एका रात्री प्रसिद्धीच्या शिखरावर चढल्या या व्यक्ती

एका रात्री प्रसिद्धीच्या शिखरावर चढल्या या व्यक्ती

प्रसिद्धी कधी कोणाला आणि कुठे मिळेल हे सांगता येत नाही. अशाच काही व्यक्ती आहेत. ज्यांना एका रात्री प्रसिद्धी मिळाली. इतर वेळी कोणालाही माहीत नसलेल्या व्यक्ती एका रात्रीत सगळ्यांना माहीत झाल्या आहेत. जाणून घेऊया अशाच काही व्यक्ती आणि त्यांच्या प्रसिद्धी मिळण्यामागील कहाणी..

अष्टविनायकाची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या

राणू मंडल

Instagram

सध्या सगळ्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे ती फक्त राणू मंडलची. पश्चिम बंगालच्या राणाघाट स्टेनवर गाणं गाणारी राणू सध्या सगळ्या सोशल मीडियावर सेन्सेशन बनली आहे. तिचा गाण्याचा एक व्हिडिओ एकाने रेकॉर्डकरुन सोशल मीडियावर टाकला आणि तो हा हा म्हणता प्रसिद्ध झाला इतका की, तिला हिमेश रेशमियाच्या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. शिवाय तिचे ग्रुमिंग असे करण्यात आले की, बघणाऱ्यांना हीच ती स्टेशनवर गाणारी राणू हे ओळखणे ही कठीण झाले. तिच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्या आवाजाशी थेट केली जाऊ लागली. 

काही काळ मुंबईत वास्तव्याला असणारी राणू मंडल पतीसोबत फिरोज खान यांच्या घरी काम करायची. पतीच्या निधनानंतर राणूने मुंबई सोडली ती कायमचीच. मुंबईत असताना ती गाणं गायची. पण घरातल्यांच्या विरोधामुळे तिने क्लबमध्ये गाणं बंद केलं. नवरा नाही. मुलीने लक्ष द्यायचे टाळले यामुळेच मग तिच्यावर रेल्वे स्टेशनवर गाण्याची वेळ आली. पण  म्हणतात ना टॅलेंट कधीतरी नक्कीच पारखले जाते. अगदी त्याचप्रमाणे तिचे टॅलेंट ओळखूनच तिला संधी देण्यात आली.

जाणून घ्या, सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

प्रिया वारियर

Instagram

प्रिया प्रकाश वारियर कोणाला माहीत नाही अशी एकही व्यक्ती नसेल. डोळा मारुन घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीने साऊथच्या एका चित्रपटासाठी आपल्या दिलखेचक अदा सादर केल्या. त्या इतक्या घायाळ करणाऱ्या होत्या की, एका रात्रीत प्रिया वारियर कोण ? अशी चर्चा होऊ लागली. केवळ 19 वर्षांच्या या प्रियाने  ‘ओरु अदार लव’ या चित्रपटासाठी हा शॉट दिला होता. आताही तुम्ही प्रिया हे नाव शोधायला जाल तर तुम्हाला सगळ्यात आधी दिसेल ती म्हणजे प्रिया प्रकाश वारियर

त्यानंतर प्रिया प्रकाश वारियरला एकामागोमाग एक ऑफर येऊ लागल्या. तिच्याकडे जाहिराती आणि सिनेमांच्या खूप ऑफर्स असून  सध्या ती शुटींगमध्येच व्यग्र आहे. 

धिंच्याक पूजा

Instagram

प्रसिद्धी मिळावी नक्कीच मिळावी. पण ती वाईट अर्थाने अजिबात नाही. धिंच्याक पूजा हे नाव घेतलं तर अनेकांना हसू आल्यावाचून राहत नाही. कोणताही आवाज नसताना आणि कोणतेही टॅलेंट नसताना एका युट्युब चॅनेलवर एक गाणं आलं आणि त्याला कोटीच्या घरात व्ह्यूज मिळाले. 

कोणताही सूर, ताल आणि गाण्याला काहीही अर्थ नसताना तिने ही गाणी तयार केली. सेल्फी मेने ले लिया… हे तिचं पहिलं गाणं त्यानंतर तिने काही गाणी काढली त्यातील एक गाणे युट्युबवरुन हटवण्यात आले. त्यानंतर तिला बिग बॉसमध्येही बोलावण्यात आली.

बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सुहाना खान झाली सज्ज

डान्सिंग अंकल

Instagram

काही महिन्यांपूर्वी डान्स करणाऱ्या एका अंकलचा व्हिडिओ फारच प्रसिद्ध झाला होता. संजीव श्रीवास्तव असे या सेलिब्रिटीचे नाव असून ते एका युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे. एका संगीत कार्यक्रमासाठी त्यांनी जेव्हा एक डान्स केला तो डान्स फारच प्रसिद्ध झाला. इतका की, एका रात्रीत श्रीवास्तव स्टार झाले. त्यानंतर त्यांचे अनेक डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

त्यांचा तो डान्स पाहून तर  अनेक टिकटॉक व्हिडिओ देखील बनवले आणि त्यांची प्रेरणा घेऊन अनेकांनी डान्सही केले. 


तर हे काही असे चेहरे आहेत ज्यांनी रातोरात प्रसिद्धी मिळवली.