संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटात पार्थ समथान साकारणार मुख्य भूमिका

संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटात पार्थ समथान साकारणार मुख्य भूमिका

टेलिव्हिजन अभिनेता पार्थ समथान एकता कपूरची लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी की'च्या दुसऱ्या पर्वातील अनुराग ही मालिका साकारत आहे. या मालिकेतील अनुरागच्या भूमिकेत तो त्याच्या दिसण्यातून आणि अभिनयातून अगदी चपखल बसला होता. ज्यामुळे लोकांनीही या भूमिकेला चांगलंच डोक्यावर घेतलं. काही दिवसांपासून पार्थ ही मालिका सोडणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र पार्थने अशी अधिकृत घोषणा अजून नक्कीच केलेली नाही. एकता कपूरनेही अशी कोणतीच घोषणा केलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थ लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. पार्थला एक बिग बॅनर चित्रपट मिळाला आहे ज्यासाठी त्याला ही मालिका आता सोडावी लागणार आहे. पार्थच्या बॉलीवूड डेब्यूची बातमीने त्याचे चाहते नक्कीच खूश झाले असतील.

Instagram

पार्थ कोणत्या चित्रपटातून करणार बॉलीवूड डेब्यू

पार्थ समथानला एक मोठ्या दिग्दर्शकाकडून चित्रपटाची ऑफर आलेली आहे. बॉलीवूडचा हा मोठा प्रोजेक्ट मिळाल्यामुळे पार्थला आता ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका सोडावी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थ लवकरच संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. एवढंच नाही तर या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारणार आहे. संजय लीला भन्सालीने त्याला ‘गंगूबाई काठियावाडी’साठी आलियाच्या अपोझिट साईन केलं आहे. ज्यामुळे पार्थच्या बॉलीवूड डेब्यूवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. पार्थ त्याला  मिळालेल्या या बिग बॅनर बॉलीवूड प्रोजेक्टसाठी नक्कीच उत्सुक आहे. या चित्रपटातून  प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी आणि नवीन केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. शिवाय यामुळे बॉलीवूडला एक चांगला हिरोदेखील मिळेल अशी आशा बाळगण्यास काहीच हरकत नाही. 

View this post on Instagram

Bangalore days😇

A post shared by Parth Samthaan (@the_parthsamthaan) on

पार्थ कसौटीला लवकरच करणार बाय बाय

आता एवढा मोठा बिग बॅनर चित्रपट मिळाल्यावर पार्थ लवकरच कसौटी सोडणार हे निश्चित झालं आहे. वास्तविक या मालिकेने पार्थला खरी ओळख निर्माण करून दिली. घरोघरी या माध्यमातून तो लोकप्रिय झाला. त्यामुळे ही मालिका सोडणं त्याच्यासाठी नक्कीच सोपं नसेल. पार्थ तीन ऑक्टोबर पर्यंत त्याचं कसौटीमधील उर्वरित काम पूर्ण करणार आहे. कसौटीमध्ये तो एरिका फर्नांडिसोबत भूमिका साकारत होता. या मालिकेची सुरूवात अगदी धमाकेदार झाली होती. कसौटी जिंदगी की या मालिकेचं पहिलं पर्वही खूप गाजलं होतं. ज्यामुळे एकताने ही मालिका नव्या कलाकारांसह पुन्हा सुरू केली होती. या मालिकेत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी तिने अनेक प्रयोग केले होते. मात्र आता अनुराग या मालिकेतून बाहेर पडल्यावर या मालिकेची लोकप्रियता तशीच राहील का हे सांगणं तसं नक्कीच कठीण आहे. पार्थने यापूर्वी ‘कैसी ये यारिया’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने कसौटी जिंदगी की या बिग बजेट मालिकेतून आणि हिरो या वेबसिरिजमधून त्याने आपल्या अभिनयाची कमाल दाखवली होती. त्याचा अभिनय लोकांना एवढा भावला की त्याची थेट बॉलीवूडमध्ये एन्ट्री झाली. लवकरच त्याचा बॉलीवूड डेब्यू पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.