प्रनूतनच्या ‘नोटबुक’ चित्रपटातील पहिलं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित

प्रनूतनच्या ‘नोटबुक’ चित्रपटातील पहिलं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित

नूतन यांची नात प्रनूतन बहल आणि झहीर इकबाल ‘नोटबुक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत.  21 फेब्रुवारीला प्रनूतन बहलची आजी आणि दिग्गज अभिनेत्री नूतन यांच्या पुण्यस्मरणानिमित्त नोटबुक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. आता नोटबुक चित्रपटाचं एक रोमॅंटिक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. बॉलीवूडचा भाईजान या चित्रपटातून प्रनूतन बहल आणि झहीर इकबाल यांना चित्रपटसृष्टीत लॉंच करत आहे. सलमान खानने नोटबुकमधील पहिलं रोमॅंटिक गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या गाण्याचे बोल 'नही लगदा' असे आहे. 'नही लगदा' हे गाणं विशाल मिश्राने हे गाणं लिहीलं असून या गाण्याला आसीस कौर ने आवाज दिला आहे. हळूवार प्रेमाचे पदर उलगडणाऱ्या या गाण्याने चाहत्यांना भुरळ घालती आहे. नोटबुक चित्रपटाचं हे गाणं काश्मिरमधील निसर्गरम्य ठिकाणी चित्रीत करण्यात आलं आहे. प्रनूतन यामध्ये फिरदौसची तर झहीर कबीर या नावाच्या भूमिका निभावत आहेत. त्यामुळे नोटबुकमधून ही अनोखी प्रेमकहाणी बघण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

प्रनूतनमध्ये दिसते नूतनची 'झलक'


प्रनूतन मध्ये नूतन यांची झलक दिसून येते. खरंतर प्रनूतने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. मात्र आजी आणि वडिलांप्रमाणेच अभिनयक्षेत्रात काम करण्याची तिची प्रबळ ईच्छा होती. त्यामुळे प्रनूतनने वकिली सोडून चक्क अभिनयक्षेत्रात आपलं नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरी आजी आणि वडिलांच्या नावाचा वापर न करता प्रनूतनने रीतसर ऑडीशन देऊन ‘नोटबुक’ हा  चित्रपट मिळवला आहे. नूतन यांच्या अभिनयाचे आजही अनेक चाहते आहेत. त्यामुळे प्रनूतनचा 'नोटबुक' पाहण्यासाठी देखील प्रेक्षक तितकेच उत्सुक आहेत.

'नोटबुक' 29 मार्चला होणार प्रदर्शित


सलमान खान प्रस्तूत ‘नोटबुक’ 29 मार्च 2019 ला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आलं होतं. नोटबुक हा एक रोमॅंटिक ड्रामा असलेला चित्रपट असणार आहे. शिवाय या चित्रपटाला काश्मिरची पार्श्वभूमी असणार आहे. नोटबूकचं टीझर पाहिल्या नंतर प्रत्येकालाच एकमेकांना न बघता प्रेमात पडणाऱ्या या प्रेमयुगूलांची प्रेमकहाणी पाहण्याची उत्कंठा लागली आहे. शिवाय या चित्रपटात अनेक बालकलाकार देखील असणार आहेत. त्यामुळे या चित्रपटातून प्रनूतन बहल आणि झहीर इकबाल यांची 'ऑनस्क्रीन केमिस्ट्री' चाहत्यांना पाहता येईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितीन कक्कड करत आहेत.

पलक तिवारी करणार टीव्हीवर पदार्पण


सुरज बडजात्या अजूनही सलमानच्या प्रतिक्षेत


राजकुमार रावचा ‘रुहअफ्जा’ हॉरर कॉमेडी चित्रपट


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम