प्रिया वारियर लवकरच झळकणार हिंदी सिनेमा 'Sridevi Bungalow' मध्ये

प्रिया वारियर लवकरच झळकणार हिंदी सिनेमा 'Sridevi Bungalow' मध्ये

 


तुम्हाला प्रिया वारियर आठवते का? 2018 साली एका छोटीशी व्हीडीओ क्लीप व्हायरल झाल्यावर रातोरात सेलिब्रिटी झालेली अभिनेत्री म्हणजे प्रिया प्रकाश वारियर. जी लवकरच हिंदी सिनेमांमध्ये डेब्यू करण्यासाठी तयार आहे आणि तिच्या या बॉलीवूडमधील पहिल्याच चित्रपटाच्या टीझर रिलीजनंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आहे.


हिंदी चित्रपटाच्या टीझरनंतर प्रिया झाली ट्रोल
 

 

 


View this post on Instagram


 

 

Hustle & heart will set you apart 🧚🏻‍♀️


A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on
प्रिया लवकरच 'श्रीदेवी बंग्लो' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. पण तिच्या पहिल्याच चित्रपटाचं टीझर रिलीज करण्यात आलं. मात्र हे टीझर रिलीज होताच प्रियाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. याचं कारण म्हणजे टीझर बघताच तुमच्या लक्षात येईल की, हा चित्रपट बॉलीवूडची चांदनी गर्ल श्रीदेवी आणि तिच्या दुर्घटनेमुळे झालेल्या मृत्यूवर आधारित आहे. पण या टीझरमध्ये कुठेही हा सिनेमा श्रीदेवीच्या मृत्यूवर आधारित असल्याच म्हटलं गेलं नाही, त्यामुळे प्रियाला ट्रोल केलं जात आहे.


कसं आहे Sridevi Bungalow चं ट्रेलर

Subscribe to POPxoTV

या चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, श्रीदेवी ही एक प्रसिद्ध महिला होती, जिचं देशाविदेशात ही प्रचंड फॅन फोलोइंग होतं पण ती आतल्या आत ती दुःखी होती. या टीझरमध्ये ते दृष्यही दाखवण्यात आलं आहे, ज्यामध्ये श्रीदेवीचा मृत्यू हा बाथटबमध्ये बुडण्यामुळे झाला होता. तसंच बाथटबमधून बाहेर येणाऱ्या पायाचं दृष्य फारच विचलित करणार आहे. पण याच दृष्यामुळे हे सिद्ध होतं की, हा सिनेमा अभिनेत्री श्रीदेवीच्या आयुष्यावर आधारित आहे.


प्रियाचा लुक आणि 'श्रीदेवी बंग्लो' टीझर
 

 

 


View this post on Instagram


 

 

🥀


A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on
चित्रपटातील प्रियाचा लुक चांगला आणि फ्रेश वाटत आहे. पण तिचा हा लुक श्रीदेवीशी साधर्म्य असणारा वाटत नाही. टीझर लाँचवेळी याबाबतीत प्रश्न विचारला असता, प्रियानेही उघडपणे मान्य केलं नाही की, हा सिनेमा अभिनेत्री श्रीदेवीवर आधारित आहे की नाही. ‘या सिनेमात मी फक्त एका सुपरस्टारचा रोल करत आहे, जिचं नाव श्रीदेवी आहे.’, असं उत्तर तिने दिलं.


'श्रीदेवी बंग्लो'बाबत उत्सुकता

हा बॉलीवूड चित्रपट मल्याळम दिग्दर्शक प्रशांत मम्बुली यांचा असून याचं बजेट तब्बल 70 कोटी रूपये असल्याचं म्हटलं जात आहे. टीझर रिलीजनंतरच हा सिनेमा चर्चेत आला आहे आणि त्यातच प्रिया प्रकाश वारियरचा सिनेमा असल्यामुळे फॅन्समध्येही उत्सुकता आहे.