पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली खिलाडी अक्षय कुमारची फिरकी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली खिलाडी अक्षय कुमारची फिरकी

 


सध्या संपूर्ण भारत देशात निवडणुकीचं वारं आहे. त्यातच 24 एप्रिलची सुरूवात झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अक्षयकुमारने घेतलेल्या मुलाखतीने. पण या मुलाखतीत एक क्षण असाही आला जेव्हा अक्षयकुमारच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदींनीच त्याला दिलं क्लीनबोल्ड उत्तर.


अक्षयने घेतली पंतप्रधानांची ग्रेट भेटतप्रधान नरेंद्र मोदींच्या अक्षयकुमारने घेतलेल्या नॉन पॉलीटीकल इंटरव्ह्यूमध्ये त्याने मोदींच्या आयुष्याशी निगडीत अनेक खाजगी प्रश्न विचारले. या इंटरव्हयूदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कुटुंबापासून ते अगदी त्यांच्या दिनचर्येपर्यतं अनेक गोष्टीबाबत सांगितलं. या इंटरव्ह्यूमध्ये अक्षयकुमारने पंतप्रधानांशी सोशल मीडियाबाबतही चर्चा केली. सोशल मीडिया हे आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण भाग आहे. यावेळी मोदींनी सांगितलं की, मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी सोशल मीडियावर जाऊन नवीन गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो.


जेव्हा मोदींनी घेतली खिलाडीची फिरकी


पण या मुलाखतीत खरी मजा तेव्हा आली जेव्हा अक्षयकुमारने पंतप्रधान मोदींना त्यांच्यावर बनणाऱ्या मीम्सबाबत विचारलं. यावर मोदींनी हसतच उत्तर दिलं की, मी ते मीम्स एन्जॉय करतो आणि त्याचवेळी विषय निघाला अक्कीची बायको ट्विंकल खन्नाचा. तेव्हा मोदी म्हणाले की, मी ट्विंकलचही ट्विटर चेक करत असतो. त्यावेळी खिलाडी अक्षय अवाक झाला.

पंतप्रधान नरेंद मोदी ट्विंकल खन्नाच्या ट्वीट्सबाबत म्हणाले की, मी माझं सोशल मीडिया जेव्हा पाहतो तेव्हा मला जगात जे चाललं आहे, त्याची माहिती मिळते. मी तुझंही (अक्षयकुमार) ट्वीटर बघतो आणि ट्विंकल खन्नाचंही ट्विटर पाहतो. तेव्हा मला कधी कधी असं वाटतं की, ती सर्व राग माझ्याच ट्वीटरवर काढते. पण यामुळे तुमच्या कुटुंबात मात्र शांतता नांदत असेल. माझ्यावर सगळा राग निघाल्याने तुला मात्र नक्कीच आराम मिळत असेल. अशाप्रकारे मी तुमच्याही कामी येतो.’ खरंतर भाजपच्या अच्छे दिन या मोहिमेची ट्वींकलने सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती. पण त्यात तिचीच फजिती झाल्याचं दिसून आलं होतं.


जेव्हा पंतप्रधान मोदी हे बोलत होते, तेव्हा अक्षयकुमार एकही शब्द बोलला नाही. तो फक्त शांत बसून त्यांचं सर्व म्हणणं ऐकत होता आणि हसत होता. मोदींनी हेही सांगितलं की, ते ट्वींकल खन्नाच्या आजोबांनाही भेटले आहेत.


ट्विंकलने मानले पंतप्रधानांचे आभारही बातमी व्हायरल होताच सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असणाऱ्या ट्विंकलनेही लगेचच ट्वीट केलं. तिने ट्वीटमध्ये म्हटलं की, मी पंतप्रधान मोदींच्या या उत्तराकडे सकारात्मकपणे बघते. मला आनंद आहे की, त्यांना माझ्याबद्दल माहीत असून ते माझे ट्वीट्सही वाचतात.