पूनम पांडेच्या पतीला झाली गोव्यात अटक, शोषणाचा आरोप

पूनम पांडेच्या पतीला झाली गोव्यात अटक, शोषणाचा आरोप

दोन आठवड्यांपूर्वी अर्थात 10 सप्टेंबरला बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसह गुपचूप लग्न करून अभिनेत्री पूनम पांडेने सर्वांनाच धक्का दिला होता. पण आता 12 दिवसातच या दोघांचं लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी रात्री उशीरा पूनम पांडेला मारण्याबद्दल, शोषण केल्याबद्दल आणि धमकी दिल्याबद्दल तिचा पती सॅम बॉम्बे याला गोवामधील कानाकोना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे सध्या हनीमूनसाठी गोव्यात गेले होते. तर पूनम पांडे कोणत्या तरी चित्रपटाच्या चित्रीकरणातही व्यस्त होती असंही सांगण्यात येत आहे. पण पोलिसांनी सॅम बॉम्बेला अटक केल्याचेही सांगण्यात येत आहे.

View this post on Instagram

❤️

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey) on

पूनम पांडेने लावला आरोप

कानाकोना पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या सांगण्यानुसार पूनमने केलेल्या तक्रारीनुसार सोमवारी रात्री तिच्या पतीवर शारीरिक शोषण आणि मारल्याचा आरोप लावण्यात आला आहे. इतकंच नाही तर सॅम बॉम्बेने तिला धमकीही दिल्याचे सांगण्यात आले आहे. पूनमच्या पाठीवर आणि डोक्यावर गंभीर जखम झाली असून तिला बेल्ट अथवा तत्सम गोष्टीने मारण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नक्की या दोघांमध्ये काय झाले याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. इतके वर्ष एकमेकांना ओळखणारे आणि अचानक लग्नाच्या 12 दिवसात असं काय  झालं की, गोव्याला जाऊन पतीवर पूनमने अशा प्रकारचे आरोप लावले? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. 

खळबळजनक कृत्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पूनम पांडेने केला साखरपुडा

बुधवारी न्यायालयात नेण्यात येणार

पूनमने केलेल्या तक्रारीनंतर पती सॅम बॉम्बेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर आयपीएस कलम 354 ए, 323, 324 आणि 506 (2) अन्वये त्याला अटक करण्यात आली. यामध्ये काही लावण्यात आलेल्या कलमानुसार सॅमला जमानत मिळू शकत नाही. बुधवारी सॅमला न्यायालयात हजर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्यानंतरच सॅमच्या बाबतीत पुढे काय करणार हे समजेल. पूनम पांडेची यावर मात्र कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

पूनम पांडे अडकली विवाहबंधनात,गुपचूप केले लग्न

पुढचे सात जन्म तूच हवास

पूनम पांडेने याच महिन्यात लग्नाचा एक फोटो शेअर करत पुढील सात जन्मासाठी @sambombay ला मी लॉक केल्याचे म्हटले होते. कायम इरॉटिक व्हिडिओ करणारी पूनम पांडे अनेकांना लग्नाच्या हेव्ही कपड्यात दिसणे अनेकांना रुचले नाही. म्हणूनच तिच्या फोटोखाली शुभेच्छांसोबत अशा काही कमेंटसचाही समावेश होता. पूनमला पहिल्यांदाच अनेकांनी इंडियन वेअरमध्ये पाहिल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे हे नक्की! पण सात जन्म काय केवळ 12 दिवसातच पूनम आणि सॅमच्या लग्नाचा सध्या बट्ट्याबोळ झालेला दिसून येत आहे. तिने आता शेअर केलेले लग्नाचे फोटो स्टंट तर नाही ना ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण तिने खरेच लग्न केले असा खुलासा अनेक वृत्तवाहिन्यांकडून करण्यात आला होता. पण आता हे सगळं प्रकरण घडल्यानंतर नक्की या दोघांचे काय चालू आहे असाही प्रश्न आता नेटिझन्सना पडला आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये असं नक्की काय घडलं असाही प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. 

देशद्रोही म्हणणाऱ्यांवर चिडली राखी सावंत म्हणाली...

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक