आरजे प्रितमवर आली उपासमारीची वेळ, शेअर केली भावना

आरजे प्रितमवर आली उपासमारीची वेळ, शेअर केली भावना

कोरोनामुळे सगळ्यांवरच आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे अनेक जण तणावाखाली आहेत. सेलिब्रिटींमध्येही ताणतणाव दिसून आला आहे. अनेकांना काम नाहीत याचा ताण आला आहे. बिग बॉसचा स्पर्धक आणि प्रसिद्ध आरजे प्रितमही सध्या काम नसल्यामुळे तणावाखाली आहे.त्याने त्याच्यावर ओढावलेल्या या परिस्थितीचे कथन सोशल मीडियावर केले आहे. पण त्याने यातून एक बोधही घ्यायला सांगितला आहे ते जाणून घेणे फारच गरजेचे आहे. तणावाखाली राहून काहीही नको ते करण्याचा विचार करत असाल तर आधी प्रितमची ही पोस्ट नक्कीच वाचा. कारण सध्या सगळ्यांनाच याची फार गरज आहे.

लवकरच परिस्थिती सुधारेल

Instagram

आरजे प्रितमने पोस्ट लिहित त्यात म्हटले आहे की, माझ्या कानांवर माझ्याबद्दलच्या अनेक गोष्टी आल्या आहेत. मला काम नाही. ही गोष्ट खरी आहे. मी सध्या जॉबलेस आहे. माझ्याकडे रेडिओचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. पण तरीही सध्या माझ्याकडे काम नाही. साधारण 6 महिन्यांपूर्वी मी रेडिओची नोकरी सोडली. अभिनय क्षेत्राची वाट चोखंदळायची असे मी ठरवले. त्यामध्ये मला चांगली कामही मिळत होती. नावही होत होते. मी एका टीव्ही शोचा होस्टींग म्हणून कामही केले होते. नवे कोणतेही काम सुरु होईल या आधीच कोरोना आला. सगळे काही बंद झाले. मी तणावाखाली नाही. पण मलाही नैराश्य आले आहे.  घरातून खिडकीच्या बाहेर ज्यावेळी पाहतो. त्यावेळी आशेचा किरण मला दिसतो आणि मला खात्री पटते की, लवकरच परिस्थिती सुधारेल. पुन्हा एकदा सगळे काही सुरळीत होईल. सगळ्या गोष्टी पुन्हा सुरु होतील. अशी पोस्ट लिहित त्याने अनेकांना आधार दिला आहे. 

सुझान खानने प्रियांकाला दिल्या शुभेच्छा 'देसी गर्ल' ठरतेय तिच्यासाठी प्रेरणा

डिलीट केली पोस्ट

प्रितमने लगेचच ही पोस्ट त्याच्या इन्स्टावरुन डिलीटही केली. पण तरीही त्याच्या इतर पोस्टवर लोकांनी त्याला धीर दिला आहे. लवकरच सगळे चांगले होईल. पण भावनेच्या भरात आणि काम नाही म्हणून तू अजिबात निराश होऊ नको. कोणताही निर्णय या काळात घेऊ नको असे त्याला अनेकांनी सांगितले आहे. 

शेअर केला एक जुना व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर त्याने केलेली पोस्ट एक जुना व्हिडिओ आहे. रेडिओमध्ये काम करत असताना आणि आर जे मलिष्कासोबत काम करत असताना त्याने  एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत पुन्हा बदलली शनाया, रसिका येणार का परत

बिग बॉसमधून मिळाली अफाट प्रसिद्ध

रेडिओमध्ये काम करत असताना प्रितम प्यारे नावाने प्रितम सिंह प्रसिद्ध होता. पण बिग बॉस नंतर त्याला सगळ्यात जास्त प्रसिद्ध मिळाली. बिग बॉसच्या आठव्या सीझनमध्ये पहिल्यांदा अनेकांना आरजेचा चेहरा दिसला. त्यामुळे प्रितम खूपच चालला. बिग बॉसनंतर त्याल अनेक ऑफर मिळाल्या. म्हणूनच त्याने रेडिओसोडून अभिनय क्षेत्राकडे वळायचे ठरवले त्याने अनेक काम केली सुद्धा. 


आता अनेकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे.  अनेकांना नोकरी नाही. त्यामुळे साहजिकच पैशांची तंगी आहे. पण अजूनही सगळे काही संपले नाही. थोडा धीर धरा कारण अनेक चांगल्या गोष्टी तुमची वाट पाहात आहेत.

इंडो-चायना गलवान तणावावर अजय देवगण बनवणार चित्रपट