करण जोहरच्या घरात झालेल्या 'त्या'पार्टीची होणार चौकशी

करण जोहरच्या घरात झालेल्या 'त्या'पार्टीची होणार चौकशी

बॉलिवूडवर सध्या ड्रग्जचे वादळ घोंगावत आहे. सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणाची चौकशी करताना बी टाऊनमधील ड्रग्जकांड बाहेर आल्यामुळे आता नार्कोटिक विभाग चांगलाच कामाला लागला आहे. रिया आणि शौविकने दिलेल्या महत्वपूर्ण माहितीनुसार बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावं ही ड्रग्जशी जोडली गेली आहे.गेल्यावर्षी करण जोहर याच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. यामध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचा समावेश होता.या व्हिडिओमध्ये काही कलाकार हे ड्रग्जचे सेवन करत असल्याचा दावा अनेकांनी केला होता. आता या प्रकरणी अकाली दलाच्या मनजिंदर सिंह सिरसा यांनी तक्रार दाखल केल्यामुळे करण जोहरच्या घरी झालेल्या ‘त्या’ पार्टीची चौकशी होणार असल्याचे कळत आहे.

सौरव गांगुलीवर येणार बायोपिक, हा अभिनेता साकारणार का भूमिका

काय केली आहे तक्रार

मनजिंदर सिंह यानी नार्कोटिक्सविभागाकडे यासंदर्भात एक लेखी तक्रार केली आहे. त्यांनी या पार्टीमध्येही अशाच पद्धतीने अंंमली पदार्थांचे सेवन करण्यात आले होते की, नाही याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले असून त्यांनी दाखल केलेल्या तक्रारपत्राचे फोटो त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहे. शिवाय त्यांनी तो व्हिडिओ देखील शेअर केला आहे. जो करण जोहरने या आधी सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहून नार्कोटिक्स विभागाने त्याची चौकशी करावी.

करण जोहरने आधीच केला होता खुलासा

करण जोहरने हा पार्टी व्हिडिओ ज्यावेळी टाकला होता. त्यावेळीही यावर वाद निर्माण झाले होते. या पार्टीमध्ये उपस्थित असलेले मलायका अरोरा, दीपिका पदुकोण,वरुण धवन, शाहीद कपूर, विकी कौशल, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, झोया अख्तर उपस्थित होते.प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये असे काहीही दिसत नाही की, ज्यामुळे संशय उपस्थित होईल. पण तरीही करण जोहरने या व्हिडिओ संदर्भात एक स्पष्टीकरण या आधीही दिले होते. त्याने सांगितले होते की, खूप कामानंतर एक चांगला वेळ घालवण्यासाठी ही पार्टी त्याने त्याच्या घरी ठेवली होती. यामध्ये कोणत्याही प्रकारे ड्रग्जचे सेवन झाले नव्हते. जर असे झाले असते तर मी हा व्हिडिओ अशा पद्धतीने सोशल मीडियावर का पोस्ट केला असता. ज्या गोष्टीमुळे मी वादात सापडेन असा व्हिडिओ मी सोशल मीडियावर का पोस्ट करेन? मी इतकाही मूर्ख नाही ,असे त्याने म्हटले होते. 

अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज आता 'Amazon Alexa'ला

सुशांत प्रकरणातही आले होते नाव

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यापासून बॉलिवूडमधील अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. सुशांच्या आत्महत्येसाठी नेपोटिझम कारणीभूत असल्याचे म्हटले जात होते. स्टार किडला लॉन्च करण्यामध्ये सातत्याने पुढे असलेल्या करणचीही त्यामुळे चौकशी केली गेली. करणच्या काही चित्रपटांमधून सुशांतला डिच्चू देण्यात आल्याचे सांगितले जात होते. पण नंतर हा आरोपही खोटा ठरला. करणसोबत अन्य काही चित्रपट निर्मात्यांचीही कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये महेश भट्ट यांचा देखील समावेश होता. तर या वादामध्ये अनुराग कश्यपनेदेखील उडी घेतली होती. त्याने काही स्क्रिनशॉट शेअर करत सुशांतशी काही खासगी कारणामुळे काम करत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे एकीकडे बॉलिवूडचे दिग्गज आणि आऊटसाईडर असा वाद जुंपला होता आणि तो अद्यापही सुरु आहे. 


दरम्यान सुशांत प्रकरण ड्रग्जच्या दिशेने वळल्यामुळे आता या नव्या प्रकरणातून नेमके काय बाहेर येणार त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

बिग बॉस 14' मधील सर्व स्पर्धकांची होणार कोरोना चाचणी, राहणार क्वारंटाईन