नव्या मराठी मालिकांची लागणार वर्णी, या मालिका घेत आहेत निरोप

नव्या मराठी मालिकांची लागणार वर्णी, या मालिका घेत आहेत निरोप

मालिकांना सुरूवात झाली की, त्या अगदी मनापासून पाहिल्या जातात. पण नंतर जसजसे भाग वाढत जातात तसतसा त्यातला प्रेक्षकांचा रस निघून जातो. आता झी मराठीवर अशा बऱ्याच मालिका आहेत ज्या अगदी रटाळ आणि कंटाळवाण्या वाटू लागल्या असून प्रेक्षकांनाही या मालिकांचा शेवट व्हावा असं वाटत आहे. लवकरच ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘पाहिले न मी तुला’ या दोन्ही मालिका सुरू होत आहेत. याचे प्रोमोही जोरात सुरू झाले आहेत आणि प्रेक्षकांनाही आता या नव्या मालिका कधी येणार आहेत आणि कोणत्या मालिकांच्या जागी येणार आहेत याची उत्सुकता लागून राहिली आहे.

शशांक केतकरचे पुनरागमन

शशांक केतकरला प्रसिद्धी मिळाली ती याच वाहिनीच्या मराठी मालिकेमुळे. यातील कुटुंबवत्सल असा श्री सगळ्यांच्या घरातील झाला. आता लवकरच ‘पाहिले न मी तुला’ या मराठी मालिकेतून शशांक प्रेक्षकांच्या भेटीला येत असून आरोह वेलणकर आणि मिताली मयेकर यांची भूमिका असणारी मालिका ‘लाडाची मी लेक गं’ प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे नक्की झाले आहे. ही मालिका अगदी सुरूवातीपासूनच तितकी गाजली नाही असंच म्हणावं लागेल. अगदी कमी कालावधीतच या मालिकेला गाशा गुंडाळावा लागत आहे. यामध्ये तगडे कलाकार असूनही या मालिकेला म्हणावी तशी प्रसिद्धी आणि प्रेक्षकांची साथ लाभली नाही. त्यामुळेच ही मालिका अगदी लवकरच संपत आहे.

सोहा - कुणालची इनाया बनवते आहे पोळ्या, व्हिडिओ व्हायरल

अण्णा नाईक परत येतोय

आता नव्याने ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचे प्रोमोही सुरू झाले असून अण्णा नाईक परत येत असल्याचे दिसून येत आहे. या मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला असून या मालिकेचा हा तिसरा सीझन आहे. लवकरच ही मालिका येणार असून आता ‘देवमाणूस’ मालिका निरोप घेणार असं कळत आहे. सध्या ही मालिका शेवटच्या टप्प्यात आल्याचे दिसून येत आहे. ही मालिकादेखील गाजली. मात्र अगदी कमी कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला असून रटाळवाणी न करता योग्यवेळी संपवत असल्याची प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे.

प्रियंकाचा धक्कादायक खुलासा, मिस वर्ल्ड होण्याआधी काय घडलं होतं

माझ्या नवऱ्याची बायको भरकटली

गेली कित्येक वर्ष चालू असणारी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका तर आता खरंच भरकटली असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तरीही सध्या या मालिकेमध्ये अनेक वळणं येत आहेत. ही मालिका अजून किती ताणणार असाही प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मात्र अजूनही ही मालिका तितक्याच आवडीने पाहणारे प्रेक्षक असल्याने ही मालिका नक्की कधी संपणार हे सांगण्यात आलेले नाही. तर ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिकादेखील आता वेगळ्याच वळणावर आली आहे. त्यामुळे ही मालिका वेळेवर प्रेक्षकांचा निरोप घेणार का असा प्रश्नही सर्वांना आहे. बबड्या आथा सुधारला असून याचा शेवट चांगला होणार की, पुन्हा तसाच बबड्या दिसणार हा प्रश्न आहेच. लवकरच या मालिकांबाबतही निर्णय होईल अशी आशा प्रेक्षकांना आहे. तूर्तास या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून जुन्या दोन मालिका संपणार आहेत. त्यामुळे आता नव्या मालिका आणि त्यातील काही नवे चेहरे कसे प्रसिद्ध होतील हेदेखील पाहावे लागेल.

Bigg boss : रुबिना दिलैक विजेती, पण राहुलने जिंकली प्रेक्षकांची मनं

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक