पूनम पांडे अडकली विवाहबंधनात,गुपचूप केले लग्न

पूनम पांडे अडकली विवाहबंधनात,गुपचूप केले लग्न

वेगवेगळ्या आणि विचित्र कॉन्ट्राव्हर्सीजमुळे कायम चर्चेत असलेली पूनम पांडे अखेर विवाहबंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी तिचे साखरपुड्याचे फोट वायरल झाले होते. पण तिने आता शेअर केलेले लग्नाचे फोटो स्टंट तर नाही ना ? असा प्रश्न अनेकांना पडला होता.पण तिने खरेच लग्न केले असा खुलासा अनेक वृत्तवाहिन्यांकडून करण्यात आला आहे. तिचा तथाकथित बॉयफ्रेंड सॅम मुंबई हिच्याशी ती विवाहबंधनात अडकली असून या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर हे फोटो शेअर केले आहेत. या नवीन सेलिब्रिटी दाम्पत्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये झालेल्या सेलिब्रिटी लग्नांमध्ये आता पूनम पांडेचे नाव देखील जोडले गेले आहे.

वाढदिवसाच्या दिवशी अनुराग कश्यप होत आहे ट्रोल, ड्रग्जचाही होतोय उल्लेख

पुढचे सात जन्म तूच हवास

पूनम पांडेने लग्नाचा एक फोटो शेअर करत पुढील सात जन्मासाठी @sambombay ला मी लॉक केल्याचे म्हटले आहे.तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स दिल्या आहेत. कायम इरॉटिक व्हिडिओ करणारी पूनम पांडे अनेकांना लग्नाच्या हेव्ही कपड्यात दिसणे अनेकांना रुचले नाही. म्हणूनच तिच्या फोटोखाली शुभेच्छांसोबत अशा काही कमेंटसचाही समावेश आहे. दरम्यान पूनमने या फोटोमध्ये काळ्यारंगाचा लेहंगा घातला आहे तर त्यालाच साजेसा असा ट्रेडिशनल शेरवानी सूट सॅमने घातला आहे. पूनमला पहिल्यांदाच अनेकांनी इंडियन वेअरमध्ये पाहिल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे हे नक्की!

View this post on Instagram

Here’s looking forward to seven lifetimes with you.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

कोण आहे सॅम बॉम्बे

Instagram

पूनम पांडेने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये सॅम बॉम्बे सतत टॅग होत होता. त्यामुळे पूनमच्या आयुष्यात असलेली ही व्यक्ती नेमकी कोण आहे याचा शोध अनेक जण घेत होते. सध्या गुगलवर याचा अधिक शोध घेतला जात आहे. सॅम बॉम्बे निर्माता, दिग्दर्शक आणि एडिटर आहे.  पूनम पांडेसोबत त्याचे नाव जोडले गेल्यानंतर तो सर्वाधिक चर्चेत आला होता.  त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर त्याने अनेक हिंदी,टॉलिवूड आणि हॉलिवूडच्या काही चित्रपटांच्या सेटवरचे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामुळे तो ही एक नावाजलेला सेलिब्रिटी आहे. 

दोन वर्षांच्या आत 'कसौटी जिंदगी की' मालिका गुंडाळणार गाशा

पूनम पांडेला झाली अटक

पूनम पांडेने लॉकडाऊनमध्ये साखरपुडा केला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. साखरपुड्याच्या रात्री सॅम आणि तिला लॉकडाऊनच्या नियंमाचे उल्लंघन केल्यामुळे तिला अटक केल्याची बातमी आली होती. पण ही बातमी केवळ अफवा असल्याचा खुलासा पूनम पांडेने एक पोस्ट करुन केला आहे. त्यामुळे तिला आणि सॅमला कोणत्याही प्रकारे अटक करण्यात आली नव्हती हे तिने स्पष्ट केले. 

दीपिका पादुकोण गोव्याला रवाना, या आगामी चित्रपटाचं शूटिंग होणार सुरू

पूनम पांडे आणि तिचे व्हिडिओ

पूनम पांडे अनेक कारणांमुळे चर्चेत आली आहे. भारतीय क्रिकेट टीमने 2011 साली वर्ल्ड कप जिंकल्यावर ती तिचे नग्न फोटो शेअर करेल असे सांगितले होते. तिच्या या विचित्र गोष्टीमुळे भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे होते. पण  तिने तिचे विधान मागे घेत यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्यावेळी तिने तिचे कोणतेही फोटो शेअर केले नाही. पण पूनम मांडे ही तिच्या इरॉटिक व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. तिचे अनेक व्हिडिओ आक्षेपार्ह असतात पण हे व्हिडिओच तिची ओळख आहे. 


सध्या या सगळ्यापेक्षा ती विवाहबंधनात अडकली आहे आणि तिने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे हे फार महत्वाचे आहे. POPxo मराठीकडून तिला शुभेच्छा!