Nach Baliye 9 : प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी ठरले विजेते

Nach Baliye 9 : प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी ठरले विजेते

नच बलिए 9 (Nach Baliye 9) च्या जोड्यांनी आत्तापर्यंत एकापेक्षा एक परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. यंदाचा सीझन हा बऱ्याच ट्वीस्ट आणि नव्या थीममुळे पहिल्या एपिसोडपासून चर्चेत राहिला. सर्वच सेलिब्रिटी जोड्यांनी एकमेकांना चांगलीच टक्कर दिली. लवकरच या शो चा फिनाले एपिसोड ऑन एअर होईल. पण त्याआधीच या शोच्या विजेत्या जोडीचं नाव लीक झालं आहे.

नच बलिए 9 चे विजेते

सूत्रानुसार आणि सोशल मीडियावर व्हायरल पोस्टनुसार या सिझनची विजेती जोडी आहे प्रिन्स नरूला (Prince Narula) आणि युविका चौधरी ( Yuvika Chaudhary ) जे ठरू शकतात विजेते. रिपोर्ट्सनुसार असा दावा केला जात आहे की, नच बलिए 9 च्या ग्रँड फिनालेचं शूट झालं आहे. नच बलिए 9 चे विनर प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी ही जोडी ठरली आहे. खरंतर अजून या शो चा ग्रँड फिनाले एपिसोड अजून एअरही झालेला नाही. पण त्याआधीच विजेत्या जोडीचं नाव लीक झालं आहे.

शिवने शेअर केली इन्स्टावर बातमी

बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरेनेही प्रिन्स नरूला आणि युविका चौधरीचा फोटो इन्स्टावर शेअर करत ही बातमी दिली आहे. त्यामुळे हीच जोडी नच बलिएची विनर असल्याची दाट शक्यता आहे.

शिवने या दोघांचा फोटो शेअर करत त्यांचं नच बलिए जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.

रनरअप जोड्या कोणत्या?

आता प्रिन्स आणि युविकाचं नाव विनर म्हणून लीक झाल्यावर रनरअप जोड्यांची नावं तरी कशी लपतील. या शोचे पहिले रनरअप म्हणून अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डीचं नाव समोर येत असून विशाल आदित्य सिंग आणि  मधुरिमा तुली हे तिसऱ्या नंबरवर असल्याचं कळतंय.

प्रिन्स आहे रिएलिटी शो चा बादशाह

हो...प्रिन्सचा जर खरंच हा रिएलिटी शो जिंकला असेल तर त्याला रिएलिटी शो चा बादशाहच म्हणावं लागेल. कारण हा त्याचा एज अ विनर चौथा शो असेल. या आधी प्रिन्सने बिग बॉस 9 (Bigg Boss 9) , रोडीज X2 (Roadies X2), स्प्लीट्सव्हिला 8 (Splitsvilla 8) हे रिएलिटी शोज जिंकले आहेत.

बिग बॉसध्येच जमली जोडी

प्रिन्स नरूला आणि युविकाची लव्ह स्टोरी सलमान खानच्या बिग बॉस या रिएलिटी शोमध्ये सुरू झाली होती. प्रिन्सने बिग बॉसचा तो सिझन जिंकला होता. या सिझनच्या बऱ्याच काळानंतर प्रिन्स आणि युविकाने धूमधडाक्यात लग्न केलं.

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडी

प्रिन्स आणि युविकाची जोडी ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि आवडती जोडी आहे. नच बलिए शोमध्ये दोघांनाही सुरूवातीपासूनच शानदार परफॉर्मन्स देऊन सर्वांना इंप्रेस केलं आहे. दोघांचंही मोठं फॅन फॉलोइंग आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.