प्रिया प्रकाश वॉरिअरला दुखापत, शूटिंग दरम्यान झाली जखमी

प्रिया प्रकाश वॉरिअरला दुखापत, शूटिंग दरम्यान झाली जखमी

'विंक गर्ल' मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरिअर (Priya Prakash Varrier) ला तर तुम्ही ओळखत असालच. कारण ती फक्त एका रात्रीत सोशल मीडिया सेसेंशन बनली होती. एका व्हिडिओतून डोळ्यांच्या दिलखेचक अदांनी तिने चाहत्यांची मने जिंकून घेतली होती. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की प्रियाला पुढे 'विंक गर्ल' म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. प्रिया प्रकाश सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ज्यामुळे तिचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या ती तिचा आगामी तेलुगू चित्रपटट 'क्रॅक'मुळे चर्चेत आहे. ती या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मात्र सध्या तिचा या शूटिंग दरम्यान जखमी झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला आहे.

प्रिया प्रकाशने शेअर केला व्हिडिओ

प्रिया प्रकाशने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'क्रॅक'मध्ये प्रिया अभिनेता नितिनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ती त्याच्यासोबत एका गाण्याचं शूटिंग करत होती. ज्यासाठी ती धावत येते आणि नितिनच्या अंगावर मागून उडी मारते असा सीन शूट केला जात होता. मात्र हा सीन करत असताना प्रिया नितिनच्या पाठीवर चढली मात्र ती त्याला घट्ट पकडू न शकल्याने जमिनीवर आदळली. तोल न सावरता आल्याने प्रिया तिच्या मागच्या दिशेने डोकं आणि पाठीवर जमिनीवर पडली. हा व्हिडिओ पाहून प्रियाला चांगलंच लागलं असून ती गंभीर जखमी झाली असणार याचा अंदाज येत आहे. प्रिया पडल्यावर नितिन आणि शूटिंगची संपूर्ण टीम प्रियासाठी धावून आली. नितिनने तिला धरून उचललं त्यानंतर कोणाला चिंता वाटू नये यासाठी प्रिया मी ठीक आहे मी ठीक आहे असं म्हणत उठली आणि निघून गेली. या व्हिडिओसोबत प्रिया प्रकाशने शेअर केलंय की, "जीवन कशा पद्धतीने मला जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न करतं याची ही एक झलक आहे. पण मी काही झालं तरी पुन्हा उभी राहते आणि पूर्ण विश्वासाने पुढे चालू लागते" हा व्हिडिओ शेअर करत प्रियाने तिच्या जीवनाचा एक धडा लोकांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून तो पाहून काही क्षणासाठी चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकत आहे. मात्र प्रिया सुरक्षित आहे हे पाहून आणि तिने शेअर केलेला अनुभव वाचून लोकांना थोडासा दिलासा नक्कीच मिळाला आहे.

प्रियाचे आगामी चित्रपट

तेलुगू  चित्रपट क्रॅकचं हे पहिलंच गाणं प्रिया आणि नितीन शूट करत होते. या घटनेमुळे आता हा गाणं चांगलंच लोकप्रिय होणार असं वाटू लागलं आहे.. प्रिया प्रकाश लवकरच 'चेक' या चित्रपटातही झळकणार आहे. जो चित्रपट चंद्रशेखर येलेती दिग्दर्शित करत  आहेत. हा चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नितिन कैदी च्या भूमिकेत दिसणार आहे तर हिंदी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह क्रिमिनल वरीलाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट अॅक्शन आणि थ्रीलचा एक पॉवरपॅक चित्रपट असणार आहे.