घटस्फोटाची बातमी दिल्याबद्दल प्रियांका आणि निक करणार मासिकाविरूद्ध कारवाई

घटस्फोटाची बातमी दिल्याबद्दल प्रियांका आणि निक करणार मासिकाविरूद्ध कारवाई

प्रियांका आणि निक ही सध्या बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील सर्वात जास्त चर्चिली जाणारी जोडी आहे. रोज हे दोघं काय करतात याच्या बातम्या येत असतात. पण अगदी दोन दिवसांपूर्वीच या दोघांचं आलबेल नसून प्रियांका आणि निक घटस्फोट घेणार असल्याची बातमी एका युएसमधील मासिकाने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर संपूर्ण जगभर चारच महिन्यात प्रियांका आणि निक वेगळे होणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. प्रियांका आणि निक यांच्यामध्ये काहीच जमत नसून प्रियांका अतिशय रागीट आहे हे निकला लग्न झाल्यानंतर कळलं अशा स्वरुपाचा मजकूरदेखील या बातमीमध्ये होता. इतकंच नाही तर दोघांनीही लग्नाचा निर्णय घाईघाईत घेतला आणि त्याचा आता त्यांना पश्चाताप होत असल्याचंही यामध्ये म्हटलं होतं. पण हे काहीच खरं नसून प्रियांका आणि निक अतिशय मजेत आहेत. त्यामुळे या वृत्तामुळे प्रियांका आणि निक दोघेही रागावले असून या अमेरिकन मासिकाविरुद्ध कारवाई करणार असल्याचं म्हटलं जात आहे.


priyanka nick2


प्रियांका पाठवणार कायदेशीर नोटीस


प्रियांका या वृत्ताने खूपच संतापली असून सध्या ती याबाबत आपल्या कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करत असल्याचं वृत्त आहे. जर तिने या वृत्ताबाबत कारवाई करायचं ठरवलं तर तिला कोणीही थांबवू शकणार नाही. शिवाय ती सध्या नक्की कोणतं कायदेशीर पाऊल उचलता येईल याबाबत तज्ज्ञांशी बोलत असल्याचंही सांगितलं जात आहे. प्रियांका आणि निक यांचं चार महिन्यापूर्वीच लग्न झालं आहे. शिवाय हे वृत्त येण्याआधी काही तासापूर्वी प्रियांकाने निकच्या भावाचं फोटो पोस्ट करून अभिनंदनही केलं होतं. प्रियांका निक आणि त्याच्या कुटुंबामध्ये चांगलीच रमली असल्याचं तिच्या फोटोंवरूनही जाणवत आहे. त्यामुळे या अमेरिकन मासिकाने आपल्या प्रसिद्धीसाठी अशी बातमी छापली असल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी देखील एका मासिकाने प्रियांका आणि निकच्या लग्नामध्ये घोटाळा असल्याचं खोटं वृत्त छापलं होतं. त्यावेळी या मासिकाला त्यांच्या कुटुंबाची माफी तर मागावी लागलीच शिवाय माफीनामादेखील छापावा लागला होता.


परिणितीने केलं वृत्ताचं खंडन


परिणिती चोप्रा ही प्रियांकाची चुलत बहीण असली तरीही ती प्रियांकाच्या अगदी जवळ आहे. प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या बातम्यांचं परिणितीनं खंडन केलं आहे. या बातम्या बिनबुडाच्या असल्याचंही तिनं सांगितलं आहे. शिवाय नुकताच जोनस ब्रदर्सच्या कन्सर्टमधील एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रियांका आणि निक मजा करताना दिसत आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसून येत आहे. असं असताना उगीच वावड्या उठवल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे. प्रियांका आणि निकचं लग्न झाल्यापासून ते आतापर्यंत रोज काही ना काहीतरी नव्या बातम्या येत असतात. त्यामुळे हे कपल चाहत्यांमध्ये अतिशय प्रिय असल्याचंही जाणवत आहे.


प्रियांका लवकरच दिसणार सुपरहिरोच्या भूमिकेत


priyanka nick


सूत्रानुसार, प्रियांका लवकरच मार्व्हल सुपरहिरो कमाला खानच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. मार्व्हलच्या कॉमिक बुकमधील सुपरहीरो कमाला खानला रूपेरी पडद्यावर आणण्याची चर्चा आहे. या भूमिकेसाठी प्रियांका चोप्राचं नाव चर्चेत आहे.    


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा 


जेव्हा प्रियांका चोप्रा निक जोनसला एक्स गर्लफ्रेंडबरोबर चॅट केल्यावर पकडते


देसी गर्ल प्रियांका दिसू शकते ‘मार्व्हल’स भूमिकेत


प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल