मराठी चित्रपटसृष्टीतील एकसे एक अभिनेते

मराठी चित्रपटसृष्टीतील एकसे एक अभिनेते

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आज एक से एक अभिनेते आहेत. जे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या लोकप्रिय आहेत. याच अनुंषगाने POPxoMarathi ने विचारलेल्या सध्याचा आवडता मराठी अभिनेता कोणता, या पोल प्रश्नाला अनेक चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या पोलचा रिझल्टमध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेले अभिनेते आहेत पुढीलप्रमाणे. 

वैभव तत्त्ववादी

चॉकलेट बॉयची इमेज असणारा अभिनेता वैभव तत्त्ववादी आता मराठी चित्रपटसृष्टीत चांगलाच स्थिरावला आहे. त्याने फक्त मराठीतच नाहीतर हिंदीतही चांगल्या भूमिका केल्या. त्याने बाजीराव मस्तानी आणि मणिकर्णिका या दोन्ही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. नुकतीच त्याची वेबसीरिज हुतात्मासुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. POPxoMarathi ने घेतलेल्या पोलमध्ये सर्वात जास्त मतं आली आहेत वैभवला.

अभिनय बेर्डे

अभिनय बेर्डे हा मराठीतला युवा अभिनेता आहे. ज्याने आपल्या बाबा लोकप्रिय विनोदी मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याप्रमाणे अजून यश चाखलं नसलं तरी त्याच्या अभिनयाला चांगलीच वाहवा मिळाली. लवकरच अभिनयलाही आपल्या बाबांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळेल यात शंका नाही. पॉपएक्सो मराठीने घेतलेल्या पोलमध्ये एका वाचकाने लक्ष्मीकांत बेर्डे यांचंही नाव घेतलं आहे. 

सुबोध भावे

अभिनेता सुबोध भावे हे नावं आता मराठीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. त्यांनी फक्त चित्रपटातच नाहीतर मराठी मालिका आणि नाटकांमध्येही चांगलंच यश मिळवलं आहे. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात बसल्या आहेत मग ती बालगंधर्व असो लोकमान्य टिळक असो वा काशीनाथ घाणेकर. सध्या सुबोध बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या मराठी चित्रपट विजेता च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

गश्मीर महाजनी

आपल्या वडिलांप्रमाणे गश्मीर महाजनीसुद्धा हँडसम आणि हॉट आहे. त्याच्या सोशल मीडियावरच्या प्रत्येक पोस्ट लगेच व्हायरल होतात. मग तो त्याच्या डान्स अकॅडमीमधील गणपतीच्या आरतीचा व्हिडिओ असो वा त्याच्या क्यूट मुलासोबतचा फोटो असो. लवकरच तो बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या एका चित्रपटातही झळकणार आहे.

स्वप्नील जोशी

View this post on Instagram

🤔

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

गोड चेहऱ्याचा आणि चॉकलेट बॉयची इमेज असणार स्वप्नील जोशी. नेहमीच प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्यांच्या यादीत राहिला आहे. त्याचे अनेक चित्रपट हिरो म्हणून गाजले आहेत. मग तो दुनियादारी असो वा मुंबई-पुणे-मुंबई असो वा चेकमेट असो. स्वप्नील नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिकांतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो.

तर या मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांसोबतच मराठी मालिकांमधील डॉ. अमोल कोल्हे, शशांक केतकर, हार्दिक जोशी आणि भाऊ कदम यांचीही नावं POPxoमराठीच्या फॉलोअर्सनी पोलमध्ये घेतली होती.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.