISEMENT

पवित्राने Bigg Boss च्या घरी आल्यानंतर तिचा कोणताही कॉन्स्ट्राव्हर्शीअल भूतकाळ नसल्याचा दावा केला आहे. तिने या आधी आयुष्यात असे काही घडले नाही असे म्हटले होते. ज्या विधानाचे खंडन पारस छाबडाने केले आहे. पारस छाबडा ज्यावेळी Bigg Boss च्या घरात होता त्यावेळी तिने पारस संदर्भात काही विधानं केली होती. ज्यावर नंतर पारसने खुलासा केला. पण पारसच्या म्हणण्यानुसार पवित्रा आणि पारस हे रिलेशनशीपमध्ये होते. या दोघांचे रिलेशनशीप अनेकांना माहीतदेखील होते. पण पवित्राने तिचे लग्न झाले हे कधीच सांगितले नाही, उलट तिने तिच्या लग्नाची कोणतीच पूर्वकल्पना दिली नाही. पवित्राचा नवरा हा मीडियाशी निगडीत एक बडी आसमी असून देखील तिने हे नाते का लपवले असा सवालही केला आहे? त्यामुळेच पारसने पवित्रासाठी ‘Scandalous Ex’  असा शब्द वापरला आहे. 

अभिनेत्रीने रेखाने केला खुलासा, म्हणाली, ‘गुम है किसीके प्यार में’

पवित्रा होती मोठी चूक

पवित्राने Bigg Boss च्या घरात धमाकेदार एन्ट्री घेतली असली तरी अगदी पहिल्याच दिवशी तिच्यावर अशा पद्धतीचे आरोप लागले आहेत. पारस छाबडाने तिला आपल्या आयुष्यातील मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. पारसला पवित्राचा खरा चेहरा समजल्यानंतर त्याने हे रिलेशनशीप तोडले. पण याआधी झालेल्या कॉन्ट्राव्हर्सीदरम्यान पारस छाबडाला तिने माझ्याबद्दल काहीही बोलू नकोस नाहीतर याचे परिणाम वाईट होतील असा सज्जड दम दिला होता. 

बिग बॉस 14′ वर माँ चा आशिर्वाद, शो प्रसारित होण्याआधीच जोरदार चर्चा

ADVERTISEMENT

कॉन्ट्राव्हर्सीज आणि बिग बॉस

bigg boss 14 हा रिअॅलिटी शो सुरु झाल्यापासूनच अनेक कॉन्ट्राव्हर्सीज सुरु झाल्या आहेत. या आधी राधे माँचा व्हिडिओ वायरल झाल्यापासून हा सीझन जबरदस्त असणार अशी चर्चा होती आणि आता या नव्या कॉनट्राव्हर्सीजने आता नवा विषय सुरु केला आहे. bigg boss 14 च्या घरात आताशी पहिला दिवस घालवायला सुरुवात केली आहे. 

आता या नव्या कॉन्ट्राव्हर्सीनंतर घरात नवे काय गोंधळ होणार आणि आणखी कोणाची नाव जोडली जाणार त्यासाठी थोडे थांबावे लागेल.

04 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT