नच बलिये 9 शोदरम्यान पूजा बॅनर्जीला दुखापत

नच बलिये 9 शोदरम्यान पूजा बॅनर्जीला दुखापत

नच बलिये हा एक लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. या शोचा नववा भाग सध्या टेलिव्हिजनवर सुरू आहे. या शोमधून दर आठवड्याला प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत असतं. मात्र हा शो एका वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच या शोमधील एका जोडीवर एका कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ आली आहे. पूजा बॅनर्जी आणि संदीप सेजवाल या जोडीला या शोमधून अचानक एक्झिट घ्यावी लागणार आहे. ज्यामुळे पूजाचे चाहते नक्कीच नाराज झाले आहेत. 

पूजाने घेतली होती वाईल्ड कार्ड एन्ट्री

पूजा बॅनर्जी टेलिव्हिजन माध्यमातील हिंदी मालिका 'कसौटी जिंदगी की' मध्ये अनुराग बासुची बहीण निवेदिता बासुची भूमिका साकारत आहे. पूजाकडे अभिनयासोबत नृत्यांचे कौशल्यदेखील आहे.  पूजाचे पती संदीप जैस्वासल देखील नॅशनल लेव्हल स्विमिंग चॅम्पियन आहेत. ज्यामुळे दोघांनी नुकतीच नच बलिये 9 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. दोघांच्या जोडीला चांगला प्रतिसाददेखील मिळत होता. त्या दोघांची जोडी खूप पुढे जाईल असं प्रेक्षकांना वाटत होतं. मात्र अचानक असं काही घडलं की या दोघांना आता या शोमधुन बाहेर पडावं लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा डान्सच्या सरावादरम्यान जखमी झाली आहे. ज्यामुळे तिला आता नृत्य करणंच नक्कीच शक्य नाही. या कारणासाठी पूजा या शोमधुन बाहेर पडली आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना फारच दुःख झालं आहे. 

नच बलियेच्या सेटवर नेमकं काय झालं

या अपघाताबाबत सांगताना पूजाचे जोडीदार संदीप जेस्वाल यांनी सांगितलं की, "पूजा आणि मी नृत्याचा सराव करत होतो. ज्यासाठी तिला माझ्या खांद्यावर उभं राहून मागच्या दिशेने झुकायचे होते. मात्र पूजाचा तोल गेला आणि उंचावरून खाली कोसळली ज्यात तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. हात फ्रॅक्चर झाल्यामुळे तिला त्वरीत हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. हॉस्पिटलमध्ये उपचार करताना पूजाच्या हातावर प्लास्टर लावण्यात आलं आहे. पूजाला गंभीर दुखापत झाल्यामुळे आम्ही आता नच बलियेमध्ये भाग घेऊ शकत नाही."

पूजाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये बेडवर कन्हत असताना दिसत आहे. या अपघातामुळे पूजा नच बलिये 9 मधून बाहेर पडली आहे ज्यामुळे तिचे चाहते नक्कीच निराश झाले आहेत. मात्र पूजाने या आजारपणातून लवकर बाहेर पडावं आणि तिची तब्येत पुन्हा पूर्ववत व्हावी अशीच त्यांची नक्कीच इच्छा आहे. यापूर्वी अभिनेत्री उर्वशी ढोलकियालादेखील या शोमध्ये अपघात झाला होता. मात्र तिला झालेली दुखापत गंभीर नव्हती पूजाला मात्र गंभीर दुखापतीचा सामना करावा लागत आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा

New series: कांंबले साहब को पता है... आला 'पांडू'चा ट्रेलर

लवकरच राखी सावंत करुन देणार पती रितेशची ओळख

गौरी कुलकर्णीला अभिनयासोबत आहे ‘या’ गोष्टीची आवड