कतरिनाबरोबर झळकतेय 'ही' मराठमोळी अभिनेत्री, होतोय अभिनंदानाचा वर्षाव

कतरिनाबरोबर झळकतेय 'ही' मराठमोळी अभिनेत्री, होतोय अभिनंदानाचा वर्षाव

मराठी चित्रपटसृष्टीतील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलीवूड गाजवलं आहे. मराठी चित्रपटाप्रमाणेच त्यांनी आपल्या अभिनयाचा डंका बॉलीवूडमध्येही गाजवला आहे. सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर ही त्यापैकीच काही नावं. त्यामध्ये आता अजून एका नावाची भर पडली आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या एक मराठी अभिनेत्री चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा ‘जंगली’ नावाचा चित्रपट अभिनेता विद्युत जामवालसोबत प्रदर्शित झाला. पूजा सावंत हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला नक्कीच नवं नाही. आता तिने आपला जम बॉलीवूडमध्येही बसवायला सुरूवात केली आहे. आता मात्र ती चर्चेत आली आहे त्याला खास कारण आहे आणि ते म्हणजे ती एका दागिन्यांची जाहिरातीमध्ये झळकली असून तिने काम केलं आहे ते कतरिना कैफबरोबर. त्यामुळे तिच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Good News: कल्कीने दिली गोड बातमी, केला होणाऱ्या बाळाबद्दल खुलासा

मराठी कलाकारांनी केलंय कौतुक

पूजा सावंतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले असून ती सध्या एका दागिन्यांची जाहिरात दिवाळीच्या निमित्ताने करत आहे. यामध्ये तिच्याबरोबर चक्क बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री कतरिना कैफ आहे. त्यामुळे पूजाने हे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या मराठी चित्रपटसृष्टीतील मित्रमैत्रिणींना अक्षरशः अभिनंदाचा वर्षाव करत कौतुक केलं आहे. या फोटोजना खूपच लाईक्स आणि कमेंट्सदेखील पूजाला मिळाल्या आहेत.  पूजा मराठी चित्रपटसृष्टीत व्यवस्थित स्थिरावली आहे. आता तिला बॉलीवूडचे दरवाजे खुणवत आहेत असं म्हणायला हरकत नाही. कतरिनाचे लाखो करोडो चाहते आहेत आणि तिच्याबरोबर पूजा सावंत या जाहिरातीमध्ये झळकली असून तिच्यावर जास्त फोकस असल्याचंही लक्षात येत आहे. त्यामुळे एका मराठी अभिनेत्रीचं अगदी तोंड भरून कौतुक करण्यात येत आहे. पूजाने आतापर्यंत केलेल्या कामांमध्ये ही जाहिरात नक्कीच लक्षवेधी ठरत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

‘ड्रीम गर्ल’ नंतर आयुषमान खुराणा घेतोय चित्रपटांपासून ‘ब्रेक’

‘क्षणभर विश्रांती’ नंतर मागे वळून पाहिलं नाही

पूजा सावंत एका स्पर्धेतून जिंकून पुढे आली. पूजाच्या करिअरला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झाली आहे. पूजा ही अतिशय सामान्य घरातील मुलगी असून तिने आपल्या मेहनतीने इथपर्यंतचा प्रवास केलेला असल्याने इतर मुलींसाठी ती प्रेरणा ठरली आहे. तिने पहिला चित्रपट केला तो म्हणजे ‘क्षणभर विश्रांती’. पण या चित्रपटातील अभिनयाने तिने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आणि त्यानंतर तिने कधीही विश्रांती घेतली नाही. तिने अभिनयाच्या जोरावर अनेक मराठी चित्रपट केले. त्याशिवाय आता तिने बॉलीवूडमध्येही नशीब आजमवायला सुरुवात केली आहे. ‘दगडी चाळ’, ‘आता गं बया’, ‘नीळकंठ मास्तर’, ‘सतरंगी रे’ यासारख्या मराठी चित्रपटातून पूजाने विविध भूमिका साकारल्या आहेत. तसंच पूजा सोशल मीडियावरदेखील अॅक्टिव्ह असते. तिला अनेक फॉलोअर्स आहेत आणि आपण आपल्या आयुष्यात कोणते नवे प्रोजेक्ट करत आहोत याचीदेखील इत्यंभूत माहिती पूजा आपल्या चाहत्यांना देत असते. अनेक मोठ्या कलाकारांंबरोबर पूजाने काम केलं असून तिचे पुढचे प्रोजेक्ट कोणते आहेत याविषयी आता तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. या जाहिरातीनंतर पूजा आता नक्की पुढे कोणत्या चित्रपटात दिसणार अथवा पूजा आता अजून काही नवं प्रोजेक्ट करणार आहे का याविषयीदेखील चर्चा सुरू झाली आहे.

'The Kapil Sharma show' मध्ये पुन्हा येणार का नवज्योत सिंह सिद्धू

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

You May Also Like: Happy Diwali Wishes In Marathi