प्रतीक बब्बर आणि सान्या सागर लग्नबेडीत अडकले

प्रतीक बब्बर आणि सान्या सागर लग्नबेडीत अडकले

काँग्रेसचे नेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर लखनऊमध्ये गर्लफ्रेंड सान्या सागरसोबत विवाहबद्ध झाला. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटोज सध्या व्हायरल होत आहेत.


prateik-babbar-wedding5
एरवी मॉर्डन लुकमध्ये दिसणारी सान्या ब्रायडल लुकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. या कपलने लग्नाच्या खास दिवसासाठी लाल रंगाला पसंती दिली. हे लग्न मराठी पद्धतीने पार पडलं.


49815620 793647241012829 8271380172910982676 n
लग्नाच्या फोटोजमध्ये सान्या आणि प्रतीकची जोडी एकदम परफेक्ट वाटत आहे.  


50075661 2152594961724243 139227149439113833 n
लग्नानंतर हे कपल मुंबईतही जंगी रिसेप्शन देणार आहे. या रिसेप्शनला बॉलीवूड आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.


prateik-babbar-wedding3
प्रतीक बब्बर आणि सान्या सागर गेल्या 8 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. पण त्यांनी डेटींग मात्र 2017 सुरू केलं. मागच्याच वर्षी प्रतीक सान्याला प्रपोज करून लग्नाची मागणी घातली.


prateik-babbar-wedding4
या दोघांचा साखरपुडा 22 जानेवारी 2017 ला झाला होता.


prateik-babbar-wedding1
लग्नानंतर प्रतीक 'छिछोरे' या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूरबरोबर दिसेल. सान्यानेही अनेक म्युझिक व्हीडीओ, शॉर्ट फिल्म आणि फॅशन फिल्म्सची दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केलं आहे. सान्याने NIFT मधून फॅशन कम्युनिकेशनचा कोर्स केला आहे. तसंच लंडन फिल्म अकॅडमीमधून फिल्ममेकिंगचा डिप्लोमा केला आहे.


prateik-babbar-wedding2
या आधी प्रतीक आणि सान्याच्या हळद आणि मेहंदी सेरेमनीचे फोटोज ही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हळदीच्या फोटोजमध्ये प्रतीक डोक्यापासून पायापर्यंत हळदीने माखलेला दिसत होता आणि मजेशीरपणे त्याने आपले मसल्स दाखवत पोज ही दिली होती.


49519960 124475991932667 7870171958700910333 n
मेहंदी सेरेमनीला सान्याने पिवळ्या रंगाचं आऊटफिट घातलं होतं आणि सुंदर फुलांचा टियारा ही घातला होता.


49783516 2650964414921333 1595208976962853414 n


सान्याच्या जोडीला प्रतीकने कुर्ता पायजमा आणि त्यावर हिरव्या रंगाचा स्टोल घातला होता.


POPxo मराठीकडून प्रतीक बब्बर आणि सान्या सागरला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 


फोटो सौजन्य : Instagram 


हेही वाचा :


फॅशन - लग्न आणि रितीरिवाजांसाठी बेस्ट 41 वेडिंग ड्रेसेस (Best Wedding Dresses in Marathi)