सायना नेहवाल बायोपिकमधून श्रद्धा कपूर आऊट, परिणिती साकारणार सायना

सायना नेहवाल बायोपिकमधून श्रद्धा कपूर आऊट, परिणिती साकारणार सायना

सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिकची चलती आहे. गुंजन सक्सेना, राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक यांच्या चित्रीकरणाची तयारी सुरु आहे. पण या बायोपिक आधी ज्या बायोपिकची चर्चा झाली होती ती म्हणजे सायना नेहवालच्या बायोपिकची.. या बायोपिकवर गेल्या दीड वर्षांपासून काम सुरु आहे. पण या चित्रपटाचे शुटींग अद्यापही सुरु झाले नाही. या चित्रपटाची स्टारकास्ट फायनल होऊनही हा चित्रपट श्रद्धा कपूरमुळे थांबला होता. श्रद्धा या चित्रपटात काम करणार नाही अशा चर्चांना उधाण आले होते. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. कारण श्रद्धा आता या चित्रपटात काम करणार नाही यावर आता मोहोर बसली आहे. त्यामुळे सायना नेहवाल बायोपिकमधून श्रद्धा कपूर आऊट झाली असे म्हणायला हवे.


सैफला ट्रोल करणाऱ्यांवर भडकली बेबो


 श्रद्धाला नाही जमला सराव


एखादा बायोपिक करताना त्याचा अभ्यास करावा लागतो. सायना नेहवाल ही बॅडमिंटन प्लेअर असून देशासाठी तिने महत्वपूर्ण अशी कामगिरी केली आहे. तिचे पात्र साकारण्यासाठी त्या अभिनेत्रीला बॅडमिंटनचे ज्ञान असणे आवश्यक आहे. श्रद्धाला हा चित्रपट साधारण दोन वर्षांपूर्वी ऑफर करण्यात आला. त्यावर तिने मेहनत करायलाही घेतली. साधारण दीड वर्षांपासून ती सायनाकडून बॅडमिंटनचे धडे घेत आहे. पण तिला हे सगळे करणे जमत नसल्यामुळे सायनादेखील श्रद्धावर फारशी खूश नव्हती अशा चर्चा होत्या. अखेर या चित्रपटाला सायनाने राम राम ठोकला आहे. याविषयी अधिक माहिती देत तिने या खेळासाठी लागणारी मेहनत तिला जमत नाही. त्यामुळे या चित्रपटासाठी मी परिपक्व नसल्याची कबूली तिने दिली आहे.


shraddha kapoor


परिणिती साकारणार सायना


आता श्रद्धा हा चित्रपट करणार नाही म्हटल्यावर हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक सोडू शकत नाही. श्रद्धाच्या दीड वर्षाच्या काळातील प्रगती पाहता आधीच तिला रिप्लेस म्हणून दुसऱ्या अभिनेत्रीला शोधण्याचे काम सुरु होते.अखेर या चित्रपटासाठी परिणितीचे नाव पुढे आलेले आहे. हा चित्रपट परिणितीला ऑफर केल्याचे कळत आहे. याची घोषणाही लवकरच होईल असे म्हटले जात आहे.


keasari parineeti


सैफ करते या नव्या अभिनेत्याला डेट


परिणिती प्रमोशनमध्ये व्यग्र


सध्या परिणिती सारागढी युद्धावर आधारीत असलेल्या ‘केसरी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट येत्या २१ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. एका वेगळ्या जॉनरच्या भूमिकेत परिणिती दिसणार आहे. याशिवाय ती ‘संदीप और पिंकी फरार’ आणि ‘जबरीया जोडी’ या चित्मरपटांमध्येही दिसणार आहे. त्यामुळे या शुटींगमध्येही ती व्यग्र आहे. आता परिणिती सायना नेहवालच्या भूमिकेत कधी दिसेल अशी उत्सुकता तिच्या फॅन्समध्ये आहे. श्रद्दाप्रमाणे परिणिती निराश करणार नाही अशी तिच्या फॅन्सना तिच्याबदद्ल खात्री आहे.


समीराने केलं ट्रोलर्सचं तोंड बंद


श्रद्धा दिसणार बाहुबलीसोबत


श्रद्धाच्या हातून सायना नेहवाल हा चित्रपट गेला असला तरी तिच्या हातात आणखी दोन चित्रपट आहेत. सध्या ती बाहुबली प्रभाससोबत साहोमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती अॅक्शन करताना दिसणार आहे. तर ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटात दिसणार आहे.या आधीही तिने डान्सशी संबधित असलेले abcd हा चित्रपट केला आहे. तिला तिच्या डान्स अवतारात अनेकांनी पसंतीही दिली आहे. या चित्रपटात वरुण धवन, रेमो डिसुजा, धर्मेश, पुनीत आणि राघव दिसणार आहे. त्यामुळे श्रद्धाकडे दोन चांगले चित्रपट आहेत, असेच म्हणायला हवे.