Sacred Games 2 :धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने अनुराग कश्यपविरोधात पोलीस तक्रार

Sacred Games 2 :धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने अनुराग कश्यपविरोधात पोलीस तक्रार

सेक्रेड गेम्सचा पहिला सीझन जबरदस्त गाजला. त्यामुळे दुसरा सीझन कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. नुकताच काही दिवसांपूर्वी हा सीझन प्रदर्शित झाला आहे. यालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पण Sacred Games 2 चा दिग्दर्शक अनुराग कश्यप मात्र त्यातील काही दृष्यांमुळे कात्रीत सापडला आहे. अनुराग कश्यपविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिख समुदायाच्या धार्मिक भावना यातील काही दृष्यांमुळे दुखावल्या गेल्या असल्याने अनुराग कश्यपविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. 

दिल्ली भाजप प्रवक्ता तजिंदर पालने केली तक्रार

दिल्ली भाजप प्रवक्ता तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी अनुराग कश्यपविरोधात तक्रार केली आहे. बग्गाने यामध्ये जाणूनबुजून अनुराग कश्यप यांनी अशा प्रकारची दृष्य दाखवण्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आलेली सरताजची व्यक्तिरेखा ही शीख समुदायातील असून आपल्या हातातील कडं काढून अपमानकारकरित्या फेकून देते असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. ही व्यक्तिरेखा सैफ अली खानने साकारली आहे. हा शीख समुदायाचा अपमान असल्याचंही बग्गा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुढे अनुराग कश्यपवर काय कारवाई होणार हे बघावं लागणार आहे. 

संगीताचा ‘बाजार’ न मांडणाऱ्या संगीत दिग्दर्शक खय्याम यांचं निधन

यापूर्वीदेखील सिरसा यांनी दर्शवला होता विरोध

यापूर्वीदेखील मजिंदर एस. सिरसा यांनी या दृष्याला विरोध केला होता. तसंच अनुराग कश्यपवर सांप्रदायिक कंटेन्टचा प्रचार करण्याचा आणि धार्मिक भावना तसंच लोकांच्या विश्वासाल तडा देण्याचा आरोप लावला आहे. तसंच सिरसा यांनी अनुराग कश्यप समाजामध्ये असामंंजस्य पसरवत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. हे सर्व असलं तरीही अजून अनुराग कश्यपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसंच यात भूमिका साकारणार सैफ अली खान यानेही याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. तसंच नवाजुद्दीन सिद्दीकीनेदेखील यावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. 

‘साजणा'ने गाठली शंभरी, मालिकेचं यश आणि पूजाच्या वाढदिवसानिमित्त केलं सेलिब्रेशन

अनुराग नेहमीच फसतो कन्ट्रोव्हर्सीमध्ये

Instagram

अनुराग कश्यपद्वारे दिग्दर्शित सेक्रेड गेम्सचे दोन्ही सीझन हे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान अर्थात गणेश गायतोंडे आणि सरताज या दोन व्यक्तिरेखांभोवती गुंफलेले आहेत. अनुराग कश्यप नेहमीच कन्ट्रोव्हर्शियल चित्रपट अथवा वेबसिरीजचं दिग्दर्शन करतो असं म्हटलं जातं. त्याशिवाय अनुराग त्याच्या व्यक्तीगत आयुष्यामुळेही चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने आपलं प्रॉडक्शन हाऊस पबंद केलं. त्यानंतर ट्विटर सोडण्याची घोषणा करून आपलं अकाऊंटदेखील त्याने डिलीट केलं. तसंच आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीला डेट करण्यासाठीही अनुराग सध्या चर्चेत आहे. त्यामुळे आता या पोलीस तक्रारीनंतर अनुरागची प्रतिक्रिया नक्की काय असणार आणि अनुराग काय पाऊल उचलणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अनुरागने हे दोन्ही सीझन दिग्दर्शित केले असून यातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. पहिल्या सीझनच्या वेळीदेखील काही दृष्यांबाबत वाद निर्माण झाला होता. त्यावेळी यामध्ये राजकीय व्यक्तींनीही हस्तक्षेप केला होता. कारण त्यातील काही राजीव गांधींची दृष्य यातून वगळण्यात यावी असं सांगण्यात येत होतं. पण त्या वादांचं पुढे काय झालं हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे आता हा वाददेखील असाच विरळणार की चिघळणार हे येणारा काळच ठरवेल.

हृतिक रोशन जगातील ‘हँडसम’ पुरुषांच्या यादीत अव्वल 5 मध्ये