'जजमेंट'मध्ये दिसणार चॉकलेट बॉय प्रतीक देशमुखचं वेगळं रूप

'जजमेंट'मध्ये दिसणार चॉकलेट बॉय प्रतीक देशमुखचं वेगळं रूप

चॉकलेट हिरो प्रतिक देशमुख ‘शुभ लग्न सावधान’ सिनेमामधून एनआरआय रोहनच्या भूमिकेत दिसला होता. आपल्या आगामी सिनेमात तो वेगळ्याच लूकमधून दिसणार आहे. आगामी ‘जजमेंट’ सिनेमात तो यदुनाथ साटम या नैराश्यग्रस्त तरूणाच्या भूमिकेत दिसेल.

आपली पहिली फिल्म ‘शुभलग्न सावधान’ करत असतानाच प्रतिक देशमुखला ‘जजमेंट’ चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटाविषयी सांगताना प्रतिक देशमुख म्हणाला की, “या दोन्ही चित्रपटातील हिरो रोहन आणि यदुनाथ दोघेही अमेरिकेतून शिक्षण घेऊन भारतात परतलेले तरूण आहेत.

पण एवढंच त्यांच्यातलं साम्य. बाकी कौटुंबिक, मानसिक, आर्थिक पातळीवर दोन्हीही भूमिका खूप वेगळ्या धाटणीच्या आहेत. ‘शुभलग्न’ मधला रोहन खूप फंकी होता. ‘यो’ टाइपचा होता. रोहन खूप एनर्जेटिक, बबली आणि हॅपी गो लकी मुलगा होता. ‘जजमेंट’मधला यदुनाथ हा अतिशय अंतर्मुख मुलगा आहे.“

या भूमिकेसाठी त्याने कशी तयारी केली याबाबत त्याला विचारलं असता तो म्हणाला की, “शुभलग्नचा रोहन सुखवस्तू मुलगा होता. पण यदुनाथची मानसिक अवस्था पाहता त्याला बारीक असणं गरजेचं होतं. त्यामुळे ‘शुभलग्न’ संपल्यावर लगेच मला वजन कमी करावं लागलं. केसही आता मोठे आणि फंकी चालणार नव्हते. त्यामुळे व्यवस्थित भांग पाडणारा, क्लीन शेव असलेला यदुनाथ मी उभा केला.”
 

 

 


View this post on Instagram


 

 

#ThrowbackThursday #tbt


A post shared by Pratik Deshmukh (@misterdeshmukh) on
करिअरच्या सुरूवातीला चॅलेजिंग भूमिका मिळाल्याने प्रतिक देशमुख सांगतो की, “सर्वसाधारणपणे प्रत्येक अभिनेत्याला करियरच्या सुरूवातीला कॉलेज गोइंग तरूणांच्या भूमिका मिळतात. मात्र मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, ‘शुभलग्न’चा रोहन पाहून मला ‘जजमेंट’च्या फिल्ममेकर्सनी यदुनाथची भूमिका ऑफर केली.”


हेही वाचा -


चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर म्हणतोय ‘घे जगूनी तू’


रोहित कोकाटे मराठीतील खतरनाक खलनायक


जर विकी कौशल तुमचा बॉयफ्रेंड असता तर...