Kasautii Zindagii Kay : प्रेरणा देणार का अनुरागला धोका

Kasautii Zindagii Kay : प्रेरणा देणार का अनुरागला धोका

एकता कपूरच्या कसौटी जिंदगी की (Kasautii Zindagii Kay) या सीरियलमध्ये कधी काय ट्विस्ट येईल याचा नेम नाही. खासकरून या सीरियलमधून कोमोलिका बाहेर पडल्यापासून तर जास्त ट्विस्ट येऊ लागले आहेत. आता कुठे प्रेक्षकांना वाटू लागलं होतं की, फायनली प्रेरणा आणि अनुराग जवळ येतील तर तेवढ्यातच त्यांच्या आयुष्यात नवीन वादळ येतंय. 

खरंतर प्रेरणा आणि अनुराग हे कपल एकत्र किती क्युट दिसतं. पण या जोडीचे फार कमी क्षण एकत्र दिसतात आणि लगेच काहीतरी संकट येतं. तुम्हाला माहीत आहे का, अफवा आहे की, पार्थ आणि एरिकाची जोडी एकमेकांना खऱ्या आयुष्यातही डेट करत आहे.

मोहिनी आणि मि.बजाजची खेळी

अनुरागची आई मोहिनी पहिल्यापासूनच प्रेरणा आणि अनुरागच्या नात्याच्या विरोधात आहे. त्यातच आता सीरियलमध्ये एंट्री झाली आहे ती मि. बजाजची. नुकत्याच एका एपिसोडमध्ये मि. बजाज अनुरागला जेलमध्ये पाठवण्यात यशस्वी होतो. त्यानंतर तो आता प्रेरणाला ब्लॅकमेल करत आहे. या शो च्या एका प्रोमोमध्ये बजाज प्रेरणाला त्याचं कट कारस्थान सांगतो आणि प्रेरणासमोर अनुरागला वाचवण्यासाठी एक डील ठेवतो. अनुरागच्या सुटकेसाठी प्रेरणा ती किंमत मोजायला तयार होणार का?

तुम्हाला वाटलेलं का, या सीरियलमध्ये असं काही होईल. आता प्रेरणा बजाजच्या या सापळ्यात अडकून त्याच्याशी लग्न करायला तयार होणार का?

एकीकडे हे नाट्य सुरू असताना तिकडे अनुराग जेलमध्ये त्याच्या आणि प्रेरणाबद्दल विचार करतोय. जेलमध्ये असूनही तो प्रेरणा लाल साडी गिफ्ट देण्याची स्वप्न पाहतोय. पण त्याला माहीतच नाहीयं की, त्यांच्यावर कोणतं संकटं येऊन ठाकलंय. 

कसौटीच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये अनुराग लग्नाच्या मंडपात येऊन पोचतो. जिथे कोणाचं लग्न होतंय हे त्याला माहीतच नाही. तो मि. बजाजला सांगतो की, खऱ्या प्रेमाची ताकद तुम्हाला माहीत नाही. प्रेरणा आता कायमची माझी होणार आहे आणि त्याचवेळी प्रेरणा वधूच्या वेशात मंडपात येते. बजाजचा हात पकडून अनुरागला सांगते की, मी लग्नासाठी योग्य जोडीदार निवडला आहे.

एकीकडे सीरीयलमध्ये हे ट्वीस्ट सुरू असताना #KZK2 ची कास्ट मात्र सध्या स्वित्झर्लंडमध्ये शूटींग करत आहे. तुम्ही म्हणाल की स्वित्झर्लंड का? आता लग्न झाल्यावर प्रेरणा आणि बजाज हनिमूनला तर जाणारच ना. तर इथे सुरू आहे त्याचंच शूटींग. एवढंच नाहीतर त्यांच्यामागे अनुरागही येऊन पोचलाय.