परिणीतीही आता बहीण प्रियांका चोप्राच्या मार्गावर

परिणीतीही आता बहीण प्रियांका चोप्राच्या मार्गावर

नाही नाही…परिणीती चोप्रा आपल्या चुलत बहीणीप्रमाणे फॉरेनरशी लग्न करत नाहीये. पण तिच्याप्रमाणे करिअरमध्ये थोडं एक्सपेरिमेंट करायचं तिने ठरवलं आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

I’m so glad hoops are back! #AllDayEveryday 💫


A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on
लहान भावंड कधीही आपल्या मोठ्या भाऊबहीणीप्रमाणे करिअर चॉईसेस करतात आणि त्यांना फॉलोही करतात. असंच काहीसं बॉलीवूडमधील अभिनेत्री परिणीती चोप्राबाबत. परिणीती चोप्राला बॉलीवूडमध्ये येऊन आता बराच काळ झाला आहे. तिने आपल्या बॉलीवूड करिअरला अर्जुन कपूरसोबत आलेल्या 'इश्कजादे' या चित्रपटाने सुरूवात केली होती. पण तिच्या बॉलीवूड करिअरमध्ये तिला खास अशी छाप अजूनही पाडता आलेली नाही. त्यामुळे आता परिणीतीने आपली चुलत बहीण प्रियांका चोप्राप्रमाणे वेगळ्या क्षेत्रात आपलं करिअर आजमावण्याचं ठरवलं आहे.


प्रियांका चोप्रा प्रेग्नंट असल्याची बातमी खरी आहे का?, आईने सांगितलं सत्य


प्रियांकाच्या मार्गावर परिणीती
 

 

 


View this post on Instagram


 

 

बहनें 👯‍♀️ @priyankachopra


A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने 2012 आपल्या सिंगीग करिअरला सुरूवात केली होती. तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर हीट सिंगल ‘ईन माय सिटी’ने डेब्यू केला होता. तिच्या या गाण्याला खूपच लोकप्रियता मिळाली होती. हे पाहून आता परिणीतीनेही तिच्यासारखंच गाण्याच्या क्षेत्रात नशीब आजमावायचं ठरवलं आहे.


देसी गर्ल प्रियांका दिसू शकते ‘मार्व्हल’स भूमिकेतपरिणीतीने ही गायलं होतं गाणं
 

 

 


View this post on Instagram


 

 

My fav thing to do in the world ❤️ @ayushmannk #SingingForLife


A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on
परिणीतीने 2017 साली आलेल्या मेरी प्यारी बिंदू या चित्रपटात माना के हम यार नही हे गाणं गायलं होतं. ज्याला पसंतीही मिळाली होती. सूत्रानुसार, आता ती स्वतःचा सिंगल म्युझिक व्हिडीओ आणण्याच्या तयारीत आहे. हे गाणं प्रसिद्ध गझल गायक मेहंदी हसन यांचं क्लासिकल गाणं ‘मुझे तुम नजर गिर तो रहे हो’ चं नवं रूप असेल. हे गाणं टी-सीरीजचे भूषण कुमार प्रोड्यूस करणार असून अमाल मलिक कंपोज करणार असल्याचं कळतंय. तर याचे लिरीक्स लिहीणार आहेत मनोज मुंतशीर. ज्यांनी ‘सानू एक पल’ आणि ‘मेरे रश्के कमर’ या रीमिक्स व्हर्जन गाण्यांचे लिरीक्स लिहीले होते. या गाण्याचं शूटींग पुढच्या महिन्यात सूरू होणार असल्याचं कळतंय. या म्युझिक व्हिडीओमध्ये परिणीतीसोबत एक मेल अॅक्टरही दिसेल ज्याच्यासाठी सध्या शोध सूरू आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Post training bliss! 🏸 #Saina


A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on
परिणीतीने मात्र याबाबत अजून कोणतीही ऑफिशिअल घोषण केली नाहीये. सध्या परिणीती बॅडमिंटनपटू सायना नेहवालवरील बायोपिक शूटींगमध्ये व्यस्त आहे. सायनाची कथा खूपच इमोशनल असल्याचं कळतंय. जिच्या बॅडमिंटन करिअर आणि साधेपणावर सध्या परिणीती फोकस करत आहे.


हेही वाचा 


जेव्हा प्रियांका चोप्रा निक जोनसला एक्स गर्लफ्रेंडबरोबर चॅट केल्यावर पकडते