मराठीतील अजरामर अभिनेत्री स्मिता पाटील आणि राजकीय नेते-अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) यांचा मुलगा प्रतीक बब्बर (Prateik Babbar) हा लखनऊमध्ये आज धूमधडाक्यात लग्नबेडीत अडकणार आहे. 22 आणि 23 जानेवारी या दोन दिवस चालणाऱ्या लग्नात बॉलीवूड सेलिब्रिटीज आणि अनेक राजकीय नेते ही उपस्थिती लावतील. मंगळवारी हळद आणि मेंदीचा कार्यक्रम पार पडला. त्याचे हे खास फोटोज
सान्याच्या फार्महाऊसवर हळदी आणि मेंदीचा कार्यक्रम
हळद आणि मेंदीचा कार्यक्रम सान्याच्या लखनऊमधील फार्महाऊसवर झाला. ज्याला अगदी जवळचे नातेवाईक उपस्थित होते. तर 23 जानेवारीला मोहनलालगंज येथील एका रिसोर्टमध्ये लग्न होत आहे. अत्यंत खाजगी पद्धतीने होणाऱ्या या लग्नाचा कार्यक्रम दोन दिवस पार पडणार आहे. तर लग्नानंतर मुंबईत खास रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे.
कोण आहे सान्या सागर
View this post on Instagram
सान्या ही व्यवसायाने लेखक आणि दिग्दर्शक आहे. सान्याने नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून फॅशन कम्युनिकेशनमध्ये गॅज्युएशन केलं आहे. त्यानंतर लंडनच्या फिल्म अकादमीमधून तिने फिल्म मेकिंगमध्ये डिप्लोमा केला.
View this post on Instagram#sistersquad @curato.in @goyalkanika I love it 😍 everything ❤️ #shopaholic #whatiwore
प्रतीकच्या बाबांप्रमाणेच सान्याचे वडील पवन सागर हेही राजकारणात सक्रीय आहेत. फक्त फरक एवढाच आहे की, राज बब्बर हे काँग्रेस नेते आहेत तर पवन सागर बहुजन समाज पार्टीचे नेते आहेत.
सान्या आधी अॅमी जॅक्सनसोबत लिव्ह-इन
प्रतीक सान्या सागरच्या आधी अभिनेत्री अ्ॅमी जॅक्सनला डेट करत होता आणि लिव्ह-इनमध्ये राहत होता. या दोघांनी एक दीवाना था हा चित्रपट एकत्र केला होता. याच चित्रपटादरम्यान दोघंही प्रेमात पडले होते. एवढंच नाहीतर प्रतीक अॅमीच्या नावाचा टॅटूही काढून घेतला होता. पण हे प्रकरण जास्त दिवस टीकलं नाही आणि दोघांमध्ये ब्रेकअप झाला.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच अॅमीनेही साखरपुडा केला आहे.
प्रतीक यंदा करणार ‘छिछोरे’
2016 साली प्रतीक चर्चेत आला जेव्हा त्याने आपल्या खाजगी आयुष्याबाबत काही धक्कादायक खुलासे केले होते. कमी वयात ड्रग्ज घेतल्यामुळे वयाच्या 19 व्या वर्षी रिहॅब सेंटरमध्ये जावं लागल्याचं त्याने सांगितलं होतं. प्रतीकने आपल्या आईबाबांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. प्रतीकने जाने तू या जाने ना, एक दीवाना था, आणि धोबी घाट यांसारख्या हटके फिल्म्समध्ये काम केलं आहे. यंदा तो सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूरसोबत छिछोरे या चित्रपटात दिसेल.