अभिनेत्री पायल रोहतगी अटकेत...नेहरु परिवारावर टीका केल्यामुळे अडचणीत

अभिनेत्री पायल रोहतगी अटकेत...नेहरु परिवारावर टीका केल्यामुळे अडचणीत

अभिनेत्री पायल रोहतगी सध्या अडचणीत सापडली आहे. नेहरु परिवाराबाबत टीका केल्यामुळे तिला राजस्थानमधील बुंदी  पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या अटकेची बातमी कळताच अनेकांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओच्या आधारेच तिला अटक करण्यात आल्याचे कळत आहे.  सध्या ती अटकेत असून एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा होती की

नेहरु परिवाराबाबत आपत्तिजनक विधान

Instagram

स्वांतत्र्यसेनानी मोतीलाल नेहरु आणि त्यांच्या परिवाराबाबत एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमधून पूर्व प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांच्या पत्नीबद्दलही वाईट टिप्पणी केली आहे. या व्हिडिओनंतर अनेकांनी हा व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यानंतर तिच्या विरोधात अनेक तक्रारीदेखील दाखल करण्यात आल्या होत्या. तिच्या या व्हिडिओमुळे उठलेला गदारोळ लक्षात घेत तिला अहमदाबादमधून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिला राजस्थानच्या बुंदी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. तिने केलेल्या आक्षेपार्ह वक्त्व्यामुळेच तिला तातडीने अटक करण्यात आल्याचे देखील कळत आहे.

पायलने दिली माहिती

पायल रोहतगी सोशल प्लॅटफॉर्मवरुन अॅक्टीव्ह असते. तिने अटक झाल्यानंतर लगेचच ही माहिती सोशल मीडियावरुन दिली. तिने यात म्हटले आहे की, गुगलचा आधार घेत मी हा व्हिडिओ केला यात माझे काय चुकले. याकडे लक्ष द्या असे म्हणत तिने या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केले आहे. त्यामुळे आता हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. आता तिला या सगळ्या प्रकरणातून सुचका मिळणार की नाही हे पाहावे लागणार आहे. पण सध्या तरी ती ट्विटरवरुन सगळ्या गोष्टीचे अपडेट देत आहे. या संदर्भात तिचा नवरा संग्राम सिंह याने देखील काही मीडिया हाऊसला या संदर्भात माहिती दिली आहे. 

पतीनेही केली पंतप्रधानांकडे याचना

पायलचा नवरा म्हणजेच संग्राम सिंह हा एक रेस्लर, अभिनेता आणि मोटीव्हेशलन स्पीकर असून तो ही या प्लॅटफाॉर्मवर सतत अॅक्टीव्ह असतो. त्यानेही पायलच्या अटकेबाबत काँग्रेसला दोषी धरले असून.व्यक्तिस्वातंत्र्याचा दाखला दिला आहे. जर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असताना असे का? असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे. आता या सगळ्या प्रकरणानंतर नेमंक काय होणार ते पाहावं लागेल. पायलची सुटका कधी होईल हे देखील पाहावं लागेल.

रणवीरपासून आलियापर्यंत सगळे झाले आहेत Tiger baby

कोण आहे पायल रोहतगी?

Instagram

पायल रोहतगी एक अभिनेत्री असून तिला सगळ्यात जास्त ओळख मिळाली ती बिग बॉसमुळे. बिग बॉस 8 च्या सीझनमुळे तिला प्रसिद्ध मिळाली. तिने अनेक हिंदी, भोजपुरी चित्रपट आणि मालिकांमधून काम केले आहे. बिग बॉस दरम्यान तिची संग्राम सिंहसोबत ओळख झाली आणि तिने त्याच्याशी 2011 साली लग्न केलं. या लग्नानंतर ही तिने तिचं काम सुरु ठेवलं.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.