आर्चीच्या परशाचा मेकओव्हर पाहून व्हाल थक्क, दिसतोय खूपच हँडसम

आर्चीच्या परशाचा मेकओव्हर पाहून व्हाल थक्क, दिसतोय खूपच हँडसम

मराठीमध्ये असे फार कमी चेहरे असतील ज्यांच्याकडे बघून हँडसम अशी कमेंट करावीशी वाटेल. पण आताचा काळ थोडासा बदलला आहे. मराठीतील नव्याने आलेले काही चेहरे आपली बरीच काळजी घेताना दिसतात. सिक्स पॅक्ज अॅब्ज, फिटनेस, डाएट असं सगळ काही फॉलो करुन या अभिनेत्यांनी स्वत:ला ‘हम भी किसीसे कम नही’ म्हणत स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे. आता आपला ‘सैराट’ फेम परशाच बघा ना! चित्रपटाशी कोणताही सबंध नसताना या क्षेत्रात आला. त्याचा तो साधाभोळा लुक त्यावेळीही अनेकांना घायाळ करुन गेला आणि आता परशा अर्थात आकाश ठोसरचा नवा अंदाजही अनेकांना घायाळ करेल असा आहे. तुम्ही परशाचे नवे काही फोटो पाहिले नसतील तर त्याचे काही नवे फोटो तुम्हाला नक्कीच थक्क करतील.

अभिनेता धैर्य घोलपची भरारी, हिंदी मालिकेत करतोय प्रमुख भूमिका

परशाचा नवा लुक

आकाश हा फिटनेस फ्रिक आहे हे सगळ्यांनाच माहीत असेल. तो त्याचे बरेच फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सध्या तो एका नव्या वेबसीरिजमध्ये दिसतोय ज्याचं नाव आहे ‘1962- वॉर इन हिल्स’ यामध्ये तो एका फौजीची भूमिका साकारत आहे. फौजीप्रमाणे दिसण्यासाठी त्याने बरीच मेहनत केलेली दिसत आहे. किशन यादव ही भूमिका साकारण्यासाठी त्याने पुन्हा एकदा वजन वाढवलेले दिसत आहे. पण हे नुसते वजन वाढवलेले नाही. तर त्याने व्यवस्थित जीम करुन स्वत:ला फिट केलं आहे. त्यामुळे यामध्ये तो खूपच हँडसम दिसत आहे. या शिवाय आकाशने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या या प्रोसेसचे अनेक फोटो टाकले आहेत. 

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांचा मुलगा करतोय अभिनय क्षेत्रात एंट्री

वेगवेगळ्या भूमिका

सैराट सारखा सुपर डुपर हिट चित्रपट केल्यानंतर परशाला म्हणजेच आकाशला ऑफर मिळणार नाही, असे मुळीच झाले नसते. या चित्रपटातील त्याचा अभिनय आणि त्याचे कॅमेरावरील दिसणे पाहूनच त्याला आतापर्यंत अनेक काम मिळाली आहेत. लस्ट स्टोरीजमध्ये त्याने एका विद्यार्थ्याची भूमिका साकारली आहे आणि आता एका फौजीची भूमिका साकारताना तो दिसत आहे. त्याच्या वेगवेगळ्या छटा पाहून आणि त्याची कामाची मेहनत पाहूनच त्याचा फॅन फॉलोवर्स दिवसेंदिवस वाढत आहे, असे म्हणावे लागेल. 

वजन केले होते कमी

 सैराटचा रो आकाशला ज्यावेळी त्याला देण्यात आला. त्यावेळी तो कुस्ती खेळत होता. नागराज मंजुळेने त्याची निवड केल्यानंतर त्याला वजन कमी करायला लावले. आकाशनेही संधीचं सोनं करण्यासाठी आापलं वजन कमी केलं. त्यामुळे आधीाचा परशा आणि आताचा परशा असा फरक त्यावेळीही जाणवला होता. पण आताचा आकाश हा अधिक स्टायलिश दिसू लागला आहे. त्याचे अनेक नवे फोटो पाहिल्यानंतर त्याचा अंदाज येतो. एका सेलिब्रिटीचा सगळा ग्लो सध्या त्याच्यावर दिसत आहे. एखादे स्टायलिश कपडे कसे कॅरी करायचे.हे त्याला आता अगदी बरोबर कळू लागलं आहे. आकाशचे सगळे नवे फोटो हे त्याने आतापर्यंत कमावलेले यश आणि मेहनत दोन्हीची जाणीव करुन देतात. 


आकाशच्या या नव्या लुकबद्दल तुम्हाला काय वाटतं? मराठीतील हा चेहरा या क्षेत्रात गगनभराऱ्या घेईल हे नक्की!

बॉलीवूड अभिनेत्री ज्यांनी थाटला क्रिकेटर्ससोबत संसार

Beauty

POWDER MAGIC EYESHADOW PENCIL - SMOKY QUARTZ

INR 973 AT MyGlamm