टीव्ही विश्वातील घराघरात पोहोचलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मानव- अर्चनाची ही जोडी एकेकाळी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अशी जोडी होती. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे तेही ‘पवित्र रिश्ता 2’ या त्याच्या सिक्वलमधून. 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पवित्र रिश्ता या मालिकेची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली होती. लोकांचे या मालिकेवरील प्रेम लक्षात घेतच या मालिकेचा पुढचा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या मालिकेत सुशांतची जागा कोण घेईल ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या मालिकेची निर्माती एकता कपूर हिच्याकडून या संदर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या मालिकेतील नव्या मानवचा शोध सुरु असल्याचे कळत आहे. आता या मालिकेत किती बदल दाखवतील याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जाणून घेऊया अधिक
‘आपल्या माणसांची काळजी घ्या’ मामाच्या निधनानंतर पुष्कर जोगचा भावूक व्हिडिओ व्हायरल
पुन्हा पवित्र रिश्ता
गेल्यावर्षी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका अधिक चर्चेत आली. मायाळू, गोड असा मानव खऱ्या आयुष्यात इतका उद्विग्न असू शकतो असा विश्वास कोणालाही बसायला तयार नव्हता. त्या मृत्यूनंतर ही मालिका खूप जणांनी पुन्हा एकदा जाऊन पाहिली. या मालिकेचा टीआरपी अचानक इतका वाढला की, निर्मात्या एकता कपूर यांनाही ही मालिका करण्याचा मोह आवरला नाही. मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेचे शूटिंग सुरु झाले असून मानवच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचीही निवड झाली आहे. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन दाखवण्यासाठी सज्ज आहे. अशी माहिती देखील मिळत आहे. या मालिकेत अंकिता लोखंडे असणार पण मानवचे काय? सुशांतची रिप्लेसमेंट कोण असेल? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पण अद्याप या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच आहे.
एकता कपूरने केले शिक्कामोर्तब
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतरच एकता कपूरने या मालिकेचा सिक्वल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तिने तयारीही सुरु केली होती. तिने या बातमीवर शिक्कामोर्तबही केले होते. शिवाय या मालिकेसाठी अंकिता लोखंडेला साईन केल्याचेही सांगितले होते. त्यामुळे आता या मालिकेचे शूट बऱ्यापैकी आटोपले असून ही मालिका प्रदर्शनाच्या मार्गावर आहे यात काही शंका नाही. पण या मालिकेतील मानव कोण? याचा शोध मात्र अद्याप कोणालाही लागलेला नाही.
मोहित मलिक आणि आदिती शिरवाइकरने शेअर केलं बाळाचं नाव, जाणून घ्या अर्थ
सुशांतच्या पाठीशी
सुशांतची आत्महत्या सगळ्या इंडस्ट्रीला चटका लावून गेली. एका छोट्याशा शहरातून आलेल्या या मुलाने मालिकेतून ओळख मिळवत आपली जागा बॉलिवूडमध्ये निर्माण केली होती. त्याने अनेक चांगल्या आणि बीग बजेट चित्रपटातून काम केली. त्याचे अनेक चित्रपट सुपर डुपर हिट होते. धोनीच्या आयुष्यावर आधारीत अशा एम. एस. धोनी या चित्रपटात त्याने धोनीची भूमिका साकारली होती. त्याच्या मृत्यूनंतर रिलीज झालेला चित्रपटही चांगला गाजला होता.
आता त्याचीही मालिका पुन्हा एकदा नव्या रुपात येताना त्याची आठवण आल्यावाचून राहणार नाही.