पवित्रा रिश्तामधील या अभिनेत्यानेही उरकले लग्न, फोटो झाले व्हायरल

पवित्रा रिश्तामधील या अभिनेत्यानेही उरकले लग्न, फोटो झाले व्हायरल

सध्या सेलिब्रिटी लग्नाचा जणू मौसमच सुरु आहे. हिंदी- मराठी कलाकारांची लग्न एकामागून एक होत आहेत. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या विवाहसोहळ्याचा जल्लोष सुरु असताना दुसरीकडे वरुण धवणच्या लग्नाची लगबग सुरु होती. त्यातच आणखी एका अभिनेत्याने आपले लग्न उरकल्याचे देखील समोर आले आहे. ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून सगळ्यांच्या घरोघरी पोहोचलेला करणवीर मेहरा ही विवाहबद्ध झाला आहे. गर्लफ्रेंड निधि सेठसोबत त्याने लग्न केले असून या दोघांनी त्यांच्या फॅन्ससाठी हे फोटो पोस्ट केले आहेत. ही जोडी लग्न करणार हे माहीत होते. पण या लॉकडाऊनच्या काळानंतर कोणताही गाजावाजा न करता लग्न करतील याची माहिती कोणालाच नव्हती. कोरोनामुळे अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थित त्याचा हा विवाहसोहळा संपन्न झाला.

#tinypanda - सिद्धार्थ - मितालीच्या लग्नाची धूम, खास क्षण

शेअर केले फोटो

कोरोनाकाळामुळे कमीत कमी लोकांना आमंत्रित करुन करणवीरने लग्न केले. कमीत कमी लोकांना लग्नाला बोलावल्यामुळे या लग्नसोहळ्याला फार लोकं उपस्थित नव्हती. पण तरीदेखील कुटुंबाच्या खास लोकांसोबत त्यांनी हा आनंद साजरा केला आहे. करणवीरने मेंहदी आणि संगीत या सोहळ्यातील खास कुटुंबासोबतचे फोटो शेअर  केले आहे. अत्यंत साधेपणाने त्यांनी त्यांचे हे लग्न केल्याचे दिसत आहे. एरव्ही सेलिब्रिटी म्हटले की, डिझायनर कपड्यांची भली मोठी यादी असते. पण अभिनेत्री निधि सेठने मेहंदी आणि  संगीतसाठी अगदी साधे कपडे घातल्याचे दिसत आहे. हे कपडे डिझायनर नसले तरी देखील त्यांची जोडी उठून दिसत आहे. 

लग्नाचा फोटो केला शेअर

करणवीर आणि निधिने लग्नातील काही खास फोटोही शेअर केले आहे. यांचे लग्न गुरुद्वारामध्ये पार पडले असून गुरुद्वारामध्ये करणने खास पगडी परिधान केली आहे. निधिने लग्नासाठी खास मोती रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर करणवीरने वेलवेटमधील काळ्या रंगाचे जॅकेट आणि त्यावर मोती रंगाचे वर्क केलेले जॅकेट घातले होते. त्यामुळे ही जोडी एकदम गोड दिसली आहे. अत्यंत साधेपणा असला तरी या दोघांची जोडी कमाल दिसते यात काही शंका नाही. 

कोण आहे निधि सेठ

अभिनेत्री निधि सेठ ही अनेक मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘मेरे डॅड की दुल्हन’ या नव्या कोऱ्या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. ‘अदालत’, ‘श्शू कोई है’ या मालिकांमधूनही तिने काम केले आहे. निधि सेठ ही ज्येष्ठ अभिनेता विनोद सेठ यांची मुलगी असून तिचे अभिनय कौशल्य उत्तम आहे. 

सैफ अली खानची 'तांडव' वादाच्या भोवऱ्यात

अशी सुरु झाली लव्हस्टोरी

करणवीर हा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे.  2005 सालापासून त्याने वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. करणवीर आणि निधि हे एकमेकांना खूप वर्षापासून डेट करत असल्याचे चर्चेत होतो. अखेर त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली देत एकमेकांसोबत लग्नही केले आहे. 

 

करणवीर आणि निधिला POPxo मराठीकडून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!

दगडूची प्राजू झाली बोल्ड, केतकी माटेगावकरचा बोल्ड लुक व्हायरल