टीव्हीवरील 5 प्लस साईज अभिनेत्री, ज्यांना वजनापेक्षा टॅलेंट वाटतो महत्त्वाचा

टीव्हीवरील 5 प्लस साईज अभिनेत्री, ज्यांना वजनापेक्षा टॅलेंट वाटतो महत्त्वाचा

बऱ्याचदा लोकं बाहेरच्या दिसण्यालाच सुंदरता समजतात आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या रंग रूप, उंची आणि वजन यावरून ओळखतात. सहसा टीव्ही अथवा मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मुख्यत्वे अभिनेत्रींना आपल्या वजनाची खूपच काळजी घ्यावी लागते. या ग्लॅमरच्या जगामध्ये सुंदरता म्हणजे फिट आणि अप्रतिम फिगर असं समजलं जातं.वजनाने आणि आकाराने अधिक असलेल्या महिलांच्या स्टाईलिंग टिप्सबद्दल जाणून घ्या. बऱ्याचदा वजनाने थोड्या जास्त असणाऱ्या अभिनेत्रींना नाकारलं जातं. पण आता यामध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत. आम्ही तुम्हाला या आणि अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांना आपलं वजन जास्त असण्याचा अजिबात त्रास वाटत नाही. तर वजन जास्त असूनही या अभिनेत्रींनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या टॅलेंट आणि अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

भारती सिंह

instagram

इंडियन टेलिव्हिजनमध्ये कॉमेडी क्वीन भारती सिंह या नावाला कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. अतिशय क्यूट आणि आत्मविश्वास असलेली भारती आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. आपल्या वजनाच्या बाबतीत भारती मुद्दाम जोक्स करते. पण तिला वजन जास्त असल्याचा अजिबात त्रास नाही. उलट प्लस साईज असल्याचा तिला अभिमानच आहे. भारती प्लस साईज असली तरीही अतिशय फ्लेक्झिबल आहे. अनेक रियालिटी शो च्या सेटवर हे दिसून आलं आहे. इतकंच नाही तर डान्स रियालिटी शो मध्येही भारतीने आपल्या वजनाचा बाऊ न करता उत्तम डान्स केला होता आणि आजही प्रेक्षकांच्या ते लक्षात आहे. भारती सांगते की, ‘जन्मापासूनच मी ओव्हरवेट आहे. मी दर 6 महिन्यांनी मी माझं चेकअप करून घेते. पण वजन कमी करण्याचा प्रयत्न मी कधीही करत नाही. जास्त वजन असण्याला मी आशिर्वाद समजते.’ 

एका रात्री प्रसिद्धीच्या शिखरावर चढल्या या व्यक्ती

अंजली आनंद

Instagram

स्टार प्लसच्या प्रसिद्ध मालिका ‘ढाई किलो प्रेम’ मध्ये मुख्य भूमिका दीपिका साकारणारी अंजली आनंदची ही पहिली मालिका होती. पण वजन जास्त असूनही अंजलीचा आत्मविश्वास चांगला दिसून आला. अंजलीने आपली भूमिका उत्तम साकारली आणि तिने प्रेक्षकांच्या मनात घरही केलं. वजन जास्त असलं तरीही अभिनयाच्या जोरावर तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली जागा मिळवली. एका ओव्हरवेट कपलच्या आधारावर ही मालिका होती. अंजलीला आपले लुक्स आणि वजन या दोन्हीबद्दल कोणतीही तक्रार नाही. इतकंच नाही तर अंजली ही भारताच्या टॉप प्लस साईज मॉडल्सपैकी एक आहे. तिच्या मते लोकांनी आता त्यांचे विचार बदलायला हवेत. 

रिताशा राठोड

Instagram

टीव्हीवरील ‘बड़ो बहू’ रिताशा राठोडदेखील जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा तिच्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. पण आपल्या वजनामुळे तिने आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. तिच्या वजनावर अनेक जणांनी कमेंट्स केल्या पण रिताशाने या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाने इतरांची तोंडं बंद केली. इतकंच नाही रिताशा बिकिनीमध्येही तितकीच कम्फर्टेबली वावरते. तिला आपल्या शरीराचा अभिमान आहे. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, ‘अभिनय क्षेत्रात आल्यानंतर मला समजलं की, वजनापेक्षा तुमच्याकडे किती टॅलेंट आहे यावर तुम्ही सिद्ध करू शकता ’ त्याचप्रमाणे तिने सिद्ध करून दाखवलं.

#POPxoMarathiBappa : अंबानींकडे गणपतीचं जंगी सेलिब्रेशन
 

अक्षया नाईक

Instagram

तुम्हाला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अनन्या लक्षात आहे का? या प्रसिद्ध मालिकेमध्ये नायराच्या बहिणीची भूमिका केलेल्या अक्षया नाईकला विसरून कसं चालेल. अक्षया एक अप्रतिम अभिनेत्री आहे. अक्षया अतिशय सुंदर दिसते. तसंच ती अभिनेत्री असून एक उत्तम डान्सर आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्टही आहे. अक्षयाला आपल्या वजनामुळे शाळेत आणि कॉलेजमध्ये बऱ्याचदा क्रिटिसिजमला सामोरं जावं लागलं होतं. पण आपल्याकडे टॅलेंट असेल तर काहीच फरक पडत नाही असं अक्षयाला वाटतं. त्यामुळे आज अक्षया प्रसिद्ध आहे. तिला तिच्या प्लस साईज असण्याबद्दल अजिबातच वाईट वाटत नाही. 

वाहबिज दोराबजी

Instagram

वाहबिज दोराबजी हा टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने ‘प्यार की ये एक कहानी’ आणि ‘बहू हमारी रजनीकांत’ अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे. वाहबिजला आधी प्लस साईझचा कोणताही त्रास नव्हता. पण आता मात्र वाहबिज खूपच जाडी झाली आहे. तरीही सध्या ती वर्कआऊट करत असून वजन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण असं असलं तरीही ओव्हरवेट असण्याचा तिच्यामध्ये काहीही परिणाम झालेला नाही. या गोष्टीची तिला लाज वाटत नाही. आपण जसे आहोत तसे काम करू शकतो असं तिने सांगितलं आहे. वाहबिज नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसते.

अवधूत गुप्ते तयार करणार पहिली Crowdsource गणपती आरती