प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याला कोरोनाची लागण, मात्र रुग्णालयात करून घेतले नाही दाखल

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याला कोरोनाची लागण, मात्र रुग्णालयात करून घेतले नाही दाखल

कोरोना या महामारीने जगभरात हाहाःकार माजवला आहे. रोज काही ना काहीतरी नवे ऐकू येत आहे. भारतामध्येही कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज नवीन काहीतरी चित्र समोर येत आहे. मात्र या दरम्यान सध्या स्पेनमध्ये आपल्या नवऱ्याबरोबर राहात असलेली बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री श्रिया सरनलादेखील या महामारीला सामोरं जावं लागलं आहे. तिने आपल्याला आलेला अनुभव सोशल मीडियावर सांगितला आहे. कोरोना  व्हायरसमुळे स्पेनमध्ये सध्या अतिशय खराब वातावरण आहे. ज्यांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेले नाही त्यांनी कोणत्याही रूग्णालयात जाणं म्हणजे एखाद्या मोठ्या संकटाचा सामना करणं आहे. श्रिया सरण आपला नवरा आंद्रेई कोशीवसह सध्या स्पेनमध्ये राहात आहे. तिच्या नवऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे काही लक्षण दिसून आल्यानंतर श्रिया त्याला घेऊन रूग्णालयात गेली. मात्र त्याला डॉक्टर्सने तपासणी करण्यासाठीही नकार दिल्याचे श्रियाने सांगितले आहे. स्पेनमध्ये कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आहे.  अजूनही ही परिस्थिती म्हणावी तशी आटोक्यात आलेली नाही. 

श्रिया आणि आंद्रेईने स्वतःला केले क्वारंटाईन

View this post on Instagram

True love #stayathome @andreikoscheev

A post shared by Shriya Saran (@shriya_saran1109) on

स्पेनमध्ये आपल्या नवऱ्याबरोबर राहात असलेल्या श्रियाने आपला कोरोनाबाबत अनुभव सांगितला आहे. ती एक महिन्यापासून घरात लॉकडाऊन आहे. कोरोना व्हायरसमुळे अधिक प्रभावित असलेल्या देशांमध्ये स्पेनदेखील आहे. श्रियाने सांगितले की, COVID - 19 मुळे गोष्टी खूपच बदलल्या आहेत. काही आठवड्यातच आयुष्य पूर्ण बदलून गेले आहे. तिच्या नवऱ्याला अचानक ताप आणि कोरड्या खोकल्याची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे त्याला घेऊन श्रिया लगेच रुग्णालयात पोचली होती. पण तिथे असलेल्या डॉक्टरांनी मात्र त्यांना तिथे न थांबण्याचा सल्ला दिला. कोरोना इन्फेक्शन नसेल तरीही इथे थांबल्यास व्हायरसमुळे संक्रमित होण्याचा धोका असल्याचे तिला डॉक्टरांकडून सांगण्यात आले. श्रिया आणि तिच्या नवऱ्याला एकाच घरात लांब राहून स्वतःला क्वारंटाईन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. 

आलियाच्या घरचे संपले सामान, सोनी राजदानने मांडली मुख्यमंत्र्यापुढे व्यथा

श्रिया आणि तिच्या नवऱ्याने स्वतःला केले आयसोलेट

डॉक्टरांच्या या सल्ल्यानंतर दोघेही घरी परत आले आणि त्यांनी स्वतःला आयसोलेट करण्याचा निर्णय घेतला. घरातच आंद्रेईवर उपचार करण्यात आले. पण आता सगळे ठीक आहे.  आता आंद्रेईची तब्बेत सुधारली असून तो व्यवस्थित असल्याचेही श्रियाने सांगितले आहे. श्रियाने हेदेखील सांगितले की, 13 मार्चला जेव्हा आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते दोघे बाहेर जात होते तेव्हाच त्यांना कोरोना व्हायरसच्या या त्रासाची जाणीव झाली. श्रिया आणि आंद्रेईचं 2018 मध्ये लग्न झालं. तेव्हापासूनच श्रिया स्पेनमध्ये त्याच्याबरोबर स्थायिक झाली आहे. मात्र हा काळ अत्यंत वाईट असल्याचे आणि आपल्याला आलेला अनुभव हा अंगावर काटा आणणारा होता असंही तिने सांगितले आहे.  

शाहरूख खानने मेडिकल स्टाफच्या सुरक्षेसाठी 25 हजार पीपीई किट्सची केली मदत

अजय देवगणबरोबर केले होते काम

श्रिया सरणने दाक्षिणात्य चित्रपटात जास्त काम  केले असले तरीही बॉलीवूडमध्येही तिने काम केले आहे. अजय देवगणच्या ‘दृष्यम’ या चित्रपटात तिने उत्तम अभिनय केला होता. तसंच ती इतरीही काही हिंदी चित्रपटांमध्ये दिसली होती. सध्या ती आपल्या नवऱ्याबरोबर स्पेनमध्ये असून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. मात्र आपल्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर नवऱ्याबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. 

लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीवर संकट, हजारो करोडचं होऊ शकतं नुकसान