अभिनेत्री नूतन यांच्या स्मृतींना उजाळा देत प्रनूतनच्या 'नोटबुक' चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री नूतन यांच्या स्मृतींना उजाळा देत प्रनूतनच्या 'नोटबुक' चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित

दिवंगत अभिनेत्री नूतन यांची आज पुण्यतिथी आहे. 21 फेब्रुवारी 1991 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांचे निधन झाले होते. नूतन एके काळच्या लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनेक जुन्या चित्रपटांमधून नूतन यांनी दिलेल्या अभिनयकौशल्याचा ठेवा आजही जोपासण्यासारखा आहे. त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा मोहनीश बहल यानेही पुढे चालूच ठेवला. आता मात्र नूतन यांची नात अभिनयक्षेत्रात सक्षम पाऊल रोवण्यास सज्ज झाली आहे. तिचे नाव देखील आजीच्या नावाशी मिळतंजुळतं आहे. नूतन यांची नात प्रनूतन बहल आणि झहीर इकबाल ‘नोटबुक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. प्रनूतन बहलच्या या पहिल्या चित्रपटाचं ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आलं. प्रनूतनने तिच्या ट्विटर अकाऊंटवर या प्रसंगी भावनिक होत आज आनंद, काळजी आणि उत्साह अशी संमिश्र भावना मनात दाटून येत आहे असंही व्यक्त केलं आहे. 

Subscribe to POPxoTV

नूतन यांच्या 'स्मृतींना उजाळा'


नूतन यांनी सक्षम अभिनयाच्या बळावर 'सर्वश्रेष्ठ अभिनेत्री' चा दर्जा मिळवला होता. सुजाता, बंदिनी, मै तुलसी तेरे आंगन की, सीमा, सरस्वती चंद्र, मिलन,  मेरी जंग, नाम, कर्मा अशा अनेक चित्रपटांमधून त्यांना लोकप्रियता मिळाली. सत्तरहून अधिक हिंदी तर काही तेलुगू आणि मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं होतं. आई शोभना समर्थ यांच्याकडून त्यांना हा अभिनयाचा समर्थ वारसा मिळाला होता. जवळजवळ चाळीस वर्ष त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टी गाजवली होती. 21 फेब्रुवारी 1991 ला मात्र कर्करोगाच्या असाध्य आजाराने नूतन यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या निधनानंतरही त्यांचे उर्वरित दोन चित्रपट त्याकाळात प्रदर्शित करण्यात आले होते.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Reposted from @oldbollywoodfan - A rare interview of Verteran Nutan which was taken in 1956- I remember when I was four years old a friend of my mother remarked after taking a long and disapproving look at me, “Honestly, Shobhana what an ugly child you have!” I did not quite understand what had been said, but I knew instinctively that it concerned me – and not too favorably. When I asked my mother later what her friend had said and she told me, I was very hurt. But Mummy comforted me and said, “You should take that as a compliment. An ugly duckling grows into a beautiful swan.” That satisfied me, and whenever anyone remarked on my looks, I would say to them, “Just you wait and see. When I grow up I shall be as pretty as Mummy.” I meant it, because I believed what my mother had told me. I was and still am, my mother’s most ardent admirer. I used to watch her while she applied make-up. In the morning before leaving for the studio. After she had left, I would examine my face in the mirror, wishing I could be as beautiful as she. But such thoughts didn’t give me a feeling of inferiority because I had the patience to wait until I grew up. Now my fans say I have a pretty face, but the praise has not given me a feeling of superiority either, for I am aware of my drawbacks. I am still an ugly duckling compared to the beautiful swans. I am not being modest in saying so – I am only frank. I have always had a clear conscience. I admit my mistakes at the first opportunity, because I believe one can get away from others but not from oneself. I have certain principles in life from which I will not budge an inch under any circumstances. . - #regrann


A post shared by Mohnish Bahl (@mohnish_bahl) on
प्रनूतनमध्ये दिसते नूतनची 'झलक'


प्रनूतन मध्ये नूतन यांची झलक दिसून येते. खरंतर प्रनूतने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. मात्र आजी आणि वडिलांप्रमाणेच अभिनयक्षेत्रात काम करण्याची तिची प्रबळ ईच्छा होती. त्यामुळे प्रनूतनने वकिली सोडून चक्क अभिनयक्षेत्रात आपलं नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरी आजी आणि वडिलांच्या नावाचा वापर न करता प्रनूतनने रीतसर ऑडीशन देऊन ‘नोटबुक’ हा  चित्रपट मिळवला आहे. नूतन यांच्या अभिनयाचे आजही अनेक चाहते आहेत. त्यामुळे प्रनूतनचा 'नोटबुक' पाहण्यासाठी देखील प्रेक्षक तितकेच उत्सुक आहेत.


notebook new


'नोटबुक' 29 मार्चला होणार प्रदर्शित


सलमान खान प्रस्तूत ‘नोटबुक’ 29 मार्च 2019 ला प्रदर्शित होणार आहे. बॉलीवूडचा भाईजान या चित्रपटातून प्रनूतन बहल आणि झहीर इकबाल यांना चित्रपटसृष्टीत लॉंच करत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. नोटबुक हा एक रोमॅंटिक ड्रामा असलेला चित्रपट असणार आहे. त्यामुळे या चित्रपटातून प्रनूतन बहल आणि झहीर इकबाल यांची 'ऑनस्क्रीन केमिस्ट्री' चाहत्यांना पाहता येईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितीन कक्कड करत आहेत.

'आम्ही बेफिकर' चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित


रणवीर सिंगने चित्रपटाचे मानधन घेण्यासाठी का दिला नकार


अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम