शहनाजला झेलणे फारच कठीण, पारस छाबडाने केले विधान

शहनाजला झेलणे फारच कठीण, पारस छाबडाने केले विधान

बिग बॉस 13 म्हणजे वादाचा नवा भांडार. हा सीझन तुम्ही पाहिला असेल तर इतर कोणत्याही सीझनपेक्षा या सीझनमध्ये डोक्याला ताप करणारे असे वाद होते. त्यामुळे अनेकांनी हा शो पाहणेच सोडून दिले. तर अनेकांना याच मसाल्यामुळे हा शो आवडू लागला होता. या शोमध्ये स्वत:ला पंजाबची कतरिना कैफ म्हणून घेणारी शहनाज गिल हिचे आधी पारस छाबडासोबत काही काळासाठी सूर जुळले. पण नंतर या दोघांनी आपले रस्ते वेगळे केले. बिग बॉसनंतरही एकत्र काम करत असताना पारस छाबडा याला शहनाज गील अगदी नकोशी झाली. त्यामुळेच त्याने एका मुलाखती दरम्यान शहनाजबद्दल एक विधान केले, त्यामुळेच आता ही चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे.

बिगबॉस विजेत्याचे लॉकडाऊनमध्ये लग्न, टेरेसवर पार पडला सोहळा

काय म्हणाला पारस छाबडा

Instagram

पारस छाबडाला ज्यावेळी शहनाज गीलबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, ती सुरुवातीला फार गोड वाटते. पण नंतर तिला झेलणे फार कठीण होऊन जाते. मला शहनाजबद्दल आता काहीच म्हणायचे नाही कारण माझं तिच्यासोबतच असलेलं नातं संपलं आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात पारस छाबडा आणि शहनाज गिल एकत्र होते. पण त्यानंतर या दोघांचे मार्ग वेगवेगळे झाला. पारस छाबडा मायरा शर्मासोबत जास्त वेळ घालवू लागला तर शहनाज गिलने सिद्धार्थ शुक्लासोबत राहणे पसंत केले. पारसच्या मते तिचे वागणे हे अत्यंत लहान मुलांचे असल्यामुळे तिला एका सहनशक्ती पलीकडे सहन करणे शक्य नव्हते. 

शहनाज गिल आणि तिचा बालिशपणा

Instagram

तुम्ही जर बिग बॉसचा नवा सीझन पाहिला असेल तर तुम्हाला शहनाज गिल नावाचे प्रकरण काय आहे ते चांगलेच लक्षात आले असेल. शहनाज गिलच्या अनेक शेड्स या रिअॅलिटी शोमध्ये दिसल्या. पहिले काही दिवस तिच्या गोष्टी या गोड आणि एखाद्या निरागस मुलीसारख्या वाटल्या पण नंतर अनेकांना या गोष्टी डोक्याला ताप वाटू लागल्या. तिला पाहणाऱ्या अनेकांना तिचे वागणे खटकू लागले.

अभिनेत्री इशा गुप्ताही चढणार लवकरच बोहल्यावर, नात्यात असल्याची कबुली

शहनाज फारच उद्धट

बिग बॉस संपल्यानंतर मुझसे शादी करोगे नावाचा एक नवा रिअॅलिटी शो लगेचच सुरु झाला.या शोमध्ये पारस छाबडा आणि शहनाज गिल होते. या कार्यक्रमादरम्यानही त्यांच्यामध्ये सत खटके उडत होते. पारसने या विषयी सांगितले की, या कार्यक्रमात आल्यानंतर शहनाज फारच उद्धट झाली होती. तिचे वागणे इतरांच्या तुलनेत खटकणारे होते. त्यामुळे तिच्यापासून दूरक राहणेच पसंत केले.

दोघांनाही मिळाली अल्बममध्ये झळकण्याची संधी

Instagram

बिग बॉस रिश्ते बनाता है और बिघाडता भी है हे म्हणतात ते खोटे नाही. एकत्र 100 दिवस काढायचे म्हटल्यावर अनेकांनी प्रेमाचा आधारही या रिअॅलिटी शोमध्ये घेतला आहे. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांचे प्रेम प्रकरण याशोमध्येच सुरु झाले. त्याचा फायदा असा झाला की, या दोघांना एकत्र अल्बम करण्याची संधी मिळाली. तर मायरा शर्मा आणि पारस छाबडा यांच्या पदरातही एक व्हिडिओ अल्बम आला. 


पण आता पारसचे ऐकल्यानंतर एक नक्की की, पारस आणि शहनाज यांचे पुन्हा कधी चांगले होईल असे वाटत नाही. 

शाहरूखला जाडा म्हटल्याने आर्यन खानने मारले होते एका मुलीला